AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तेजस्वी यादव बिहार निवडणुकीचे ‘मॅन ऑफ द मॅच’ : संजय राऊत

बिहार विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये राजदच्या नेतृत्वाखालील महागठबंधनने आघाडी घेतल्याचं चित्रं होतं, मात्र दुपारनंतर हे चित्रं पालटलं आणि एनडीएने सरशी घेतली आहे.

तेजस्वी यादव बिहार निवडणुकीचे 'मॅन ऑफ द मॅच' : संजय राऊत
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Nov 10, 2020 | 4:19 PM
Share

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल हळूहळू समोर येत आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये राजदच्या नेतृत्वाखालील महागठबंधनने आघाडी घेतल्याचं चित्रं होतं, मात्र दुपारनंतर हे चित्रं पालटलं आणि एनडीएने सरशी घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा बिहारमध्ये एनडीएचं सरकार येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाने सध्या 77 जागांवर आघाडी घेतली आहे, तर राष्ट्रीय जनता दल (राजद) 65 जागांवर आघाडीवर आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांचा जदयू पक्ष तिसऱ्या क्रमांकार आहे. या निवडणुकीत राजदचे नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी एकट्याने भाजप आणि जदयूचा जोरदार सामना करत 65 जागांवर आघाडी घेतली आहे. त्यांना त्यांच्या मित्रपक्षांकडून योग्य साथ न मिळाल्याने महागठबंधन बहुमतापासून लांब आहे. परंतु तेजस्वी यादव यांनी केलेल्या संघर्षाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीदेखील तेजस्वी यादव यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. (Bihar Election Result 2020 LIVE Updates)

संजय राऊत म्हणाले की, आतापर्यंत केवळ 30-40 टक्के मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण होईल. आतापर्यंतचे निकाल एनडीएच्या (भाजप-जदयू) बाजूने लागले आहेत. परंतु मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा पक्ष तिसऱ्या स्थानावर आहे, तर राजदच्या तेजस्वी यादव यांनी एनडीएला जोरदार टक्कर दिली आहे. त्यामुळे तेजस्वी यादव या निवडणुकीचे ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरले आहेत. तेजस्वी यादव यांना ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हटलं पाहिजे कारण, कधी कधी एखादा संघ हरतो, परंतु पराभूत संघातील एक खेळाडू संपूर्ण टीमला पुढे घेऊन जातो, संघर्ष करतो, जिंकण्यासाठी ताकद पणाला लावतो. त्यामुळे तेजस्वी यादव यांच्या संघर्षामुळे या निवडणुकीचे ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हटलं पाहिजे.

राऊत म्हणाले की, तेजस्वी यादव यांनी एकट्याने सर्वांना तोंड दिलं आहे. त्यांना कोणाचीही मदत नव्हती. त्यांचे मित्रपक्ष कमजोर आहेत. मित्रपक्षांनीही मोठी मदत केली नाही. त्यांना सध्या त्यांच्या कुटुंबाचीदेखील मदत मिळालेली नाही. राज्यातील आणि देशातील सरकार त्यांच्या विरोधात आहे. केंद्रातील, राज्यातील मंत्री आणि अनेक बडे नेते त्यांच्या विरोधात आहेत, अशा प्रतिकूल परिस्थितीत तेजस्वी यादव यांनी सर्वांचा सामना केला आणि चांगलं यश मिळवलं आहे. त्यामुळे बिहारला एक मोठा राजकीय चेहरा मिळाला आहे.

भाजप ‘मोठा भाऊ’ ठरला तरीही मुख्यमंत्री नितीश कुमारच!

आतापर्यंत हाती आलेल्या निवडणुकीच्या कलानुसार नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील NDA ला बहुमत मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असं असलं तरी नितीश कुमार यांच्या JDUला भाजपपेक्षा कमी जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे बिहारमध्ये भाजप मोठा भाऊ ठरण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत NDAची सत्ता आली तरी नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री असतील, असं भाजप नेत्यांकडून आवर्जुन सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्रात शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिलं नाही म्हणून शिवसेनेनं भाजपशी फारकत घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करुन सत्ता स्थापन केली. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपला विरोधी बाकांवर बसावं लागलं. हा मोठा अनुभव गाठीशी असलेले भाजप नेते बिहारमध्ये धोका पत्करणार नाहीत. बिहारमध्ये भाजप जरी मोठा भाऊ ठरला तरी नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद द्यावं लागेल, असं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

संबंधित बातम्या

शिवसेनेने महाराष्ट्रात हिसका दाखवलाय, त्यामुळे बिहारमध्ये भाजप शब्द फिरवणार नाही: राऊत

Bihar Election Result 2020 | बिहारमध्ये 23 पैकी 21 जागांवर शिवसेनेला ‘नोटा’पेक्षाही कमी मतं!

Bihar Election Result ! मतमोजणी धीम्यागतीने नाही, पण…; निकालाला उशीर का लागतोय? निवडणूक आयोगाने दिलं ‘हे’ कारण

Bihar Election: थोडी वाट पाहा, बिहारमध्ये महागठबंधनलाच बहुमत मिळणार; राजद नेत्याचा छातीठोक दावा

(Tejashwi Yadav is Man of the match in Bihar election result 2020 )

Follow Us
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज?
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज? 'त्या' व्हिडीओचं सत्य काय?
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?