भाजप नेत्यांच्या छळामुळे खासदार डेलकरांवर आत्महत्येची वेळ, मोदी-शाहांनीही मदत केली नाही : सचिन सावंत

दादरा, नगर हवेलीचे सातवेळा निवडून आलेले लोकप्रिय खासदार मोहनभाई डेलकर यांना भाजप नेते आणि केंद्रीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या छळामुळे आत्महत्या करावी लागल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलाय.

भाजप नेत्यांच्या छळामुळे खासदार डेलकरांवर आत्महत्येची वेळ, मोदी-शाहांनीही मदत केली नाही : सचिन सावंत
Sachin Sawant narendra modi
Follow us
| Updated on: Mar 13, 2021 | 6:26 PM

मुंबई : दादरा, नगर हवेलीचे सातवेळा निवडून आलेले लोकप्रिय खासदार मोहनभाई डेलकर यांना भाजप नेते आणि केंद्रीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या छळामुळे आत्महत्या करावी लागल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलाय. तसेच ही भारतीय लोकशाहीसाठी शोकांतिका आहे, असंही त्यांनी म्हटलंय. यावेळी सचिन सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह खासदार मोहन डेलकर यांना वाचवू शकले असते, असंही नमूद केलंय (Sachin Sawant serious allegation on PM Modi and HM Amit Shah about MP Mohan Delkar suicide).

“आत्महत्या करण्यापूर्वी देशातील सर्व ताकदवर आणि संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तींचा दरवाजा डेलकर यांनी मदतीची आर्त याचना करून ठोठावला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना वारंवार पत्र लिहून मदतीची याचना केली. एका खासदाराच्या जीवन मरणाचा प्रश्न असताना पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा डेलकर यांना तातडीने मदत करु शकले असते परंतु त्यांनी केलेले दुर्लक्ष जाणीवपूर्वक होते का?” असा जळजळीत सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला.

लोकसभेच्या हक्कभंग समितीमध्ये डेलकर यांनी आपले गाऱ्हाणे मांडताना आपल्या मनात असलेले आत्महत्येचे सुतोवाच केले होते का? याबाबत लोकसभेच्या हक्कभंग समितीच्या अध्यक्षांनी तातडीने खुलासा करावा, अशी मागणीही सावंत यांनी केली.

‘डेलकरांना कुटुंबाला जेलमध्ये टाकू अशा धमक्या’

सचिन सावंत म्हणाले, “डेलकर यांनी आपल्याला भाजप नेते आणि दादरा नगर हवेलीचे केंद्रीय अधिकारी यांऱ्यांकडून छळ होत असून सातत्याने अपमानीत केले जात असल्याचं म्हटलं होतं. ते 20-20 वर्षांपूर्वीचे कोणताही संबंध नसलेले गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या गुन्ह्याशी त्यांचा संबंध नाही व आरोपपत्र देखील दाखल झालेले आहे अशी प्रकरणे पुन्हा उघड जात आहेत. कुटुंबाला जेलमध्ये टाकू अशा धमक्या दिल्या जात आहेत, अशा तक्रारी डेलकर यांनी केल्या होत्या.”

मदतीसाठी खासदार मोहन डेलकरांनी कुणाकुणाला पत्रं पाठवली?

“डेलकर यांनी मदतीची आर्त अपेक्षा व्यक्त करणारी अनेक पत्रं पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिली. 18 डिसेंबर 2020 रोजी एक आणि 31 जानेवारी 2021 रोजी दुसरे पत्र डेलकर यांनी मोदींना पाठवले होते आणि भेटीची वेळ मागितली होती. अशाच तऱ्हेची पत्रं त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना 18 डिसेंबर 2020 रोजी आणि 12 जानेवारी 2021 रोजी पाठवले होते. लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनाही त्यांनी 18 डिसेंबर 2020, 12 जानेवारी 2021 आणि 19 जानेवारी 2021 रोजी पत्रे पाठवली होती. 13 जानेवारी 2021 रोजी संसदेचे स्थायी समितीचे अध्यक्ष भूपेंद्र यादव यांनादेखील पत्र पाठवले होते,” असंही सचिन सावंत यांनी नमूद केलं.

‘कल्पना असतानाही मोदी-शाहांनी डेलकरांना वाचवलं नाही का?’

सचिन सावंत म्हणाले, “इतक्या मोठ्या प्रमाणात खासदार मोहन डेलकर यांनी पाठवलेली पत्रे आणि त्यातील आशय पाहता आपला संसदेतील एक सहकारी अत्यंत दबावात आहे याची जाणीव पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना निश्चित होती. असे असताना तथाकथित 56 इंच छातीचे सरकार ज्या व्यक्तीवर कायदे बनवण्याची जबाबदारी आहे अशा खासदाराला वाचवण्यासाठी पुढे का आले नाहीत? का जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले? त्याचे उत्तर भाजपने दिले पाहिजे. देशातील सरकार एका खासदाराचे संरक्षण करु शकत नसेल, तर त्यापेक्षा अधिक नाकर्तेपणा कोणताही असू शकत नाही किंवा भयानक षडयंत्र असू शकत नाही.”

“अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात बोंबाबोंब करणारे भाजपचे नेते हे खासदार मोहन डेलकर आत्महत्येसंदर्भात गप्प का? असे विचारत कोणत्याही नेत्यांनी याबाबत संवेदनासुद्धा व्यक्त केल्या नाहीत हे अत्यंत दुर्दैवाचे असल्याचं सचिन सावंत म्हणाले.

‘लोकसभेच्या हक्कभंग समितीसमोर डेलकरांनी आत्महत्येचा इशारा दिला होता’

“12 फेब्रुवारी 2021 रोजी लोकसभेच्या हक्कभंग समितीसमोर खासदार मोहन डेलकर यांच्या तक्रारीची सुनावणी घेण्यात आली होती. या समितीसमोर मोहन डेलकर यांनी या सर्व समिती सदस्यांसमोर त्यांच्यावरील मानसिक आघाताची जाणीव करून दिली होती. तसेच त्यांच्यासमोर खासदारकीचा राजीनामा देणे किंवा आत्महत्या करणे हे दोनच पर्याय असल्याचे सुतोवाच केले होते अशी माहिती समजते. यासंदर्भातील सत्यतेबाबत लोकसभा हक्कभंग समितीने तात्काळ स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे,” असंही सचिन सावंत यांनी नमूद केलं.

समितीला इशारा दिल्यानंतर केवळ 10 दिवसातच डेलकरांची आत्महत्या

सचिन सावंत म्हणाले, “आत्महत्येचा इशारा दिल्यानंतर केवळ 10 दिवसातच डेलकर यांनी आत्महत्या केली. सरकारतर्फे तात्काळ पावलं उचलली असती तर डेलकरांना वाचवता आले असते. मोहन डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्महत्या करण्याचे कारण म्हणजे वारंवार पंतप्रधान व गृहमंत्री यांना याचना करूनही त्यांनी मदतीसाठी कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे केंद्रीय व्यवस्थेवर त्यांचा अविश्वास होता आणि महाराष्ट्र विकास आघाडी सरकार त्यांना न्याय देईल म्हणून त्यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली.”

‘खासदार मोहन डेलकरांचा हरेन पांड्या होऊ देणार नाही’

“गुजरातचे माजी गृहमंत्री हरेन पांड्या यांच्या हत्येला कोण जबाबदार आहे हे भाजपचं सरकार अजून शोधू शकलं नाही. गुन्हेगारांना शासित करू शकले नाही, परंतु महाराष्ट्र विकास आघाडी सरकार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येस जबाबदार लोकांना निश्चित शासन करेल. त्यांची हरेन पांड्या यांच्याप्रमाणे परिस्थिती होऊ देणार नाही, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.

हेही वाचा :

विश्वास नांगरे पाटील शरद पवारांच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण

मोहन डेलकर आत्महत्येप्रकरणी पटेल यांच्यावर गुन्हा दाखल: अनिल देशमुख

डेलकर यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारे पटेल हे मोदींचे सहकारी; अनिल देशमुखांचा दावा

व्हिडीओ पाहा :

Sachin Sawant serious allegation on PM Modi and HM Amit Shah about MP Mohan Delkar suicide

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.