एनसीबीकडून 59 ग्रॅम गांजाचा गाजावाजा, पण भाजप कार्यकर्त्याकडील 1200 किलो गांजाकडे दुर्लक्ष : सचिन सावंत

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB ) आता ‘नमो कंट्रोल्ड ब्युरो’ झाला आहे का? असा खोचक सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारला आहे (Sachin Sawant allegations on NCB in drugs investigation).

एनसीबीकडून 59 ग्रॅम गांजाचा गाजावाजा, पण भाजप कार्यकर्त्याकडील 1200 किलो गांजाकडे दुर्लक्ष : सचिन सावंत
Follow us
| Updated on: Sep 24, 2020 | 4:54 PM

मुंबई : सुशांतसिंह प्रकरणातून बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर एनसीबीने काही लोकांना अटक केली. आता बॉलिवूडमधील काही कलाकारांची चौकशी होत आहे. असं असताना या प्रकरणाशी संबंधित असलेल्या भाजप-बॉलिवूड-सँडलवूड-गोवा ड्रग्ज कनेक्शनची चौकशी एनसीबी का करत नाही? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारला आहे. यावेळी त्यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB ) आता ‘नमो कंट्रोल्ड ब्युरो’ झाला आहे का? असा खोचक सवालही विचारला (Sachin Sawant allegations on NCB in drugs investigation).

सचिन सावंत म्हणाले, “नरेंद्र मोदी यांची प्रिय व्यक्ती राकेश अस्थाना महासंचालक असलेल्या एनसीबीच्या चौकशीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. भाजपचे बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन, सँडलवूड आणि गोवा प्रकरणाकडे एनसीबीला आम्ही दुर्लक्ष करु देणार नाही. एका 59 ग्रॅम गांजाप्रकरणी एनसीबी एवढा मोठा गाजावाजा करत आहे. याचवेळी कर्नाटकमध्ये भाजप कार्यकर्ता चंद्रकांत चव्हाणला 1200 किलो गांजासह अटक करण्यात आली. याकडे एनसीबी ढुंकुंनही पाहायला तयार नाही.”

“कर्नाटकात अभिनेत्री रागिनी द्विवेदी हीला सँडलवूड ड्रग्ज रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली. अभिनेत्री रागिनी ही कर्नाटक भाजपची स्टार प्रचारक होती. याच प्रकरणात 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आदित्य अल्वा या व्यक्तीलाही अटक करण्यात आली. अल्वा हा गुजरात भाजपचा स्टार प्रचारक अभिनेता विवेक ओबेरॉयचा सख्खा मेव्हणा आहे. विवेक ओबेरॉय हा मोदी बायोपिकचा निर्माता संदीपसिंहबरोबर सहनिर्माता आहे. या बोयोपिकमध्ये मोदींची मुख्य भूमिकाही विवेकनेच साकारली आहे. विवेक हा संदीपसिंहच्या निर्मिती कंपनीत भागीदार आहे,” अशीही माहिती सचिन सावंत यांनी दिली.

“सुशांत प्रकरणातील संशयित संदीप सिंहने भाजप कार्यालयात 53 वेळा कुणाला फोन केले?”

सचिन सावंत म्हणाले, “गुजरात राज्य सरकारने संदिप आणि विवेकच्या कंपनीबरोबर 177 कोटी रुपयांचा सामंजस्य करार केला. या मोदी बायोपीकचे पोस्टर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास उपस्थितीत रिलीज करण्यात आले होते. याच संदिप सिंहने भाजप कार्यालयात 53 वेळा फोन कोणाला केले होते आणि संदिप सिंहला मॉरिशसमध्ये एका प्रकरणात कोणी मदत केली होती याचा खुलासा अद्याप झालेला नाही. हे सर्व एकमेकांशी संबंधित आहे. महाराष्ट्र सरकारने या संबंधाची माहिती सीबीआयला दिलेली आहे. परंतु आजपर्यंत या अँगलचा तपास का केला नाही? याचे आश्चर्य आहे.”

“कंगनाने स्वतः ड्रग्ज घेत असल्याची कबुली देऊनही तिच्यावर कारवाई का नाही?”

“एनसीबी ड्रग्ज कनेक्शनची पाळंमुळं शोधत असताना गौरव आर्याचे भागीदार कोण आहेत आणि गोवा अँगल या तपासातून गायब झालेला दिसत आहे. याचे उत्तर एनसीबीने दिले पाहिजे,” अशी मागणी सचिन सावंत यांनी केली. ते म्हणाले, “एनसीबीच्या ड्रग्ज कनेक्शन चौकशीतून कंगना रनौत गायबच आहे. आपण ड्रग्ज घेत होतो असे तिने स्वतः कबुल केले आहे. कंगणाचा ड्रग घेतल्यासंदर्भातील व्हिडीओ हा पुरावा आहे. असं असताना तिची चौकशी का केली जात नाही. ही चौकशी सुरु असताना कंगना मुंबईत येऊन काही दिवस राहून परत शिमल्याला गेली, पण चौकशीसाठी एनसीबीने तिला का बोलावले नाही?”

“एनसीबी कंगनावर मेहरबान आहे का? की कंगना बॉलिवूडचा भाग नाही? एनसीबी व्हॉट्सअप चॅटवरून चौकशीसाठी बोलावत असेल तर कंगनाच्या व्हिडिओकडे डोळेझाक का?”, असे अनेक प्रश्न काँग्रेसने उपस्थित केले आहेत. एनसीबी कोणाला वाचवण्यासाठी तपास करत असेल तर आम्ही ते होऊ देणार नाही यासाठीच त्यांना हे प्रश्न विचारत आहोत. ड्रग कनेक्शनसंदर्भात एवढे अँगल असताना त्याकडे एनसीबी दुर्लक्ष का करत आहे असे प्रश्न सावंत यांनी उपस्थित केले आहेत.

संबंधित बातम्या :

फडणवीस हे कंगना आणि राम कदमांचे बोलवते धनी, कदमांची नार्को टेस्ट करा : सचिन सावंत

कंगना भाजपची कठपुतली, महाराष्ट्राच्या बदनामीच्या कटाचा भाग : सचिन सावंत

महाराष्ट्राला बदनाम करण्याचा भाजपचा हीन डाव उघड : सचिन सावंत

संबंधित व्हिडीओ :

Sachin Sawant allegations on NCB in drugs investigation

Non Stop LIVE Update
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.