संजय राऊतांच्या लेखणीला तीच धार, तोच वेग, 'सामना'चं संपादकीय थेट लीलावती रुग्णालयातून

शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut at lilavati hospital) यांच्या हृदयात दोन ब्लॉकेज असल्याचं निदान झालं आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

संजय राऊतांच्या लेखणीला तीच धार, तोच वेग, 'सामना'चं संपादकीय थेट लीलावती रुग्णालयातून

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut at lilavati hospital) यांच्या हृदयात दोन ब्लॉकेज असल्याचं निदान झालं आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. संजय राऊत (sanjay raut at lilavati hospital) सध्या लीलावती रुग्णालयात अडमिट आहेत. मात्र राऊत यांची लेखणी रुग्णालयातही त्याच वेगाने चालत आहे. संजय राऊत यांचा रुग्णालयातील एक्स्क्लुझिव्ह व्हिडीओ टीव्ही 9 मराठीच्या हाती लागला आहे.

या व्हिडीओमध्ये संजय राऊत बेडवर बसून लिखाण करताना दिसत आहेत. संजय राऊत यांच्यावर उपचार सुरु असतानाही ते आपलं प्रथम कर्तव्य अर्थात लिखाण करत आहेत. शिवसेनेचं मुखपत्र सामनाचं संपादकीय संजय राऊत यांनी लिहून काढलं. उपचार सुरु असलेल्या बेडवर बसून छोटं टेबल घेऊन संजय राऊत यांनी सामनाचं संपादकीय लिहून काढलं.

संजय राऊत यांच्या लेखणीची धार संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. संजय राऊत यांची लेखणी आणि गेल्या 8-10 दिवसांपासून सुरु असलेल्या पत्रकार परिषदा, यामुळे शिवसेना सत्तास्थापनेच्या ड्रायव्हिंग सीटवर पाहायला मिळाली. मात्र अटीतटीच्या क्षणी संजय राऊत यांची प्रकृती काहीशी बिघडली आणि त्यांना रुग्णालयात जावं लागलं.

संजय राऊत यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. ते बरे होऊन लवकरच घरी परततील आणि पुन्हा राजकारणात सक्रीय होतील.

संजय राऊत यांच्या हृदयात दोन ब्लॉकेज

शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut angiography) यांच्या हृदयात दोन ब्लॉकेजस आढळले आहेत. संजय राऊत हे काल दुपारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात  (lilavati hospital) दाखल झाले. लीलावती रुग्णालयात त्यांची (sanjay raut angiography) अँजिओग्राफी करण्यात आली. त्यामध्ये त्यांच्या हृदयात दोन ब्लॉकेजस असल्याचं आढळलं. त्यामुळे त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. लीलावती रुग्णालयात डॉ.मॅथ्यू यांनी संजय राऊतांची अँजिओप्लास्टी केली.

संबंधित बातम्या 

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या हृदयात दोन ब्लॉकेज 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *