ममतांना प्लॅस्टर, भाजपला दुखणं, सामनातून भाजपवर शरसंधान

पश्चिम बंगालच्या विधानसभेचं (West bengal Assembly Election 2021)  रण चांगलंच तापलंय. आरोप प्रत्यारोपांचे वार सुरु झालेत. अशातच सामना अग्रलेखातून (Saamana Editorial) ममतांना (Mamata Banerjee ) वाघिण संबोधत भाजपवर शरसंधान करण्यात आलंय.

ममतांना प्लॅस्टर, भाजपला दुखणं, सामनातून भाजपवर शरसंधान
संजय राऊत, ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Mar 12, 2021 | 6:43 AM

मुंबईपश्चिम बंगालच्या विधानसभेचं (West bengal Assembly Election 2021)  रण चांगलंच तापलंय. आरोप प्रत्यारोपांचे वार सुरु झालेत. अशातच सामना अग्रलेखातून (Saamana Editorial) ममतांना (Mamata Banerjee ) वाघिण संबोधत भाजपवर शरसंधान करण्यात आलंय. ममतांना प्लॅस्टर, भाजपला दुखणं, अशा मथळ्याखाली अग्रलेख लिहून भाजपची नौका आणखीनच खोल पाण्यात गेलीय, असं सुचवत सामनातून भाजपवर टीका करण्यात आलीय. (Sanjay Raut Appriciate mamata banerjee And Criticized BJP through Saamana Editorial over West bengal Assembly Election 2021)

ममतांच्या लंगड्या पायास भाजपवाले घाबरले ते त्यामुळेच…

आपल्या निवडणुका आता खोटेपणा व सहानुभूती या दोन शस्त्रांनीच लढल्या जातात. प. बंगालात दोन्ही बाजूंनीच या शस्त्रांचा खणखणाट सुरु आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेले तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना हिंमत असेल तर नंदीग्राममधून आपल्याविरुद्ध निवडणूक लढवून दाखवा, असे आव्हान देताच ममता बॅनर्जी यांनी वाघिणीप्रमाणे भक्ष्यावर झेप घेतली व नंदीग्राममध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या विरोधात निवडणुकीचा अर्ज भरला. अशी हिंमत ज्या वाघिणीमध्ये आहे तिच्यासमोर कुणाचा निभाव लागणार? ममतांच्या लंगड्या पायास भाजपवाले घाबरले ते त्यामुळेच…

वाघीण जखमी होते तेव्हा ती अधिक हिंस्र होते…

नंदीग्राममध्ये प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जखमी झाल्या आहेत. वाघीण जखमी होते तेव्हा ती अधिक आक्रमक आणि हिंसक होत असते. त्यामुळे ममतांची जखम त्यांच्या विरोधकांना जास्तच भारी पडणार आहे.

नेमका प्रकार काय?

ममता या नंदीग्राम येथून निवडणूक लढत आहेत. त्या नंदीग्राम येथे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेल्या. त्यानंतर प्रचाराच्या दरम्यान बिरुलिया येथे मंदिरासमोर त्यांच्या गाड्यांचा ताफा थांबला. कारच्या बाहेर उतरून त्या देवाला नमस्कार करत असताना चार-पाच लोक अचानक धावत आले आणि त्यांनी गरज नसताना दरवाजा ढकलून ममतांना जखमी केले. ममता यांच्या पायास मोठी दुखापत झाली असून त्यांचा पाय प्लॅस्टरमध्ये आहे. हा अपघात नसून विरोधकांनी जाणूनबुजून केलेला हल्ला आहे, असे ममता म्हणत आहेत तर लोकांची सहानुभूती मिळविण्याचा हा प्रयत्न आहे. या अपघाताची सी.बी.आय. चौकशी करा, अशी मागणी भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी केली.

