AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर भाजपचे हस्तक?; संजय राऊत यांचा टोमणा काय?

"रामदास आठवले, जोगेंद्र कराडे, राजेंद्र गवई हे सर्व आंबेडकरांच्या खरे वारसदार विचारधारेचे शिलेदार आहेत, असं आम्ही म्हणालो तर त्यात काहीही चुकीचं नाही", असे संजय राऊत म्हणाले.

राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर भाजपचे हस्तक?; संजय राऊत यांचा टोमणा काय?
| Updated on: Aug 14, 2024 | 11:22 AM
Share

Sanjay Raut Criticise Raj Thackeray : “आम्ही गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना 7 जागा देणार होतो. अकोल्यासह सात जागांचा यात समावेश होता. तरीही ते त्यांच्या बाजूला वळले. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि भूमिकेचा अजिबात विचार करत नाहीत”, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. यावेळी संजय राऊतांनी राज ठाकरेंनाही अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या विचाराबद्दल आणि त्यांच्या पाठिंब्याबद्दल भाष्य केले. “प्रकाश आंबेडकर हे आंबडेकर आहेत. आम्ही आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानतो. या देशावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत. प्रकाश आंबेडकरांना जर याचे भान असते तर त्यांनी अशाप्रकारचे वक्तव्य केले नसते. रामदास आठवले, जोगेंद्र कराडे, राजेंद्र गवई हे सर्व आंबेडकरांच्या खरे वारसदार विचारधारेचे शिलेदार आहेत, असं आम्ही म्हणालो तर त्यात काहीही चुकीचं नाही”, असे संजय राऊत म्हणाले.

“गेली अनेक वर्ष रामदास आठवले या महाराष्ट्रात आंबेडकरांचा विचार पुढे नेत आहेत. गेली अनेक वर्ष ते सत्तेत आहेत. त्यांचे सर्वांशीच सलोख्याचे संबंध आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशात ज्या पद्धतीने काम करत होते, त्यापद्धतीनेच आठवले हे काम करत आहेत. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारा, संघटना याचे खरे वारसदार हे रामदास आठवले आहेत, असे म्हणायला हवे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे देशावर मोठे उपकार आहेत”, असेही संजय राऊतांनी यावेळी म्हटले.

प्रकाश आंबडेकर आमच्यासोबत येणार होते, पण…

“प्रकाश आंबडेकर हे आमच्यासोबत येण्याचा प्रयत्न करत होते. ते महाविकासआघाडीचे घटक होते. लोकसभेत आम्ही त्यांना ७ जागा देणार होतो. अकोल्यासह सात जागांचा यात समावेश होता. तरीही ते त्यांच्या बाजूला वळले, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि भूमिकेचा विचार अजिबात करत नाहीत”, असा धक्कादायक खुलासाही संजय राऊतांनी केला.

महाराष्ट्रात भाजपचे दोन हस्तक

“आपल्या भूमिकेमुळे राष्ट्रद्रोही शक्तींना, धर्मांध शक्तींना जर मदत होत असेल, मग ते कोणीही असो. या महाराष्ट्रात दोन असे नेते आहेत, जे अशाप्रकारे हस्तकाचे काम करतात. कधी मोदी-शाहांना पाठिंबा देतात, कधी बेईमान शिंदे गटाला पाठिंबा देतात, हे दोन महाराष्ट्रातील जे नेते आहेत. त्यांच्यावर आता महाराष्ट्राला विचार करण्याची वेळ आली. लोकसभेत यांचं कोणी ऐकलं नाही. पाडापाडी करणं आणि त्या बदल्यात व्यवहार करणं हे यांचं काम आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन या धर्मांध शक्तींना धडा शिकवायला हवा. या हस्तकांनी संपूर्ण देशात उमेदवार उभे करायला हवेत, म्हणजे त्यांना जास्त पैसे मिळतील. महाराष्ट्रात त्यांना कमी पैसे मिळतात. देशात त्यांना जास्त पैसे मिळतील”, असा टोलाही त्यांनी राज ठाकरेंना लगावला.

Follow Us
कराळे मास्तरांचा पारा चढलाच! थेट बड्या नेत्याचं नाव घेत केला आरोप,
कराळे मास्तरांचा पारा चढलाच! थेट बड्या नेत्याचं नाव घेत केला आरोप, व्हिडीओ व्हायरल
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा विखेंवर गंभीर आरोप; म्हणाले, वर्षभर...
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा विखेंवर गंभीर आरोप; म्हणाले, वर्षभर घात केला अन्...
विद्यानंद बापटांनंतर विवेकानंद नावाचा तरुण तुफान चर्चेत; उद्धव ठाकरे..
विद्यानंद बापटांनंतर विवेकानंद नावाचा तरुण तुफान चर्चेत; उद्धव ठाकरेंनी थेट...
3.16 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप! सामंत, लाडांनी आकडेवारीच सांगितली
Maratha Reservation | मराठवाड्यात 3.16 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप! उदय सामंत-प्रसाद लाडांनी आकडेवारीच सांगितली
मनोज जरांगेंची पाटलांची प्रकृती खालावली;12 तारखेला अंतरवालीत होणार...
मनोज जरांगेंची पाटलांची प्रकृती खालावली; 12 तारखेला अंतरवालीत होणार बैठक
2009 मधील वसंत डावखरे प्रकरणाचा निकाल लागणार? उद्धव ठाकरे...
2009 मधील वसंत डावखरे प्रकरणाचा निकाल लागणार? उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंचा व्हिसीद्वारे जबाब
जरांगे नावाचं माकड तोंडाला येईल ते बोलतंय! अजय बारस्करांचा जरांगेंवर घ
Ajay Baraskar | जरांगे नावाचं माकड तोंडाला येईल ते बोलतंय! अजय बारस्करांचा मनोज जरांगेंवर घणाघात
धक्कादायक! काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण... अहिल्यानंगरमध्ये थरकाप...
धक्कादायक! काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण... अहिल्यानंगरमध्ये थरकाप उडवणारा प्रकार
श्रेयस तळपदेंचं DJ बंदीवर मोठं वक्तव्य; सण साजरे करा, पण...
Shreyas Talpade | श्रेयस तळपदेंचं DJ बंदीवर मोठं वक्तव्य; सण साजरे करा, पण...
भाजपची साथ सोडली तर राष्ट्रवादीसोबत विलीनीकरण...रोहित पवार काय म्हणाले
भाजपची साथ सोडली तर राष्ट्रवादीसोबत विलीनीकरण... रोहित पवार असं काय म्हणाले?