….म्हणून मला कर्जत जामखेडमधून उमेदवारी हवी : रोहित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा दुसरा नातू आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. रोहित पवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागण्यासाठी अर्ज केला आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:17 PM, 3 Jul 2019

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा दुसरा नातू आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. रोहित पवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागण्यासाठी अर्ज केला आहे. सध्या जिल्हा परिषद सदस्य असलेल्या रोहित पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे. विधानसभा लढवण्यास मी इच्छुक असल्याचं रोहित पवार यांनी यापूर्वीच सांगितलं होतं. मात्र माझा मतदारसंघ ठरला नसून वरिष्ठ ठरवतील, तिथून उभं राहणार असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं होतं.

आता रोहित पवार यांनी नगरच्या कर्जत जामखेडमधून उमेदवारी मागितली आहे. याच मतदारसंघातून उमेदवारी का हवी, याचं कारण रोहित पवार यांनी सांगितलं आहे. फेसबुकवर पोस्ट करुन रोहित पवार यांनी सविस्तर म्हणणं मांडलं आहे.

रोहित पवार हे कर्जत जामखेड मतदारसंघात चाचपणी करत होते. उन्हाळ्यात त्यांनी या भागातील लोकांसाठी टँकर सुरु करुन जनसंपर्क वाढवण्याचाही प्रयत्न केला  होता. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला होता.  नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते राम शिंदे यांचा हा मतदारसंघ आहे.

उमेदवारी मागण्याचा काल शेवटचा दिवस होता. या दिवशी रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षाकडे अर्ज भरुन दिला. विशेष म्हणजे याच मतदारसंघासाठी अनेक जण उत्सुक आहेत आणि त्यांनीही अर्ज भरुन दिला.

रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट

संबंधित बातम्या 

‘या’ मतदारसंघातून उमेदवारी द्या, रोहित पवारांची पक्षाकडे अर्जाद्वारे मागणी