रोहित पवार अचानक सलूनमध्ये, जामखेडमध्ये सलूनवाल्याची भंबेरी

रोहित पवार आज जामखेडमध्ये होते. यावेळी त्यांनी जामखेडच्या एका छोट्या सलून दुकानात जाऊन दाढी (Rohit Pawar Shaving) करुन घेतली. जामखेड दौऱ्यावर असताना अचानक सलून दुकानात जाऊन कटिंग केली.

रोहित पवार अचानक सलूनमध्ये, जामखेडमध्ये सलूनवाल्याची भंबेरी

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे नातू रोहित पवार हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी मागितली आहे. रोहित पवार यांचा सध्या या मतदारसंघातील वावर वाढला आहे.

रोहित पवार आज जामखेडमध्ये होते. यावेळी त्यांनी जामखेडच्या एका छोट्या सलून दुकानात जाऊन दाढी (Rohit Pawar Shaving) करुन घेतली. जामखेड दौऱ्यावर असताना अचानक सलून दुकानात जाऊन कटिंग केली.

थेट रोहित पवार आपल्या दुकानात आल्याचे पाहून सलूनचालक संदीप राऊतची चांगली धावपळ उडाली. कंगवा कात्री चालवताना संदीप थोडं अडखळला, मात्र अखेर हात बसल्यावर संदीपनेही मग कमाल दाखवली.

रोहित पवार निवडणूक लढवण्याच्या तयारीत

विधानसभा निवडणुकीसाठी कर्जत-जामखेड मतदारसंघातून रोहित पवार नशीब अजमावणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांच्या अनेक बैठका सध्या या मतदारसंघात सुरु आहेत. पक्षाकडेही त्यांनी उमेदवारी मागितली आहे.

रोहित पवारांची विधानसभा उमेदवारी धोक्यात  

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याचा असून काँग्रेसने ही जागा सोडण्यास नकार दिल्याने रोहित पवारांची उमेदवारी धोक्यात आली आहे. जामखेडची जागा यापूर्वी काँग्रेसनेच लढवली होती. त्यामुळे आम्ही ही जागा सोडणार नाही. ही जागा यापुढेही काँग्रेसच लढवेल, असं ठाम मत काँग्रेसचे नवे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनी व्यक्त केलं. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा गुंड यांनी देखील उमेदवारीची मागणी केली आहे.

संबंधित बातम्या  

रोहित पवारांची विधानसभा उमेदवारी धोक्यात 

….म्हणून मला कर्जत जामखेडमधून उमेदवारी हवी : रोहित पवार  

राष्ट्रवादीत इच्छुकांची गर्दी, रोहित पवारांविरुद्धच दोघांचा अर्ज, पाहा संपूर्ण यादी 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI