AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्रकार म्हणाले, पुरावे पुरावे, राऊत म्हणाले, सोड रे, कोणय सोमय्या, राऊतांकडे पुरावे नाहीत?

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केले आहेत. किरीट सोमय्या ईडीच्या नावाखाली धमक्या देतात असा आरोप राऊत यांनी केला.

पत्रकार म्हणाले, पुरावे पुरावे, राऊत म्हणाले, सोड रे, कोणय सोमय्या, राऊतांकडे पुरावे नाहीत?
संजय राऊत
| Edited By: | Updated on: Feb 16, 2022 | 10:59 AM
Share

मुंबई: किरीट सोमय्यानं (Kirit Somaiya ) शेकडो कोटी रुपये गोळा केले आहेत. त्यातील किती टक्के ईडीकडे गेले आहेत ते बाहेर सांगत असतो, असं संजय राऊत म्हणाले. 8 जेवीपीडी येथील सुजित नवाब हा प्लॉट आहे. किरीट सोमय्या आणि त्याचा मित्र अमित देसाई यांनी धमकी देत 100 कोटी रुपयांची जमीन मातीमोल किमतीला घेतली. ईडीची (ED)धमकी देऊन किरीट सोमय्या आणि त्याचा मित्र अमित देसाई यांनी नावावर करुन घेतला. 110 कोटी रुपयाचा प्लॉट किरीट सोमय्यानं मातीमोल किमतीला घेतला. त्यासंदर्भात लवकरच पुरावे घेऊन येईन. किरीट सोमय्यांनी त्यातील 15 कोटी रुपये ईडीच्या कोणत्या अधिकाऱ्याला नेऊन दिले हे सागांव, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. पत्रकारांनी पुरावे मागितले तर त्यावर किरीट सोमय्या कोण आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी त्यावर भाष्य करणं टाळलं. त्यामुळं संजय राऊत यांच्याकडे पुरावे आहेत की नाहीत यासंदर्भात प्रश्न उपस्थित झाले आहेत.

ईडीच्या नावावर काय चाललंय देशाला कळायला हवं

ईडीच्या नावावर धमक्या , क्रिमिनल सिंडिकेट, ईडीला पैसे द्यावे लागतात, याचा लवकरच भांडाफोड होईल. काल मी 19 बंगले दाखवा म्हणलं दाखवलं का? अर्जून खोतकर यांना किती त्रास दिला. मुंबईतील बिल्डरांकडून पैसे घेतले गेले.आठ जेवीपीडी स्कीम, सुजीत नवाब नावाचा प्लॉट आहे. किरीट सोमय्या आणि  मित्र अमित देसाई या दोघांनी मूळ मालकाला ईडीची धमकी देऊन 100 कोटीचा प्लॉट मातीमोल किमतीत स्वत: च्या नावावर करुन घेतला. 110 कोटीची जमीन मातीमोल किमतीला घेतली.ईडीच्या नावावर काय चाललेय हे देशाला कळायला पाहिजे. त्यातील 15 कोटी रुपये ईडीच्या अधिकाऱ्याला दिले आहेत. ईडीनं त्याची दखल घ्यावी, अन्यथा ईडीनं अधिकाऱ्याची नावं जाहीर करु, असं संजय राऊत म्हणाले.

अर्जुन खोतकर, भावना गवळी, आनंदराव अडसूळ यांना का त्रास दिला जातो.हरियाणातील दुधवाला महाराष्ट्रात येतो, साडे सात हजार कोटी रुपयांचा मालक होतो.अमोल काळे कोण आहे त्याला बाहेर आणा,परत परत बोलायला लावू नका, अशा शब्दात संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केले.

पाहा व्हिडीओ

इतर बातम्या :

पुन्हा रश्मी ठाकरेंच्या बंधूवरुन सोमय्यांनी मुख्यमंत्र्यांना घेरलं, कर्जतच्या मंदिराची जागा कशी नावावर झाली ते पुन्हा सांगितलं

महाराष्ट्राचं डोकं गरगरलं! सोमय्या म्हणतात, ज्या 19 बंगल्यांचा टॅक्स रश्मी ठाकरे भरतायत तेच चोरीला ! कसे?

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.