AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जर तुम्ही वाघ होता तर दुसऱ्याच्या कळपात का शिरला, वाघ नसून मेंढी आहात, सामनाच्या टीकेला रावसाहेब दानवेंचं प्रत्युत्तर

राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आल्यापासून आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपची अवस्था कळपात वाघ शिरल्यामुळे भेदरलेल्या मेंढरांसारखी झालेय, असे वक्तव्य शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या‘सामना’तील अग्रलेखातून करण्यात आले आहे

जर तुम्ही वाघ होता तर दुसऱ्याच्या कळपात का शिरला, वाघ नसून मेंढी आहात, सामनाच्या टीकेला रावसाहेब दानवेंचं  प्रत्युत्तर
रावसाहेब दानवे
| Edited By: | Updated on: Oct 15, 2021 | 6:21 PM
Share

जालना: राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आल्यापासून आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपची अवस्था कळपात वाघ शिरल्यामुळे भेदरलेल्या मेंढरांसारखी झालेय, असे वक्तव्य शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या‘सामना’तील अग्रलेखातून करण्यात आले आहे. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर लिहलेल्या अग्रलेखात भाजपवर चांगलेच आसूड ओढण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सारखा वाघ मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपची अवस्था ही भेदरलेल्या मेंढरंसारखी सारखी झाली आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. यावर रावसाहेब दानवे यांनी आपल्या खुमासदार शैलीत उत्तर दिले आहे. जर हे वाघ होते तर दुसऱ्याच्या कळपात का शिरले, असा सवाल रावसाहेब दानवे यांनी केला.

रावसाहेब दानवे नेमकं काय म्हणाले?

रावसाहेब दानवे यांनी आपल्या खुमासदार शैलीत संजय राऊत आणि शिवसेनेला उत्तर दिले आहे. जर हे वाघ होते तर दुसऱ्याच्या कळपात का शिरले आहेत. हे वाघ नाहीत मेंढी आहेत. हे वाघ नाहीत यांनी फक्त वाघाचा चेहरा लावला आहे. या वाघाला शेपटी पण नाही, असेही रावसाहेब दानवे म्हणाले.

संजय राऊत सामनाद्वारे काय म्हणाले?

शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपची अवस्था कळपात वाघ शिरल्यामुळे भेदरलेल्या मेंढरांसारखी झालेय, असे वक्तव्य शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखातून करण्यात आले आहे. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर लिहलेल्या अग्रलेखात भाजपवर चांगलेच आसूड ओढण्यात आले आहेत. भाजपच्या नेत्यांची सध्याची बेताल वक्तव्ये ऐकून लोकांची खूप करमणूक सुरु आहे. पुन्हा ‘धाड’ प्रयोगही सुरुच आहेत. त्या सगळ्यांना चोख उत्तर देण्यासाठी महाराष्ट्राला शमीच्या झाडावरील शस्त्रे काढावीच लागतील, असा इशारा अग्रलेखातून देण्यात आला आहे.

‘ठाकरे सरकार नीट चालू नये यासाठी दिल्लीश्वरांचा खटाटोप’

दोन वर्षांपासून ठाकरे सरकार महाराष्ट्रात काम करत आहे. हे सरकार नीट चालू नये म्हणून दिल्लीश्वरांनी मोठा खटाटोप आणि आटापिटा चालवला आहे. खोटेपणाची सर्व आयुधे वापरुन सरकारच्या पाठीत घाव घालण्याची एकही संधी राजकीय विरोधकांनी सोडली नाही. महाराष्ट्राला कमजोर करायचे, महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान मोडून काढायचा हे दिल्लीचे धोरणच आहे. पण या बेईमान धोरणाची पालखी वाहणारे सूर्याजी पिसाळ आजही महाराष्ट्रात निपजत आहेत व महाराष्ट्राला याच दुश्मनांपासून सगळ्यात जास्त धोका आहे, अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.

इतर बातम्या:

सत्तेत असताना तुम्ही मंत्रीपद भाड्याने दिलं होतं का?; धनंजय मुंडेंचा पंकजांवर पलटवार

Nihang Sikh : सिंघू सीमेवर तरुणाचे हात कापल्यानं निहंग शीख चर्चेत, मुघलांसह अफगाणी फौजांना अडवणारा समुदाय वादात

Raosaheb Danve gave answer to Sanjay Raut editorial of Saamana claiming Shivena is real tiger

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.