सांगली महापौर निवडणुकीच्या दिवशीही भाजपचे सात नगरसेवक नॉट रिचेबल, सत्ताधाऱ्यांचं टेन्शन कायम

नगरसेवक फोडाफोडीच्या शक्यतेमुळे महापौरपदाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (Sangli Mayor Election live updates)

सांगली महापौर निवडणुकीच्या दिवशीही भाजपचे सात नगरसेवक नॉट रिचेबल, सत्ताधाऱ्यांचं टेन्शन कायम
सांगली मिरज कुपवाड महापालिका
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 12:08 PM

सांगली : सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या (Sangli Miraj Kupwad Municipal Corporation) महापौरपदासाठी आज निवडणूक होणार आहे. ऑनलाईन सभेत निवडणूक होणार असून महापौरपदासाठी भाजप आणि राष्ट्रवादीचे उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. (Sangli Mayor Election BJP corporators missing live updates)

काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सांगली मिरज कुपवाड महापालिकेत महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या दिग्विजय सूर्यवंशी यांचा अर्ज कायम आहे. त्यामुळे महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी आणि भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांच्यात मुख्य लढत होणार आहे. ऐनवेळी आघाडी करत काँग्रेस-राष्ट्रवादीचा भाजपला धक्का देण्याचा प्रयत्न आहे.

नगरसेवक फोडाफोडीच्या शक्यतेमुळे महापौरपदाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भाजपचे सात नगरसेवक अजूनही नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे बहुमत असूनही भाजपला सत्ता टिकवण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

सत्ताधारी भाजपमध्ये फूट

महापौर-उपमहापौर निवडीवरुन सांगलीत सत्ताधारी भाजपमध्ये फूट पडल्याचे गेल्या गुरुवारी स्पष्ट झाले. नऊ नगरसेवकांनी पक्षाच्या बैठकीकडे पाठ फिरवली आणि नॉट रिचेबल झाले. बैठकीला 30 ते 32 नगरसेवकच उपस्थित होते. त्या रात्री तीन नगरसेवकांना शहराबाहेर जाण्यापासून रोखण्यात भाजपला यश आले. त्यानंतर रात्री उशिरा तीस नगरसेवकांना गोवा सहलीवर पाठवण्यात आले होते.

राष्ट्रवादीचे नेते ‘ॲक्शन मोड’मध्ये

महापौर, उपमहापौर निवडीवरुन भाजपमध्ये कुरबुरी सुरु होत्या. गेल्या बुधवारी सायंकाळी महापौरपदासाठी धीरज सूर्यवंशी आणि उपमहापौर पदासाठी गजानन मगदूम यांचे नाव निश्चित झाले. भाजपची नावे निश्चित होताच राष्ट्रवादीचे नेते ‘ॲक्शन मोड’मध्ये आले. त्यांनी भाजपच्या नाराज नगरसेवकांशी संपर्क साधला. या नगरसेवकांना गळाला लावण्याचे काम सुरू केले.

महापौर, उपमहापौर निवडीत सध्या ‘मनी पॉवर’ची चर्चा रंगली आहे. भाजप आणि विरोधी आघाडीकडून घोडेबाजाराला ऊत आला आहे. भाजपपुढे सत्ता टिकवण्याचे आव्हान आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्ता उलथवण्यासाठी पाच नगरसेवकांची गरज आहे. सध्या सात नगरसेवक गायब आहेत. त्यापैकी किती जण आघाडीच्या गळ्याला लागतात, यावर सत्तेचे गणित अवलंबून आहे.

सांगली महापौरपदासाठी इच्छुक कोण होते?

सांगलीच्या विद्यमान महापौर गीता सुतार यांची मुदत 21 फेब्रुवारी रोजी संपली. सांगलीचे महापौरपद खुले असल्याने भाजपमध्ये इच्छुकांची संख्या वाढली होती. सत्ताधारी भाजपकडून महापौर पदासाठी स्वाती शिंदे, युवराज बावडेकर, धीरज सूर्यवंशी, गणेश माळी, निरंजन आवटी यांची नावे चर्चेत होती. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे खुद्द भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सांगलीत येऊन बैठक घेऊन निर्णय घ्यावा लागला. त्यानंतर धीरज सूर्यवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

संबंधित बातम्या :

खुर्ची एक, इच्छुक पाच, सांगली महापौरपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी चंद्रकांतदादा बैठकीला

सांगलीत महापौर निवडणूक नाट्यमय वळणावर, भाजपचे नऊ नगरसेवक नॉट रिचेबल

(Sangli Mayor Election BJP corporators missing live updates)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.