AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“सरकार चालवता येत नसेल तर उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा, राष्ट्रपती राजवट लागू करा” आठवलेंच्या भेटीनंतर मदन शर्मांची मागणी

महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवणारे सरकार लोकांना निवडू द्या" अशी मागणी शिवसैनिकांनी मारहाण केलेले निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी केली.

सरकार चालवता येत नसेल तर उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा, राष्ट्रपती राजवट लागू करा आठवलेंच्या भेटीनंतर मदन शर्मांची मागणी
| Updated on: Sep 13, 2020 | 12:39 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र फॉरवर्ड केल्याने शिवसैनिकांनी मारहाण केलेले निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी भेट घेतली. “उद्धव ठाकरे यांना सरकार चालवता येत नसेल, तर त्यांनी राजीनामा दिला पाहीजे. राष्ट्रपती राजवट लागू केली पाहीजे” अशी मागणी यावेळी मदन शर्मा यांनी केली. (Ramdas Athawale meets  retired Navy officer Madan Sharma who allegedly beaten up by ShivSena workers)

“मी पोस्ट फॉरवर्ड केली होती, पण उदय महेश्वरी यांनी चित्र काढलं आहे. त्यांना पकडायचं सोडून मला पकडले, ही त्यांची क्रिएटीव्हीटी” असं मदन शर्मा म्हणाले. “मला चार वेळा फोन आला. काही शिवसैनिकांनी बातचीत करण्यासाठी बोलवले, मी गेलो, पण मला मारहाण सुरु झाली” असे त्यांनी सांगितले.

“संपूर्ण देश म्हणतोय हे सरकार बदलले पाहिजे. जर उद्धव ठाकरे यांना सरकार चालवता येत नसेल, तर त्यांनी राजीनामा दिला पाहीजे. राष्ट्रपती राजवट लागू केली पाहीजे. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवणारे सरकार लोकांना निवडू द्या” अशी मागणी मदन शर्मा यांनी केली.

‘पोलिसांवर दबाव होता, त्यामुळे हे सगळे सुटले. मला सुरक्षा मिळाली आहे, एक अधिकारी आणि दोन कर्मचारी. पण हत्येच्या प्रयत्नाची केस झाली पाहिजे अशी मागणी शर्मा यांनी केली.

(Ramdas Athawale meets  retired Navy officer Madan Sharma who allegedly beaten up by ShivSena workers)

“सरकारने दबाव आणून या सर्वांना सोडवले. किमान 15-20 दिवस आरोपी आतमध्ये पाहिजे होते. हा एक फोटो आहे, कार्टून नाही. राज्यात गढूळ वातावरण झाले आहे. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे” ही मदन शर्मा यांची मागणी आठवलेंनीही उचलून धरली.

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या केस मध्ये पोलिसांना अपयश आले आहे, असेही आठवले म्हणाले. तर जो इथे राहतो, त्याची मुंबई, मुंबई सर्वांची आहे, असे म्हणत संजय राऊत यांना टोला लगावला.

“एका बाजूला शरद पवार यांचा ब्रॅंड, उद्धव ठाकरे पण ब्रॅंड आहेत, राज ठाकरे ब्रॅंड आहेत आणि मी सुद्धा ब्रॅंड आहे” अशी मिश्कील प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी सामनाच्या रोखठोक सदरात संजय राऊत यांना मांडलेल्या भूमिकेवर दिली.

काय आहे प्रकरण?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आक्षेपार्ह व्यगंचित्र व्हॉट्सअ‍ॅपवर फॉरवर्ड केल्यामुळे मुंबईत शिवसैनिकांनी 65 वर्षीय निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवार 11 सप्टेंबरला समोर आला होता. या प्रकरणी अटक केलेल्या सहाही शिवसैनिकांना जामीन मिळाला आहे. आरोपींमध्ये शिवसेना शाखाप्रमुख कमलेश कदम यांचाही समावेश आहे.

कांदिवलीतील समतानगरमध्ये लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरात राहणारे निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप झाला होता. मारहाणीत मदन शर्मा यांच्या चेहऱ्याला तसेच डोळ्याला गंभीर इजा झाली. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले.

मदन काशिनाथ शर्मा यांनी त्यांच्याकडील ‘महानगर -1’ या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर राजकीय पुढार्‍यांचे आक्षेपार्ह व्यगंचित्र फॉरवर्ड केले. या कारणावरुन कमलेश कदम आणि इतर आठ ते दहा जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादीला मारहाण करत डोळ्याला दुखापत केली म्हणून समतानगर पोलीस ठाणे येथे कलम 325, 143, 147, 149 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. शनिवारी सकाळी कोर्टात हजर केले असता सहाही आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला.

संबंधित बातम्या :

नि. नौदल अधिकारी मारहाण : शिवसेनेविरोधात भाजपचं आंदोलन, नांगरे पाटील घटनास्थळी, गृहमंत्र्यांचा दरेकरांना फोन

बदनामीकारक व्यंगचित्रामुळे हल्ला, सेनेकडून अप्रत्यक्ष समर्थन, भाजपची सडकून टीका

कांदिवलीत निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण प्रकरण, अटक केलेल्या सहाही शिवसैनिकांना जामीन

(Ramdas Athawale meets  retired Navy officer Madan Sharma who allegedly beaten up by ShivSena workers)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.