शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या हृदयात दोन ब्लॉकेज

संजय राऊत हे आजच दुपारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात  (lilavati hospital) दाखल झाले. लीलावती रुग्णालयात त्यांची (sanjay raut angiography) अँजिओग्राफी करण्यात आली.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या हृदयात दोन ब्लॉकेज

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut angiography) यांच्या हृदयात दोन ब्लॉकेजस आढळले आहेत. संजय राऊत हे आजच दुपारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात  (lilavati hospital) दाखल झाले. लीलावती रुग्णालयात त्यांची (sanjay raut angiography) अँजिओग्राफी करण्यात आली. त्यामध्ये त्यांच्या हृदयात दोन ब्लॉकेजस असल्याचं आढळलं. त्यामुळे सध्या त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात येत आहे. लीलावती रुग्णालयात डॉ.मॅथ्यू हे संजय राऊतांची अँजिओप्लास्टी करीत आहेत.

संजय राऊत (Sanjay Raut lilavati hospital) हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीला उपस्थित होते. वांद्रे येथील हॉटेल ताज लँड इथं ही बैठक झाली. या बैठकीनंतर शरद पवार वाय बी चव्हाण सेंटर तर उद्धव ठाकरे मातोश्रीवर रवाना झाले. मात्र संजय राऊत हे थेट लीलावती रुग्णालयात गेले.

संजय राऊत यांना प्रकृतीचा त्रास होत असल्याने ते थेट रुग्णालयात गेले.  त्यांना अस्वस्थ वाटू लागत असल्याने रुग्णालयात जावं लागलं. संजय राऊत यांच्यावर अँजिओग्राफी झाली. त्यामध्ये त्यांच्या हृदयात ब्लॉकेज असल्यामुळे त्यांची आता अँजिओप्लास्टी सुरु आहे. राऊत सध्या 11 व्या मजल्यावर विशेष कक्षात आहेत.

सध्या त्यांच्याबरोबर त्यांचे बंधू सुनील राऊत, कुटुंबातील सदस्य प्रवीण राऊत, सुजित पाटकर तसेच शिवसेना पदाधिकारी भाऊसाहेब चौधरी, संजय सावंत आहेत. चार दिवसांपूर्वी राऊत यांनी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी केली होती. डॉ. अजित मेनन यांच्या देखरेखीखाली आहेत. ताण हे प्रकृती अस्वस्थाचे मुख्य कारण सांगितले जात आहे. पुढचे 2 दिवस ते लीलावती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल असतील.

अँजिओग्राफी म्हणजे काय?

हृदयविकाराच्या आजाराचे निदान करण्यासाठी जी चाचणी केली जाते त्याला अँजिओग्राफी म्हणतात. हृदयविकार आहे की नाही हे या चाचणीतून स्पष्ट होतं. त्यानंतर उपचाराची दिशा ठरवली जाते.  ही चाचणी सोपी, सुरक्षित आणि पाच ते दहा मिनिटांत पूर्ण होणारी आहे. रुग्ण पूर्णवेळ जागा असतो  केवळ लोकल अॅनेस्थेशियाच्या खाली ही चाचणी केली जाते. इतकंच नाही तर या तपासणीदरम्यान डॉक्टर रुग्णाशी संवादही साधत असतो.

संबंधित बातम्या

 संजय राऊत अचानक लीलावती रुग्णालयात दाखल, अँजिओग्राफी होणार   

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI