‘जेव्हा काँग्रेस पक्ष करेल बंड, तेव्हा…!’, आठवलेंनी कविता करत उडवली ठाकरे सरकारची खिल्ली

'जेव्हा काँग्रेस पक्ष करेल बंड, तेव्हा...!', आठवलेंनी कविता करत उडवली ठाकरे सरकारची खिल्ली

अहमदनगर : महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे विरोधक आणि सत्ताधारी असा सामनाच राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशात रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी त्यांच्या खास कविता करण्याच्या शैलीत ठाकरे सरकारवर (Thackeray government) निशाणा साधला आहे. खरंतर, रामदास आठवले म्हटलं की सगळ्यांना त्यांच्या मजेशीर कविता आठवतात. आताही त्यांनी अशीच कविता करत सत्ताधाऱ्यांची खिल्ली उडवली आहे. (Ramdas Athavale criticized the Thackeray government in poem)

काँग्रेसने पाठिंबा काढला की अजितदादा ताबडतोब आमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाहीत असं वक्तव्य रामदार आठवले यांनी केलं होतं. याच मुद्दयावर आता त्यांनी कवितेतून सरकारची खिल्ली उडवली आहे. ते म्हणाले की, ‘जेव्हा काँग्रेस पक्ष करेल बंड, तेव्हा उद्धव ठाकरे सरकार पडेल थंड’ अशी कविता करत रामदास आठवले यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

इतकंच नाहीतर ‘लवकरच होणार आहे या सरकारमध्ये बिघाडी आणि जाणार आहे महाविकासआघाडी’ अशीही कविता रामदार आठवले यांनी केली आहे. त्यामुळे त्यांच्या या कवितेवर ठाकरे सरकारमधून काय प्रतिक्रिया येते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान, “राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार पुन्हा एकदा साथ देतील आणि सरकार येईल, अशी आशा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना आहे. म्हणूनच ते ‘मी पुन्हा येईन’ असं म्हणतात” असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं. काँग्रेसने पाठिंबा काढला की अजितदादा ताबडतोब आमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वासही आठवलेंनी व्यक्त केला. आगामी काळातील निवडणुकीत राज्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ताकदीने उतरणार असल्याचं रामदास आठवले यांनी जाहीर केलं.

“राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आदरच आहे. कारण त्यांच्यामुळे मी राजकारणात आलो. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस एका बाजूला आणि राष्ट्रवादी- शिवसेना दुसऱ्या बाजूला आहेत. या भांडणात काँग्रेस कधी पाठिंबा काढून घेईल, सोनिया गांधी कधी सूचना देतील, सांगता येत नाही. आणि काँग्रेसने पाठिंबा काढला रे काढला की अजितदादा ताबडतोब आमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाहीत” असा विश्वासही आठवलेंनी व्यक्त केला आहे.

“म्हणून फडणवीस म्हणतात मी पुन्हा येईन…”

“अजितदादांनी म्हटलं की, एक म्हणतोय (देवेंद्र फडणवीस) मी येईन, आणि दुसरा म्हणतोय (चंद्रकांत पाटील) मी जाईन. देवेंद्र फडणवीस मी येईन, अशासाठी म्हणतात, की अजितदादा एक दिवस त्यांच्यासोबत येतील, अशी त्यांना अपेक्षा आहे. अजितदादा एकदा तिथे जाऊन आलेले आहेत, त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना अपेक्षा आहे, की एक दिवस अजित पवार आपल्यासोबत येतील. आणि आपलं नवीन सरकार स्थापन करण्याची संधी आपल्याला मिळेल. अशी अपेक्षा असल्याने ते पुन्हा-पुन्हा सांगतात की मी पुन्हा येईन” असं रामदास आठवले म्हणाले. (Ramdas Athavale criticized the Thackeray government in poem)

संबंधित बातम्या –

राणेंकडून नवी डेडलाईन, “केंद्रात आणि राज्यात भाजपच येणार, ठाकरे सरकार कोसळणार”

विधान परिषद : ठाकरे सरकारकडून विचारणा, राज्यपालांकडून प्रतिसाद नाही

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून पार्थ पवार लढणार का?; अजित पवार म्हणतात…

(Ramdas Athavale criticized the Thackeray government in poem)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI