‘आम्ही दारुच नाही, गांजाही विकला असेल, पण सामान्य माणसांचे खिसे कापले नाहीत’, सदाभाऊंचं मिटकरींना प्रत्युत्तर

मिटकरी आणि पडळकर यांच्यातील वादात आता माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी उडी घेतली आहे. सदाभाऊ खोत यांनी अमोल मिटकरी यांनी पडळकरांवर केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युतर दिलं आहे.

'आम्ही दारुच नाही, गांजाही विकला असेल, पण सामान्य माणसांचे खिसे कापले नाहीत', सदाभाऊंचं मिटकरींना प्रत्युत्तर
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 5:27 PM

सांगली : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर विरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यातील वाद आता टोकाला पोहोचलाय. अहिल्यादेवींच्या पुतळ्याच्या उद्घाटनावरुन सुरु झालेलं हे वाकयुद्ध अद्याप थांबण्याचं नाव घेत नाही. मिटकरी आणि पडळकर यांच्यातील वादात आता माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी उडी घेतली आहे. सदाभाऊ खोत यांनी अमोल मिटकरी यांनी पडळकरांवर केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युतर दिलं आहे.(Sadabhau Khot responds to Amol Mitkari’s criticism of Gopichand Padalkar)

अमोल मिटकरी यांनी आरोप केला होता की दारु विकली म्हणे. मी म्हणतोय गांजाही विकत होतो. तू येतोस का चिलीम लावायला, असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावलाय. इतकच नाही तर आम्ही सगळं केलं पण सामान्य माणसांचे खिके कापले नाहीत, असा पलटवारही खोतांनी लगावला आहे. “तू बोलतो किती? तुझी औकात किती? तू आहेस केवढा? मला एक पत्रकार म्हणे बोला त्याच्यावर, मी म्हटलं, माझ्यासवे लढाया वाघास बोलवावे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही. समोर कॅमेरा असल्याने मी नाव न घेता बोलणार आहे”, अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला होता. त्याला आता खोतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मिटकरींचं पडळकरांवर टीकास्त्र

“मी नागज फाट्यावर दारू विकली नाही किंवा कोणत्या आजीची दोन कोटींची जमीन बळकावली नाही. मी कुत्र्यांना भीत नाही”, असा घणाघात मिटकरी यांनी केलाय. “तुम्हाला काय वाटतं, हे सोपं असतं. एखादं श्वान बैलाच्या मागे भूंकतं. बैल एकदा, दोनदा ऐकतो, तिसऱ्यांदा मात्र लाथ मारतो. बैलाने लाथ मारल्यानंतर कुत्रा मागेच जातो”, असा टोलाही मिटकरींना लगावला होता.

पडळकर आणि मिटकरींमधील वाद

अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरुन गोपीचंद पडळकर आणि अमोल मिटकरी यांच्यात वाद सुरु झाला. गोपीचंद पडळकर यांनी अमोल मिटकरी यांचा बाजारू विचारवंत असा उल्लेख केला. राष्ट्रवादी काँग्रेसही होळकर घराण्याच्या विरोधात असून होळकर घराण्याचा इतिहास पुसून टाकण्याचा त्यांचा डाव असल्याचा गंभीर आरोप पडळकर यांनी केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यास जाणूनबुजून वेळ लावल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

त्यावेळी अमोल मिटकरी यांनीही पडळकरांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. पडळकर म्हणजे बिरोबाची शपथ घेऊन समाजाला विकणारा नेता आहे, अशा शब्दात मिटकरी यांनी पडळकरांचा समाचार घेतला. पडळकरांना कावीळ झाल्याने त्यांना सर्वत्र पिवळं दिसत आहे. पडळकर हे पिसाळलेल्या प्रवृत्तीचे असून ते भाजपला बुडवल्याशिवाय राहणार नाही, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. पडळकरांनी चोरासारखं पुतळ्याचं अनावरण केलं. आम्हीच होळकरांचे वारसदार असून पडळकर हे आधुनिक शिशूपाल आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

संबंधित बातम्या :

मिटकरी बाजारू विचारवंत, पडळकर पिसाळलेली वृत्ती; मिटकरी-पडळकर जुंपली

अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचं अनावरण भोवलं, गोपीचंद पडळकरांवर गुन्हा दाखल

‘शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा’, पडळकरांचं राऊतांना पत्र

Sadabhau Khot responds to Amol Mitkari’s criticism

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.