कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांची निवड जाहीर, पुन्हा डॉ. सुरेश भोसलेंची वर्णी

त्यामुळे आता त्यादृष्टीने कारखान्याच्या हितासाठी आणि प्रगतीसाठी लगेचच कार्यरत होत आहे, अशी प्रतिक्रिया अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉक्टर सुरेश भोसले यांनी दिली.

कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांची निवड जाहीर, पुन्हा डॉ. सुरेश भोसलेंची वर्णी
krishna sugar mill
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 1:51 PM

सातारा : कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पुन्हा डॉ. सुरेश भोसले यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी जगदीश जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नुकतंच या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन या नवीन संचालक मंडळाची निवड जाहीर करण्यात आली आहे. (Satara Karad Yashwantrao Mohite Krishna sugar mill Suresh Bhosale has been selected as a president)

अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या निवडी जाहीर

काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक तिरंगी निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत डॉ. अतुल भोसले यांच्या सहकार पॅनलने सर्वच्या सर्व 21 जागा़ंवर अकरा हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला होता. यानंतर नव्याने निवडून आलेल्या संचालक मंडळाची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बैठक घेतली. या बैठकीदरम्यान अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या निवडी जाहीर केल्या.

यावेळी कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पुन्हा डॉ. सुरेश भोसले यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी जगदीश जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

आता आमची जबाबदारी वाढली – सुरेश भोसले

दरम्यान मोठ्या मताधिक्याने सभासदाने आम्हाला निवडून दिले असल्याने आता आमची जबाबदारी वाढली आहे. या जबाबदारीची जाणीव नवीन संचालक मंडळाला आहे. त्यामुळे आता त्यादृष्टीने कारखान्याच्या हितासाठी आणि प्रगतीसाठी लगेचच कार्यरत होत आहे, अशी प्रतिक्रिया अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉक्टर सुरेश भोसले यांनी दिली.

जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचा सर्व 21 जागांवर विजय

कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक 29 जून रोजी पार पडली. त्यावेळी तब्बल 34532 सभासदांनी मतदान केले होते. आता या निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. मतमोजणीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत डॉ. अतुल भोसले यांच्या सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने सर्व 21 जागांवर दहा हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासून सहकार पॅनेलचे उमेदवार आघाडीवर असल्यामुळे दुपारपासूनच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष सुरु केला होता. रात्री उशीरापर्यंत मतमोजणी सुरू होती. आता निकाल स्पष्ट झाले आहेत.

तिरंगी लढत, पृथ्वीराज चव्हाण आणि विश्वजित कदमांचे प्रयत्न फोल

सातारा-सांगली जिल्ह्यात 47145 सभासद असणाऱ्या कराडच्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजप नेते डॉ. अतुल भोसले यांच्या सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने दणदणीत विजयी मिळवला. या निवडणुकीत मिळालेलं मताधिक्य आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त आहे. या कारखान्याची सत्ता भोसले गटाकडून दुसरीकडे जावी म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्व विरोधक एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र हे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. त्यामुळे ही निवडणूक तिरंगी झाली. माजी चेअरमन अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल आणि राज्यमंत्री विश्वजित कदम नेतृत्व करत असलेले रयत पॅनेल अशी आणखी दोन पॅनल रिंगणात आल्याने या निवडणुकीची चर्चा झाली.

(Satara Karad Yashwantrao Mohite Krishna sugar mill Suresh Bhosale has been selected as a president)

संबंधित बातम्या : 

कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक, सहकार पॅनेलचा सर्व 21 जागांवर दणदणीत विजय, पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदमांचे मनसुबे उधळले

कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीची मतमोजणी सुरु, 4 वाजेपर्यंत निकाल, कुणाच्या अंगावर गुलाल?

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.