AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सात जणांची माघार, आता ‘या’ 6 उमेदवारांविरोधात ऋतुजा लटके यांची लढत

मातब्बर उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतल्याने ही निवडणूक एक औपचारिक ठरणार आहे. त्यामुळे ऋतुजा लटके किती मतांच्या फरकाने विजयी होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सात जणांची माघार, आता 'या' 6 उमेदवारांविरोधात ऋतुजा लटके यांची लढत
सात जणांची माघार, आता 'या' 6 उमेदवारांविरोधात ऋतुजा लटके यांची लढत Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 18, 2022 | 10:02 AM
Share

मुंबई: अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार मुरजी पटेल (murji patel) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. ऋतुजा लटके (rutuja latke) यांना या निवडणुकीला सामोरे जावं लागणार आहे. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मुरजी पटेल यांच्यासह सात जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतरही अजूनही सहाजण निवडणूक (election) रिंगणात आहेत. त्यामुळे ही निवडणूक होणार आहे. मात्र, निवडणूक होणार असली तरी ऋतुजा लटके यांचा विजय सोपा मानला जात आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. या शिवाय अपक्ष उमेदवार निकोल अल्मेडा, साकिब जफर ईमाम मल्लिक, चंद्रकांत रंभाजी मोटे, पहल सिंग धनसिंग आऊजी, चंदन चतुर्वेदी आणि हिंदुस्थान जनता पार्टीचे उमेदवार राकेश अरोरा यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

तर, ऋतुजा यांची लढत इतर सहा जणांविरोधात होणार आहे. आपनी आपनी पार्टीचे बाला व्यंकटेश विनायक नाडार, राईट टू रिकॉल पार्टीचे मनोज श्रावण नायक, अपक्ष उमेदवार नीना खेडेकर, फरहाना सिराज सय्यद, मिलिंद कांबळे आणि राजेश त्रिपाठी आदी उमेदवार मैदानात आहेत. त्यामुळे या मतदारसंघात मतदान होणार आहे.

सहा उमेदवार निवडणुकीच्या मैदानात असल्याने ऋतुजा लटके यांना निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. प्रचारही करावा लागणार आहे. मात्र, भाजपने माघार घेतल्याने या निवडणुकीतील चुरस संपली आहे. त्यामुळे लटके यांना प्रचारासाठी कठोर मेहनत घ्यावी लागणार नाही. मतदारांपर्यंत आपलं चिन्हं पोहचावं या उद्देशाने त्यांना प्रचार करावा लागणार आहे.

मातब्बर उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतल्याने ही निवडणूक एक औपचारिक ठरणार आहे. त्यामुळे ऋतुजा लटके किती मतांच्या फरकाने विजयी होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख..
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख...
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?.
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?.
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक.
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.