कर्डिलेंच्या दोन्ही मुली आणि संग्राम जगतापांची पत्नी राष्ट्रवादीतून निलंबित

अहमदनगर : अहमदनगर महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला मदत करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 नगरसेवकांना निलंबित करण्यात आलंय. पक्षाचा आदेश न पाळल्याप्रकरणी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही कारवाई केली. शिवाय अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांचीही पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. निलंबित करण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या पत्नी शीतल जगताप आणि मेहुणी ज्योती गाडे यांचाही […]

कर्डिलेंच्या दोन्ही मुली आणि संग्राम जगतापांची पत्नी राष्ट्रवादीतून निलंबित
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

अहमदनगर : अहमदनगर महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला मदत करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 नगरसेवकांना निलंबित करण्यात आलंय. पक्षाचा आदेश न पाळल्याप्रकरणी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही कारवाई केली. शिवाय अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांचीही पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.

निलंबित करण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या पत्नी शीतल जगताप आणि मेहुणी ज्योती गाडे यांचाही समावेश आहे. ज्योती गाडे आणि शीतल जगताप या भाजप आमदार आणि किंगमेकर नेतृत्त्व शिवाजीराव कर्डिले यांच्या मुली आहेत. वाचाअहमदनगर : तीन मुली तीन पक्षात, म्हणूनच कर्डिले किंगमेकर!

भाजपला पाठिंबा दिल्यानंतर राष्ट्रवादीने या नगरसेवकांना उत्तर देण्यासाठी नोटीस पाठवली होती. नोटीशीची मुदत संपल्यानंतर अखेर कारवाई करण्यात आली. आम्ही शहराच्या विकासासाठी भाजपला मतदान केल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलं होतं. वाचानगरमध्ये भाजप आमदाराच्या मुलीची राष्ट्रवादीकडे तिकिटाची मागणी

अहमदनगर राष्ट्रवादीचे 18 नगरसेवक आणि शहर जिल्हा अध्यक्ष नावे

माणिक विधाते- शहर जिल्हाअध्यक्ष

1) सागर बोरुडे

2) मीनाक्षी चव्हाण

3) दीपाली बारस्कर

4) संपत बारस्कार

5) विनीत पाउलबुद्धे

6) सुनील त्रंबके

7) खान समद वहाब

8) ज्योती गाडे

9) शोभा बोरकर

10) कुमार वाकळे

11) रुपाली पारगे

12) अविनाश घुले

13) गणेश भोसले

14) परवीन कुरेशी

15) शेख नजीर अहमद

16) प्रकाश भागानगरे

17) शीतल जगताप

18) मीना चोपडा

18 नगरसेवक बळीचा बकरा?

राष्ट्रवादीने ही कारवाई करुन नगरसेवकांना बळीचा बकरा बनवलंय का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. कारण, भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आणि त्यांचे वडील अरुण जगताप यांना अभय देण्यात आलंय. फक्त दिखाव्यासाठी ही कारवाई करण्यात आली का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम जगताप आणि त्यांचे वडील अरुण जगताप यांच्यावर पक्षाने कोणतीही कारवाई केलेली नाही. आम्ही भाजपला विकासाच्या मुद्द्यावर पाठिंबा दिला असल्याचं संग्राम जगताप यांनी सांगितलं होतं. त्यामुळे नगरसेवकांवर कारवाई करुन नगरसेवकांना बळीचा बकरा बनवल्याची शहरात चर्चा आहे.

संबंधित बातम्या :

किंगमेकर शिवाजी कर्डिलेंच्या दोन्ही मुलींचा निकाल लागला!

18 नगरसेवक बळीचा बकरा, आमदार पिता-पुत्रांना राष्ट्रवादीचं अभय

राष्ट्रवादीचे 18 नगरसेवक निलंबित, नगर शहर जिल्हाध्यक्षाचीही हकालपट्टी

नगरमध्ये काँग्रेस फुटली, 6 नगरसेवक भाजपात!

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.