अशोक गहलोतांनी वापरलेल्या शब्दांनी दु:ख, पायलटांची प्रतिक्रिया, गहलोत म्हणतात, जे झालं तो इतिहास

काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर माघार घेतली आहे (Rajasthan Political Crisis).

अशोक गहलोतांनी वापरलेल्या शब्दांनी दु:ख, पायलटांची प्रतिक्रिया, गहलोत म्हणतात, जे झालं तो इतिहास

नवी दिल्ली : राजस्थानमधील राजकीय संकट संपल्यात जमा आहे. काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट आणि त्यांचे समर्थक आमदार यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर माघार घेतली आहे (Rajasthan Political Crisis). पक्षाने आमचं म्हणणं ऐकून घेऊन त्यावर रोडमॅप तयार केल्याची माहिती पायलट यांनी दिली. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही जे झालं तो इतिहास होता. काँग्रेस पक्ष एकजूट असून आमचं सरकार 5 वर्ष काम करेल, असं म्हणत या प्रकरणावर पडदा टाकला.

सचिन पायलट म्हणाले, “मी माझ्या आजपर्यंतच्या राजकारणात खरेपणा जपला. मात्र, मला देशद्रोहाची नोटीस पाठवली याचं दुःख झालं. आम्ही पक्षासमोर मुद्दे मांडले. त्यांनी या सर्व मुद्द्यांवर रोडमॅप तयार केलाय. मी पक्षासमोर माझ्याकडून कुठलीही मागणी केली नाही. आम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पक्षाच्याविरोधात काहीही बोललो नाही. अशोक गहलोत माझ्यापेक्षा मोठे आहेत. मी त्यांचा सन्मान केला. त्यांनी वापरलेल्या शब्दामुळं मला वाईट वाटलं. मात्र, मी त्यावर प्रतिक्रिया देणार नाही. पण सत्य जनतेसमोर आलंय.”

“राजस्थानमध्ये दीड वर्षात आम्ही जे काम केलं ते पुरेशा वेगाने झालं नाही, असं मला वाटलं. मान, सन्मान मिळत नसेल तर ते मुद्दे मांडले पाहिजेत. काल हे सर्व मुद्दे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यापुढे मांडले. मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. राजस्थान सरकारसाठी ते प्रश्न उपस्थित केले होते. राजकारणात कोणतीही गोष्ट वैयक्तिक नसते. जे असतं ते पक्ष आणि राज्यासाठी असते. आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन लढलो, हे राजस्थानच्या जनतेला माहिती आहे. आम्ही सरकार बनवलं आहे,” असंही पायलट यांनी सांगितलं.

काँग्रेस एकजूट, जे गेले होते त्यांच्या अडचणी दूर करणार : अशोक गहलोत

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी देखील या वादावर पडदा टाकत काँग्रेस पक्ष एक असून राजस्थानमधील काँग्रेस सरकार आपला 5 वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल, असं सांगितलं. ते म्हणाले, “ईडी, सीबीआयचा चुकीच्या पध्दतीनं वापर केला जातोय. लोक काय म्हणतील याची यांना चिंताच नाही. ज्या पध्दतीचं वातावरण तयार केलं हे सर्व देशासमोर आहे. मात्र, काँग्रेस पक्ष एकजूट राहिल. पुढील 5 वर्ष आम्ही एक राहू. 5 वर्ष राजस्थानमधील आमचं सरकार व्यवस्थित चालेल.”

“जे झाल तो इतिहास झाला. काँग्रेसचा एकही माणूस फुटून गेला नाही. भाजपनं मोठ षडयंत्र केलं होतं. हायकमांडने त्यांचा स्वीकार केला. जे लोक आले आहेत, ते का गेले, कोणत्या परिस्थितीत गेले होते याचा विचार केला जाईल. त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. हा राजस्थानच्या जनतेचा विजय आहे,” असंही गहलोत म्हणाले.

संबंधित व्हिडीओ :


संबंधित बातम्या :

भाजपच्या तोंडाला रक्त लागलंय, पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेक मंत्र्यांचा घोडेबाजारात सहभाग : अशोक गहलोत

Rajasthan: सचिन पायलट निरुपयोगी आणि बिनकामाचे, मी मुख्यमंत्री, इथं भाजी विकण्यासाठी नाही : अशोक गहलोत

Rajasthan Crisis | काँग्रेस आमदारांना आमिष देण्याबाबत कथित ऑडिओ क्लिप, केंद्रीय मंत्र्यावर गुन्हा

Rajasthan Political Crisis

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *