लोकसभा पोटनिवडणुकीत दारुण पराभव, उदयनराजे म्हणतात…

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालासोबतच (Maharashtra Assembly Election Result) आज (24 ऑक्टोबर) सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचीही (Satara Loksabha Bypoll Result) मतमोजणी झाली.

लोकसभा पोटनिवडणुकीत दारुण पराभव, उदयनराजे म्हणतात...


सातारा : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालासोबतच (Maharashtra Assembly Election Result) आज (24 ऑक्टोबर) सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचीही (Satara Loksabha Bypoll Result) मतमोजणी झाली. या लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा (Election result of Udayanraje Bhosale) दारुण पराभव झाला आहे. उदयनराजे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी 87 हजार 717 मतांनी पराभव केला. या निकालाने उदयनराजे समर्थकांमध्ये चांगलीच अस्वस्थता पसरली आहे. या निकालाविषयी राज्यभरात कमालीची उत्सुकता होती. उदयनराजे मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून पिछाडीवर राहिले. उदयनराजे गटासाठी हा मोठा धक्का आहे. त्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबद्दल राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील यांना 6,36,620 मते (51.04%) मिळाली आहेत. दुसरीकडे 5,48,903 मते (44.01%) मिळाली आहेत. अशाप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील यांना 87,717 मतांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे श्रीनिवास पाटील यांचा विजय निश्चित मानला जात आहे. आता निवडणूक आयोगाकडून विजयाची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे.

लोकसभा पोटनिवडणुकीतील निकालावर उदयनराजेंनी आपण हरल्यास पुढील 5 वर्षे साताऱ्याचा विकास थांबेल असं म्हटलं. उदयनराजे भोसले म्हणाले, “एक पाऊल मागे जाणं हे मोठी झेप घेण्यासाठी असतं. लोकांनी विचार करुन मतदान केलंय. प्रचारात मी काय केलं हे स्पष्टपणे सांगितले आहे. मी जर निवडून आलो नाही, तर पुढील 5 वर्षे विकास थांबेल.”

मे 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंनी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांचा पराभव केला होता. उदयनराजेंना 5 लाख 79 हजार 26 मतं, तर नरेंद्र पाटील यांना 4 लाख 52 हजार498 मतं मिळाली. उदयनराजे भोसले यांनी मागील 2014 च्या निवडणुकीत जवळपास साडेतीन लाख मतांनी विजय मिळवला होता. मात्र यंदा त्यांची आघाडी निम्म्याने घटली. 2014 मध्ये उदयनराजे भोसले 3 लाख 66 हजार 594 मतांनी विजयी झाले होते. यंदा उदयनराजेंना इतकं लीड घेता आलं नाही. 2019 च्या निवडणुकीत राजेंनी 1,26,528 मतांनी विजय मिळवला होता.

साताऱ्यातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर मिळवलेल्या खासदारकीचा राजीनामा देत उदयनराजे भोसले यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसोबतच साताऱ्याच्या लोकसभा पोटनिवडणुकीचीही (Satara Loksabha Bypoll Result) घोषणा केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार श्रीनिवास पाटील यांना साताऱ्यातून उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे साताऱ्याच्या जागेसाठी उदयनराजे भोसले विरुद्ध श्रीनिवास पाटील अशी लढत झाली. सुरुवातीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस पोटनिवडणुकीत उतरवणार असल्याचीही चर्चा (Satara Loksabha Bypoll Result) होती.

दुसरीकडे, बिग बॉस 2 मुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेले अभिजीत बिचुकले यांनीही पोटनिवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती. आतापर्यंत बिचुकलेंनी अनेक वेळा निवडणूक लढवली आहे. मात्र बिग बॉसमुळे मिळालेल्या लोकप्रियतेनंतर बिचुकलेंचंही नाव चर्चेत होतं.

राजकीयदृष्ट्या महाराष्ट्राचा विचार केला, तर पहिल्यापासून सातारा जिल्ह्याची ओळख राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी राहिली आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच या जिल्ह्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची पकड राहिली. गेल्या 2 टर्म छत्रपती उदयनराजे भोसले हेच राष्ट्रवादीकडून खासदार म्हणून निवडून येत आहेत. यंदाही त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजय मिळवला. मात्र तीनच महिन्यात त्यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला.

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI