AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशाच्या न्यायव्यवस्थेविषयी आदर बाळगावा असे वातावरण नाही, संजय राऊतांचे गंभीर आरोप, म्हणाले, जोडे मारावे अशी..

संजय राऊत यांनी नुकताच गंभीर आरोप केले असून मागच्या 10 वर्षात देशात कसे वातावरण आहे, हे सांगितले. संजय राऊत यांनी केलेल्या खुलाशानंतर एकच खळबळ उडाल्याचे बघायला मिळत आहे.

देशाच्या न्यायव्यवस्थेविषयी आदर बाळगावा असे वातावरण नाही, संजय राऊतांचे गंभीर आरोप, म्हणाले, जोडे मारावे अशी..
Sanjay Raut
| Updated on: Oct 07, 2025 | 1:01 PM
Share

नुकताच संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली. संजय राऊत म्हणाले की, देशात अशाप्रकारच्या घटना घडण्याचे कारण आहे. देशात गेल्या 10 वर्षात जे विष कालवले गेले ते धर्मांधता, अंधभक्तीचे त्यातून असे माथेफिरू निर्माण झाले. देशाच्या न्यायव्यवस्थेविषयी आदर बाळगावा असे वातावरण नाही. न्यायव्यवस्थेला जोडे मारावे अशी परिस्थिती आहे. पण न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या कामाशिवायी देशाला आदर आहे. आम्हाला भूषण गवई हे आशेचे किरण दिसत आहेत. गेल्या 10 वर्षात भारतीय न्यायव्यवस्थेचे पूर्ण धिंडवडे मोदी आणि शाहांनी काढले आहेत. त्यामुळे भूषण गवई यांच्यावर हल्ला करणारे आणि हल्ल्याचा प्रयत्न करणारे हे भारतीय जनता पक्षाच्या ट्रेनिंग स्कूलचेच लोक आहेत, सनातनी म्हणून घेणारे.

पुढे संजय राऊत यांनी म्हटले की, विष्णुचा अवतार नक्की कोण? आणि त्याला का राग आला? नरेंद्र मोदी हे विष्णुचे 13 वे अवतार आहेत, त्यामुळे त्याला राग आला का? असे ते म्हणतात की, सरन्यायाधिशांनी टिप्पणी केली, त्यामुळे त्यांना राग आला. अशी बिनडोक आणि हिंदुत्वाला कलंक लावणारी ही लोक आहेत. हे खरे हिंदू नाहीत. ज्याने सनातनच्या नावाखाली हल्ला केला, त्याने भारताच्या संविधानावर हल्ला केला.

भारताच्या आत्मावर हल्ला केला. भारतातील सरन्यायाधिश पदावरील व्यक्तीवर हा हल्ला झाला. ज्यांच्याविषयी या देशाला प्रचंड आदर आहे. त्यांना जो कमी कालावधी मिळाला, त्यांना यापेक्षा जास्त मिळायला हवा होता, अशी भावना लोकांची आहे, म्हणजे विचार करा किती जास्त आदर आहे. अशा व्यक्तीवर बूट फेकून स्वत:ला सनातनी जाहिर करणे हे या देशाच्या प्रतिष्ठेचे धिंदवडे भारतीय जनता पक्षाने काढले आहेत.

अंधभक्तांना कधी पश्चाताप होत नाही. आपली न्यायव्यवस्था प्रतिष्ठा गमावून बसली आहे, ती यामुळे…शिवसेना गेली तीन वर्ष न्यायासाठी झगडत आहे. कायदेशीर लढाई लढत आहे पण आम्हाला तारीख पे तारीख मिळत आहे. आम्हाला न्याय मिळेल, आशा आज पण आम्हाला आहे. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी अशी चर्चा झाली नाहीये, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.