अचानक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह कसे? सरकारचा नियोजनबद्ध कार्यक्रम : संदीप देशपांडे

विधानसभा अध्यक्ष निवडणूक लांबणीवर टाकायची आहे, म्हणून कोरोनाची भीती दाखवली जात आहे" असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे. (Sandeep Deshpande Thackeray Govt Corona)

अचानक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह कसे? सरकारचा नियोजनबद्ध कार्यक्रम : संदीप देशपांडे
उद्धव ठाकरे, संदीप देशपांडे
अनिश बेंद्रे

|

Feb 22, 2021 | 10:13 AM

मुंबई : “अचानक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह कसे येतात? मुख्यमंत्री साहेबांना घरी थांबायचं आहे, म्हणून कोरोनाचे आकडे वाढून सांगता का?” असा सवाल मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केला आहे. सरकारला विधीमंडळाचं अधिवेशन चालवायचं नसल्यामुळे कोरोनाचे आकडे वाढवून सांगितले जात आहेत, असा आरोपही देशपांडेंनी केला. (Sandeep Deshpande criticizes Thackeray Govt for increasing Corona Case)

“सावधान! सध्या कोरोनाचा नवीन स्ट्रेन आला आहे. त्याचं नाव विधिमंडळ अधिवेशन कोरोना असं आहे. जो शरीरावर कमी, पण स्वातंत्र्यावर अधिक परिणाम करतो. अधिवेशनात सरकारला प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीत, विधानसभा अध्यक्ष निवडणूक लांबणीवर टाकायची आहे, म्हणून कोरोनाची भीती दाखवली जात आहे” असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे.

“तुम्हाला घरी बसा, लोकांना लॉकडाऊनची भीती दाखवू नका”

“मुख्यमंत्री साहेबाना घरी थांबायचं आहे, म्हणून कोरोनाचे आकडे वाढून सांगता का? तुम्हाला घरी बसायचं आहे तर बसा पण लोकांना लॉकडाऊनची भीती दाखवू नका.” असं आवाहन संदीप देशपांडे यांनी केलं.

“अचानक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह कसे?”

“फक्त अचानक अमरावतीमध्ये आकडे कसे वाढले? अचानक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह कसे येतात? हा तर सरकारचा नियोजनबद्ध कार्यक्रम आहे. लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, त्याचं मुख्यमंत्र्यांना काही वाटत नाही का?” असंही संदीप देशपांडेंनी विचारलं. (Sandeep Deshpande criticizes Thackeray Govt for increasing Corona Case)

“ग्रामपंचायत निवडणुका, शिवसेना-काँग्रेसची आंदोलनं झाली, तेव्हा कोरोना नव्हता का? लोकांना फक्त फसवलं जात आहे” असंही संदीप देशपांडे म्हणाले.

पाहा व्हिडीओ :

हे ही वाचा :

‘खारं पाणी गोडं करण्याचा प्रस्ताव म्हणजे विरप्पन गँगचा नवा लुटीचा मार्ग’, संदीप देशपांडेंना पुन्हा सेनेवर बाण

…म्हणून बीएमसीतल्या विरप्पन गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल : संदीप देशपांडे

(Sandeep Deshpande criticizes Thackeray Govt for increasing Corona Case)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें