वाईनच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांची बदनामी थांबवा, किर्तनाने समाज सुधारत नसतो – शेट्टी

वाईनला किराणा दुकानात विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. मात्र असे केल्याने वाईनचा खप वाढणार नाही किंवा कमी होणार नाही. किर्तनाने माणूस सुधारत नाही, ना तो लावणीने बिघडतो. त्यामुळे हा विषय आता संपला पाहिजे, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

वाईनच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांची बदनामी थांबवा, किर्तनाने समाज सुधारत नसतो - शेट्टी
राजू शेट्टी
Follow us
| Updated on: Feb 03, 2022 | 6:28 PM

नवी दिल्ली : वाईनला (Wine) किराणा दुकानात विकण्याची परवानगी राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. या निर्णयामागे शेतकऱ्यांचे हीत असल्याचे महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र वाईनला किराणा दुकानात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय योग्य आहे का? यावर समिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांकडून राज्य सरकारवर (State Government) जोरदार टीका केली जात आहे. आता शेतकरी नेते राजू  शेट्टी (Raju Shetty) यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. वाईनचा विषय अनावश्यक चर्चेला आणून शेतकऱ्यांना बदनाम करण्याचे काम सुरू असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना राजू  शेट्टी म्हणाले की, वाईनला किराणा दुकानात विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. मात्र असे केल्याने वाईनचा खप वाढणार नाही किंवा कमी होणार नाही. किर्तनाने माणूस सुधारत नाही, ना तो लावणीने बिघडतो. त्यामुळे हा विषय आता संपला पाहिजे. काही लोक जाणीवपूर्वक हा विषय चर्चेमध्ये आणत आहे. मात्र या सर्वांमधून शेतकऱ्यांची नाहक बदनामी सुरू आहे, त्यामुळे हे सर्व वेळीच थांबायला पाहिजे.

पोलिसांच्या बदल्यासाठी नियमावली असावी

दरम्यान यावेळी बोलताना शेट्टी यांनी पोलिसांच्या बदल्यावरून सध्याच्या सरकारवर जे आरोप होत आहेत त्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या या लोकप्रतिनिधींच्या सल्ल्यावरूनच होत असतात. यापूर्वी देखील अनेकवेळा झाल्या आहेत. मात्र आता यामध्ये बदल झाला पाहिजे, पोलीस बदल्यांसाठी एक नियमावली निश्चित करण्यात यावी, तरच हा बदल्यांचा धंदा बंद होईल असे राजू  शेट्टी यांनी म्हटले आहे.

दोषींना शिक्षा झाली पाहिजे

यावेळी शेतकरी आंदोलनावरून देखील शेट्टी यांनी भाजपावर टीका केली. वर्षभरापेक्षाअधिक काळापासून दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते. अखेर तीन कृषी विधेयक मागे घेण्याचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आला. मात्र या सर्वांमध्ये 700 पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. याला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा ही मिळालीच पाहिजे असे राजू  शेट्टी यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Aurangabad| अल्पसंख्यांकांसाठीच्या योजनांकरिता तत्काळ समिती गठीत करावी, खासदार इम्तियाज जलील यांची मागणी

‘महापालिकेत 20 वर्षे सत्ता, पण रस्त्यावर गाडी व्हायब्रेट मोडवर जाते’, मुंबई महापालिका अर्थसंकल्पावरुन मुनगंटीवारांचा शिवसेनेवर निशाणा

अमरावतीचा मनपा आयुक्त येडपट, रवी राणांच्या टीकेचा दर्जा घसरला, तर नवनीत राणा म्हणतात…

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.