प्लॅस्टर ममतांच्या पायाला, पण चिंता भाजपला

ममतांच्या पायाला इजा झाली हे बरोबर. त्यांच्या पायाला प्लॅस्टर पडले हेही खरेच. मात्र त्या प्लॅस्टरच्या सी.बी.आय. चौकशीची मागणी हा प. बंगाल निवडणुकीतील सगळ्यांत मोठा विनोद म्हणावा लागेल. प्लॅस्टर ममतांच्या पायाला, पण चिंता भाजपला. ममतांच्या पायास पडलेले प्लॅस्टर भाजपच्या किमान दहा-वीस जागा नक्कीच जखमी करू शकते. भारतीय जनता पक्षाने प. बंगालात सर्व शक्ती पणास लावली आहे. ममतांची कोंडी करण्याचा हरएक प्रयत्न सुरू आहे. ममतांचा पक्ष रोज फोडला जात आहे. तरीही ममतांचा प. बंगालातील जोर कायम आहे. प. बंगालातील लढाई ही ममता विरुद्ध नरेंद्र मोदी अशी झाली आहे. त्यामुळे साऱ्या जगाचे लक्ष प. बंगालात काय घडतेय याकडेच लागले आहे.

विधानसभेची लढाई वेगळी

भारतीय जनता पक्षाने प. बंगालात ‘माहोल’ गरम केला आहे व प्रत्येक निवडणूक ते असाच माहोल निर्माण करून जिंकत असतात. असाच माहोल निर्माण करून भाजपने प. बंगालातील लोकसभेच्या 18 जागा जिंकल्या. हे यश मानावेच लागेल. 18 लोकसभा मतदारसंघांमधील हे यश म्हणजे साधारण 120 विधानसभा जागांवर भाजपास चढाई मिळाली असे मानले तरी विधानसभेची लढाई वेगळी आहे.

बंगालची निवडणूक धार्मिक आणि व्यक्तिगत पातळीवर नेऊन ठेवण्याचे श्रेय भाजपला

प. बंगाल निवडणुकीत भाजपच्या प्रचाराचा मुद्दा काय? तर ममता बॅनर्जी या ‘जय श्रीराम’ म्हणत नाहीत. त्यांच्या राजवटीत ‘जय श्रीराम’ म्हणायला बंदी आहे. ममता त्यांची प्रतिमा हिंदूविरोधी बनवून भाजप प. बंगालात मते मागत आहे. यावर ममतांनी सांगितले, ”मी ब्राह्मण आहे. धर्माचं राजकारण करू नका. मला हिंदू धर्म शिकवू नका.” नंदीग्राममध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी ममता रेया पाडा येथील 1000 वर्षे जुन्या महारुद्र सिद्धनाथ मंदिरात गेल्या. तेथे पूजा केली. ‘जय श्रीराम’ला ममतांचा विरोध आहे, असा प्रचार करणाऱ्यांना उत्तर म्हणून ममता बॅनर्जी यांनी जाहीरसभेत ‘चंडी पाठ’ म्हणून दाखवले. प. बंगालची निवडणूक अशा धार्मिक आणि व्यक्तिगत पातळीवर नेऊन ठेवण्याचे श्रेय भारतीय जनता पक्षाला द्यावेच लागेल.

मोदींचं चालतं पण ममतांनी केलं तर सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न….

प. बंगालसारख्या मोठय़ा राज्याची निवडणूक जय श्रीराम, चंडी पाठ, ममतांच्या पायाचे प्लॅस्टर याभोवतीच फिरत आहे. हे आपल्या लोकशाहीचे विद्रुपीकरण आहे. ममतांच्या पायास जखम झाली. आता त्याच अवस्थेत लंगडत किंवा हातात कुबड्या घेऊन कार्यकर्त्यांच्या आधाराने ममता बॅनर्जी प्रचार करतील व सहानुभूती मिळवतील याची भीती भाजपला वाटत असेल तर भाजप हा तकलादू मुद्द्यांवर प. बंगालच्या मैदानात उतरला आहे. पंतप्रधान मोदींनाही अधूनमधून हुंदके फुटतात. अश्रूंचा बांध फुटतो, ते बरे चालते. पण ममतांच्या पायास जखम झाली हा मात्र लोकांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न!

(Sanjay Raut Appriciate mamata banerjee And Criticized BJP through Saamana Editorial over West bengal Assembly Election 2021)

हे ही वाचा :

ADR Report : 4 वर्षात तब्बल 170 आमदारांनी काँग्रेसला ठोकला रामराम!

‘भारत लोकशाहीप्रधान देश राहिला नाही’, राहुल गांधींचा गंभीर आरोप; राहुल गांधी ‘एजंट’, भाजपचा पलटवार

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.