शिवसेना महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्याशिवाय राहाणार नाही, प्रॉमिस! भाजप खासदाराला संजय राऊतांचं प्रत्युत्तर

मुंबई कुणाच्या वडिलांची जहागीर आहे का? असा सवाल करणारे भाजप खासदार परवेश साहिब सिंह यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाव न घेता सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे (Sanjay Raut Answer to BJP MP Parvesh Sahib Singh).

शिवसेना महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्याशिवाय राहाणार नाही, प्रॉमिस! भाजप खासदाराला संजय राऊतांचं प्रत्युत्तर

मुंबई : मुंबई कुणाच्या वडिलांची जहागीर आहे का? असा सवाल करणारे भाजप खासदार परवेश साहिब सिंह यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाव न घेता सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. “मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे. ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा. शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्याशिवाय राहाणार नाही. प्रॉमिस”, असा घणाघात संजय राऊत यांनी ट्विटरवर केला आहे (Sanjay Raut Answer to BJP MP Parvesh Sahib Singh).

अभिनेत्री कंगना रनौतने ट्विटरवर संजय राऊत यांनी उघड धमकी दिल्याचा दावा केला होता. “शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला उघड धमकी दिली आणि मुंबईत पुन्हा परतू नये असं म्हटलं होतं. याआधी मुंबईच्या रस्त्यांवर स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?”, असा सवाल कंगनाने केला होता.

कंगनाच्या या ट्विटवरुन भाजप खासदार परवेश साहिब सिंह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टॅग करत प्रश्न विचारला होता. “मुंबई कुणाच्या वडिलांची जहागीर आहे का? महाराष्ट्रात काय होत आहे उद्धव ठाकरे?” असे सवाल भाजप खासदार परवेश साहिब सिंह यांनी उपस्थित केले होते. त्यांच्या प्रश्नांना संजय राऊत यांनी नाव न घेता सडेतोड प्रत्युत्तर दिलं (Sanjay Raut Answer to BJP MP Parvesh Sahib Singh).

संजय राऊत यांचा हल्लाबोल

दरम्यान, प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी कंगनाच्या मुंबई आणि मुंबई पोलिसांसंबंधित टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. “ही मुंबई 106 हुतात्मांनी मिळवली आहे. या मुंबईचं रक्षण आमच्या पोलिसांनी केलं आहे. 26/11 हल्ला मुंबई पोलिसांनी परतवला, कसाबला याच पोलिसांनी पकडलं, अशा या मुंबई पोलिसांबद्दल कुणीही ऐरे-गैरे काहीही बोलत असतील, तर त्यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करावी” असे राऊत म्हणाले.

“मी पोकळ धमक्या देत नाही, मी शिवसैनिक आहे, अ‍ॅक्शनवाला माणूस, नौटंक्या करत नाही, या काही मेंटल केस मुंबईत वाढल्या आहेत, त्यांच्यावर आरोग्य खात्याने उपचार करावे आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी कारवाई करावी” अशा शब्दात संजय राऊत यांनी कंगनावर हल्लाबोल केला.

“राम कदमांनी कंगना रनौतची तुलना झाशीच्या राणीशी करणं हा सर्वात मोठा अपमान आहे, झाशीची राणी ही महाराष्ट्राची वीरकन्या, महाराष्ट्राच्या अस्मितेवर गुळण्या टाकणाऱ्या कोणी स्वत:ला झाशीची राणी समजत असेल, आणि राजकीय पक्ष झाशीच्या राणीचा अपमान करणार असेल, तर राजकारण किती तळाला नेलंय हे स्पष्ट दिसतंय” असेही संजय राऊत म्हणाले.

संबंधित बातम्या :

कंगनाचं एअरपोर्टवर मनसे स्टाईल स्वागत होईल, असं वाटत असेल तर… : अमेय खोपकर

आम्ही धमकी नव्हे, अ‍ॅक्शन घेतो, महाराष्ट्राच्या अस्मितेवर ड्रग्जच्या गुळण्या सहन करणार नाही, राऊतांचा रनौतवर हल्ला

फडणवीस हे कंगना आणि राम कदमांचे बोलवते धनी, कदमांची नार्को टेस्ट करा : सचिन सावंत

“उचलली जीभ…” मुंबईची PoK शी तुलना, कंगनाला रेणुका शहाणेंनी सुनावलं

“बाईसाहेब मुंबईत पर्यटनासाठी आला होता का?’ नितीन राऊतांचा कंगनाला सवाल

“मुंबईत परत पाऊल ठेवू नकोस” संजय राऊतांनी उघड धमकी दिल्याचा कंगनाचा गंभीर आरोप

आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही, निलेश राणेंनी कंगनाला बजावले

Published On - 4:29 pm, Fri, 4 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI