AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमची सत्ता येताच… संजय राऊत यांचा थेट तपास यंत्रणांनाच इशारा; नेमकं काय म्हणाले?

देशाच्या जनतेने फ्लाईंग किसचं स्वागत केलं आहे. मला एका नव्वद वर्षाची आईसमान एक महिला विमानात भेटली. तिनेही राहुल गांधी यांच्या भूमिकेचं स्वागत केलं.

आमची सत्ता येताच... संजय राऊत यांचा थेट तपास यंत्रणांनाच इशारा; नेमकं काय म्हणाले?
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 11, 2023 | 10:47 AM
Share

मुंबई | 11 ऑगस्ट 2023 : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आता थेट तपास यंत्रणांनाच इशारा दिला आहे. राज्यात सत्ता बदल होणार आहे. केंद्रातही सत्ता बदल होणार आहे. त्यावेळी तुम्हाला हिशोब द्यावाच लागणार आहे. तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहावंच लागणार आहे, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने जनता तर नाहीच. पण निसर्गही नाही, असा हल्लाच संजय राऊत यांनी चढवला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

येत्या 2024 मध्ये देशात आणि महाराष्ट्रात सत्ता बदल होणार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि दिल्लीत इंडिया आघाडीचं सरकार येणार आहे. तेव्हा तुम्ही कुठे जाल? आज तपास यंत्रणेच्या माध्यमातून आमचा छळ सुरू आहे. माझं या महाराष्ट्रातील तपास यंत्रणा आणि पोलीस यंत्रणांनाही सांगणं आहे. 2024 ला प्रत्येक खोट्या केसेस, गुन्हे, तपास, दहशत याचं उत्तर त्या सर्वांना द्यावं लागणार आहे. 2024मध्ये यंत्रणांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जाईल, इंडिया आघाडीत त्यावर एकमत आहे. यावेळी कुणालाही दयामाया नाही. सरकार बदलतंय, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.

मंत्रिपदावरून माऱ्यामाऱ्या होतील

मुख्यमंत्र्यांनी काल आमदारांसाठी जेवण ठेवलं होतं. ते रद्द केलं असं कळलं. कारण जेवणावेळी मंत्रिपदावरून माऱ्यामाऱ्या होतील ही त्यांना भीती होती, असा चिमटा काढतानाच त्यांचं हेलिकॉप्टरही काल उडू शकलं नाही. त्यांच्या बाजूने जनताही नाही आणि निसर्गही नाही. हा औटघटकेचा कारभार सुरू आहे, असं संजय राऊत म्हणाले.

तुम्हीही फ्लाईंग किस द्या, कुणी रोखलं?

यावेळी त्यांनी फ्लाईंग किसच्या मुद्द्यावरूनही भाजपला झोपडले. फ्लाईंग किसचा मुद्दा का होत आहे? राहुल गांधींनी मोहब्बतची दुकान उघडली आहे. त्यातील ज्या वस्तू आहेत त्यापैकी फ्लाईंग किस एक आहे. तुम्हीही फ्लाईंग किस द्या देशातील जनतेला. मणिपूरला जाऊन फ्लाईंग किस द्या. तुम्हाला कोणी रोखलं?, असा उलटा सवाल राऊत यांनी केला.

तुमच्या मनात द्वेष

देशाच्या जनतेने फ्लाईंग किसचं स्वागत केलं आहे. मला एका नव्वद वर्षाची आईसमान एक महिला विमानात भेटली. तिनेही राहुल गांधी यांच्या भूमिकेचं स्वागत केलं. फ्लाईंग किस प्रेमाचं आवतन आहे. तुम्ही द्वेषाचं राजकारण करत आहात. त्यावर फ्लाईंग किस हा उतारा आहे. तुम्ही ते करू शकत नाही. कारण तुमच्या मनात द्वेष आहे. तुम्ही द्वेषाचं राजकारण करता, असा हल्लाच त्यांनी चढवला.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.