आता गोव्यात राजकीय भूकंप घडेल, संजय राऊतांनी दुसरी वात पेटवली

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut on Goa Vidhan sabha) यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद खेचून आणल्यानंतर आपला मोर्चा गोव्याकडे वळवला आहे.

आता गोव्यात राजकीय भूकंप घडेल, संजय राऊतांनी दुसरी वात पेटवली

मुंबई :  शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut on Goa Vidhan sabha) यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद खेचून आणल्यानंतर आपला मोर्चा गोव्याकडे वळवला आहे. आता गोव्यात राजकीय भूकंप घडेल, असा इशारा संजय राऊत (Sanjay Raut on Goa Vidhan sabha) यांनी भाजपला दिला. 40 विधानसभा सदस्य असलेल्या गोव्यात सध्या भाजपच्या नेतृत्त्वात प्रमोद सावंत यांचं सरकार आहे. हे सरकार उलथवून टाकण्याचा इशारा संजय राऊथ यांनी दिला.

लवकरच गोमंतक पार्टीसोबत हातमिळवणी करुन आम्ही गोव्यात सरकार स्थापन करु, असं संजय राऊत म्हणाले. इतकंच नाहीतर आता हळूहळू प्रत्येक ठिकाणी आमचंच सरकार येईल, अशी गर्जना संजय राऊत यांनी केली.

“गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई आणि 3 अन्य आमदार हे शिवसेनेसोबत युती करत आहेत. गोव्यात नवी युती आकाराला येईल. जे महाराष्ट्रात घडलं, ते गोव्यात घडेल. गोव्यात लवकरच चमत्कार घडेल”, असं संजय राऊत म्हणाले.

गोव्याचे 4 आमदार महाराष्ट्रात

गोव्यात आमदार फोडाफोडीचे राजकारण सुरु, ‘गोमंतक’चे 4 आमदार मुंबईत, शिवसेना आमदार उदय सामंत यांनी 4 आमदारांना लेमन ट्री हॉटेलमध्ये ठेवल्याची माहिती मिळत आहे.

गोवा विधानसभा

गोवा विधानसभेसाठी 2017 मध्ये निवडणूक झाली होती. सध्या गोव्यात भाजप युतीचं सरकार आहे. यामध्ये भाजप, गोवा फॉरवर्ड पार्टी, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि अपक्षांचा समावेश आहे. गोवा विधानसभेच्या 40 जागांपैकी सध्या काँग्रेसकडे सर्वाधिक 14 जागा होत्या.  तर भाजप आमदार फ्रान्सिस डिसूजा आणि मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने भाजपकडे आता 12 आमदारांचं बळ राहिलं.  गोवा फॉरवर्ड पार्टी, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि अपक्ष असे 3-3 आमदार आहेत, तर 1 आमदार राष्ट्रवादीचा आहे.

गोवा विधानसभेसाठी 2017 मध्ये विधानसभा निवडणूक झाली होती. त्यावेळी 40 पैकी 17 जागा मिळवून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र भाजपने अन्य पक्षांशी जुळवाजुळव करुन सत्तास्थापन केली होती. भाजपला त्यावेळी 13 जागा मिळाल्या होत्या. भाजपला गोवा फॉरवर्ड पक्षाच्या 3 आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या 3 आमदारांनी पाठिंबा दिला होता.

काँग्रेसचे 12 आमदार भाजपसोबत

दरम्यानच्या काळात मोठ्या उलथापालथी झाल्या. मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने गोव्यात प्रचंड राजकीय घडामोडी घडल्या. काँग्रेसच्या 12 आमदारांनी भाजपला साथ दिली. त्यामुळे भाजपचं संख्याबळ 27 वर पोहोचलं.

आजच्या घडीला गोव्याचं पक्षीय बलाबल

 • भाजप – 27
 • काँग्रेस – 05
 • अपक्ष – 03
 • गोवा फॉरवर्ड पार्टी – 3
 • महाराष्ट्रवादी गोमंतक- 1
 • राष्ट्रवादी काँग्रेस – 1

एकूण – 40

बहुमताचा आकडा : 21

2017 मध्ये गोव्यात कुणाला किती जागा? goa vidhan sabha election result 2017

 • भाजप – 13
 • काँग्रेस – 17
 • राष्ट्रवादी काँग्रेस -1
 • महाराष्ट्रवादी गोमंतक – 3
 • गोवा फॉरवर्ड पार्टी – 3
 • अपक्ष/इतर – 3

संबंधित बातम्या  

गोवा विधानसभा: गोव्याची सध्याची राजकीय परिस्थिती काय? 

गोव्यात ‘ही’ पाच नावं मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत 

Published On - 11:04 am, Fri, 29 November 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI