AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हवेत गोळीबार करू नका, हवेतून जमिनीवर या; सदाभाऊ खोत यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले

सांगली जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. रेमडेसिवीर मिळत नाही. ऑक्सिजनही मिळत नाही. प्रशासन मात्र जनतेची दिशाभूल करताना दिसत आहे. (sadabhau khot slams maha vikas aghadi over corona crisis in sangli)

हवेत गोळीबार करू नका, हवेतून जमिनीवर या; सदाभाऊ खोत यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले
सदाभाऊ खोत, रयत क्रांती संघटना
| Updated on: May 03, 2021 | 5:59 PM
Share

सांगली: सांगली जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. रेमडेसिवीर मिळत नाही. ऑक्सिजनही मिळत नाही. प्रशासन मात्र जनतेची दिशाभूल करताना दिसत आहे. ऑक्सिजन नसल्याने चार रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. तरीही मंत्री म्हणतात जिल्ह्यात कशाचीच कमतरता नाही. मंत्र्यांनो, खोटी माहिती देऊन हवेत गोळीबार करू नका. हवेतून जमिनीवर या, असं आवाहन रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केलं आहे. (sadabhau khot slams maha vikas aghadi over corona crisis in sangli)

सदाभाऊ खोत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा हल्लाबोल केला आहे. सहा महिन्यांपूर्वीच आम्ही ऑक्सिजन प्लांट उभा करा म्हणून सांगितलं होतं. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. सांगली जिल्हा कोरोनाची स्मशानभूमी होत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा गुजरातमधून येणार होता. हा साठा आला असता तर रुग्णांना इंजेक्शन मिळाले असते. पण त्या उद्योजकाला रात्रीच उचलून धमकावल्या गेलं. या प्रकारामुळे उद्योजकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तुम्ही उद्योजकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण कराल तर राज्यातील उद्योजक राज्याबाहेर जातील, अशी भीती व्यक्त करतानाच या सरकारने राज्यात ठोकशाही सुरू केल्याचा आरोपही खोत यांनी केला.

भुजबळांना सल्ला

यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. माझा पुतण्या माझ्या जवळ बसून होता, असं भुजबळ म्हणाले. राजकारणात टीका टिप्पणी होत असते. विरोधक चुका दाखवण्याचं काम करत असतात. याचे भान ठेवायला हवे. लोकप्रतिनिधी हतबल आहेत. सत्ताधाऱ्यांना सवाल नाही करणार तर कुणाला करणार?, असा सवाल करतानाच भुजबळ जेलमध्ये होते. तेव्हा ते चेअरमध्ये होते. आता घरी बसले आहेत, असंही ते म्हणाले.

फडणवीसांची व्यूहरचना अचूक

पढंरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या निकालावरही त्यांनी भाष्य केलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अचूक व्यूहरचना केली. आमदार दिला तर येथील विकासकामे माझ्यावर सोडा असं ते म्हणाले होते. माझा आमदार निवडून दिला तर सरकारमधून कशी कामं करून घ्यायची हे मला माहीत आहे, असंही फडणवीसांनी सांगितलं होतं. त्यामुळे मतदारांनी त्यांच्या हाकेला प्रतिसाद दिला, असंही त्यांनी सांगितलं. (sadabhau khot slams maha vikas aghadi over corona crisis in sangli)

संबंधित बातम्या:

ना विजयाचा गुलाल, ना हार-सत्कार! नवनियुक्त आमदार कोरोना विरोधातील लढाईसाठी थेट मैदानात

… तर अजित पवारांचा राजीनामा घेणार का?; आशिष शेलारांचा नवाब मलिक यांना सवाल

पाचवेळा लोकसभेची निवडणूक जिंकली, इंदिरा गांधींचा लिटल खासदार, कोण होते दामोदर शिंगडा?

(sadabhau khot slams maha vikas aghadi over corona crisis in sangli)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.