AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रामदास कदमांना दसरा मेळाव्यात जागा नाही? सावंत म्हणतात, निमंत्रणाची पद्धत नाही !

मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात 50 टक्के उपस्थितीत शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार आहे. मात्र, यावेळी रामदास कदम यांच्यासाठी नो एन्ट्री असेल, असं सांगितलं जात आहे. मात्र, याबाबत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांना विचारलं असता दसरा मेळाव्यासाठी निमंत्रणाची गरज नसल्याचं ते म्हणाले.

रामदास कदमांना दसरा मेळाव्यात जागा नाही? सावंत म्हणतात, निमंत्रणाची पद्धत नाही !
रामदास कदम, अरविंद सावंत
| Edited By: | Updated on: Oct 12, 2021 | 4:41 PM
Share

मुंबई : कथित ऑडिओ क्लिपमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर नाराज असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे यंदाच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात रामदास कदम यांना एन्ट्री नसेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची घोषणा करण्यात आली आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार नाही. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात 50 टक्के उपस्थितीत हा दसरा मेळावा पार पडणार आहे. मात्र, यावेळी रामदास कदम यांच्यासाठी नो एन्ट्री असेल, असं सांगितलं जात आहे. मात्र, याबाबत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांना विचारलं असता दसरा मेळाव्यासाठी निमंत्रणाची गरज नसल्याचं ते म्हणाले. (No entry for Ramdas Kadam in Shiv Sena’s Dussehra rally? Explaination by MP Arvind Sawant)

शिवसेनेत दसरा मेळाव्याला आमंत्रण देण्याची पद्धत नाही. नेते, उपनेते, आमदार, खासदार हे स्वत:हून येतात. कुणालाही वेगळं आमंत्रण नसतं. रामदास कदम यांच्या नो एन्ट्रीबाबत आपल्याला काही माहिती नाही, असं अरविंद सावंत म्हणाले. शिवसेनेचा दसरा मेळावा सभागृहात होणार आहे. षन्मुखानंद सभागृहात अर्ध्या क्षमतेमध्ये तेराशे प्रमुख कार्यकर्ते, नेते, आमदार, खासदार यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी फेसबूक, यूट्यूबच्या माध्यमातून उद्धव ठाकरे जनतेला संबोधित करतील, असंही सावंत यांनी सांगितलं.

कथित ऑडिओ क्लिपचं नेमकं प्रकरण काय?

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. मात्र, त्यासाठी किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्याच एका नेत्यानं रसद पुरवल्याचा आरोप करण्यात येत आहे. मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी तसा गंभीर आरोप केलाय. खेडेकर यांनी या प्रकरणात थेट रामदास कदम यांचं नाव घेतलं आहे. इतकंच नाही तर त्याबाबत एक ऑडिओ क्लिपही समोर आली आहे. त्यात किरीट सोमय्या, रामदास कदम आणि माहिती अधिकार कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांचा संवाद असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, रामदास कदम आणि प्रसाद कर्वे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

‘त्या’ ऑडिओ क्लिपची शहानिषा करुन कदमांवर कारवाई?

या कथित ऑडिओ क्लिपमुळेच शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याचं कळतंय. त्यामुळेच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात रामदास कदम यांना एन्ट्री नसेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. इतकंच नाही तर रामदास कदम यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे. त्या कथित ऑडिओ क्लिपची शहानिशा करुन रामदास कदम यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं समजतं. मात्र, त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

कसा असेल यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा?

शिवसेनेचा दसरा मेळावा 100 टक्के होणार, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. शिवसेनेचा दसरा मेळावा हा मुंबईतील दादर इथल्या शिवाजी पार्क मैदानावर होत असतो. मात्र कोरोना संकटामुळे यंदा हा मेळावा शिवाजी पार्कऐवजी माटुंगा इथल्या षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं. संजय राऊत म्हणाले, “शिवसेनेचा दसरा मेळावा 100 टक्के होणार आहे. षण्मुखानंद हॉलमध्ये त्याच जोरात हा मेळावा होईल. शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करतील आणि देशाच्या राजकारणाला दिशा देण्याचा प्रयत्न करतील”.

इतर बातम्या :

ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश तुम्ही टिकवून दाखवा, पंकजा मुंडेंनी ठाकरे सरकारला ललकारलं

..तर ओबीसी तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही, पंकजा मुंडेंचं आव्हान, टार्गेटवर ठाकरे सरकार

No entry for Ramdas Kadam in Shiv Sena’s Dussehra rally? Explaination by MP Arvind Sawant

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.