महाराष्ट्रातील भाजपवाले लंडनमध्ये सरकार स्थापन करु शकतील, महाराष्ट्रात नाही : संजय राऊत

महाविकास आघाडी सरकार पुढील निवडणूकही एकत्र लढेल, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. (Sanjay Raut taunts Maharashtra BJP can form Government in London)

महाराष्ट्रातील भाजपवाले लंडनमध्ये सरकार स्थापन करु शकतील, महाराष्ट्रात नाही : संजय राऊत

मुंबई : महाराष्ट्रातल्या विरोधीपक्षाचं, म्हणजे भाजपचं सरकार लंडन किंवा न्यूयॉर्कमध्ये येऊ शकतं, तिकडे संकट गंभीर आहे. तिथे जाऊन ते राज्य निर्माण करु शकतात, असा जोरकस टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला. महाराष्ट्रात सत्तापालट होण्याच्या चर्चा जोर धरु लागल्यानंतर राऊत यांनी भाजपवर शरसंधान साधलं. आमच्यात कोणीही फुटणार नाही, फुटलं तर विरोधीपक्षाचं नशीबच फुटेल, असा टोमणाही संजय राऊत यांनी मारला. (Sanjay Raut taunts Maharashtra BJP can form Government in London)

“महाराष्ट्रातील ठाकरे सरकार मजबूत आहे. शरद पवार हे स्वत: सरकारच्या कामगिरीवर संतुष्ट आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीच्या सरकारला पुढील पाच वर्षात अजिबात धोका नाही. महाविकास आघाडी सरकार पुढील निवडणूकही एकत्र लढेल” असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राज्यपालांची भेट घेतल्यानंतर मातोश्रीवर दाखल झाले होते. त्यावरुन राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु असताना संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली.

शरद पवार मातोश्रीवर आले, यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा पवार साहेबांचं मार्गदर्शन घेतात, महाराष्ट्रात कोरोनाचं संकट आहे, महाराष्ट्रात सरकार बनवण्यात पवारांचं योगदान आहे. कोरोनाचा काळ वेदनेचा आहे, लोक घरी आहेत, विरोधकांना काही सुचतंय, पण एक लक्षात ठेवा महाराष्ट्रातील ठाकरे सरकार हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असं महाविकास आघाडीचं आहे, हे पाच वर्ष कार्यकाळ पूर्ण करेल, असं संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत. पवार आणि मुख्यमंत्र्यांची बैठक म्हणजे महाविकास आघाडीची बैठक, ते ज्येष्ठ नेते आहेत. आमचं 170 चं बहुमत आहे. 2025-26 जोपर्यंत निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत असेल. कोणीही फुटणार नाही, फुटलं तर विरोधी पक्षाचं नशीबच फुटेल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

आमचं 170 चं बहुमत आहे, तो आकडा 180 झाला तरी आश्चर्य वाटायला नको. पुढल्या पाच वर्षात ठाकरे सरकारला अजिबात धोका नाही, धोका आहे तो विरोधकांना आहे, सरकारचं तुम्ही आमच्यावर सोडून द्या, तुमची काळजी घ्या, असं संजय राऊतांनी सुनावलं.

राज्यात काही कामं होत नाहीत असा आरोप करुन राष्ट्रपती राजवटीची मागणी कोणी करत असेल तर आधी गुजरातमध्ये लावावी लागेल. गुजरातमध्ये इस्पितळांची स्मशाने झाली आहेत, अंधार कोठड्या आहेत, तिथल्या राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बोलावून समज द्यायला हवी होती. गुजरात हायकोर्टाने सरकारवर ताशेरे ओढलेत, असं संजय राऊत म्हणाले. (Sanjay Raut taunts Maharashtra BJP can form Government in London)

हे राज्य सर्वांचं आहे, राज्य संकटात असताना सर्वांनी एकत्र येणं गरजेचं, इतर राज्यात सर्वजण एकजुटीने लढत आहेत, पण महाराष्ट्रात तसं घडताना दिसत नाही, अशी खंत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

संबंधित बातम्या

हो, ‘मातोश्री’वर पवार-ठाकरेंची दीड तास चर्चा, पण… : संजय राऊत

राज्यपालांच्या भेटीनंतर पवार ‘मातोश्री’वर, उद्धव ठाकरे- संजय राऊतांशी गुप्त चर्चा

ठाकरे सरकारला नारळ द्या, राष्ट्रपती राजवट लागू करा, राणेंची राज्यपालांकडे मागणी

राज्यपालांच्या भेटीसाठी पवार राजभवनावर, पटेल म्हणतात कोश्यारींनी चहासाठी बोलावलं

गुजरात आणि गोव्यात एक भूमिका, पण महाराष्ट्रात विरुद्ध भूमिका का? शिवसेनेचा ‘सामना’तून राज्यपालांना सवाल

राज्यात आमचे नाही, शिवसेनेचे सरकार, कथित ऑडिओ क्लिपमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांची खदखद?

…तर मुख्यमंत्र्यांवर ‘मंत्रीकपात’ करण्याची वेळ येईल : संजय राऊत

राज्यपाल आमचे मार्गदर्शक, राज्यपाल-मुख्यमंत्र्यांचे संबंध मधुर, पिता-पुत्राप्रमाणे : संजय राऊत

उद्धव ठाकरेंना काँग्रेस-राष्ट्रवादी उद्ध्वस्त करेल, महाविकास आघाडी तोडण्याची हीच ती वेळ : स्वामी

(Sanjay Raut taunts Maharashtra BJP can form Government in London)