“वेलकम बॅक टू स्कुल…” धनंजय मुंडेंकडून ‘शिक्षणोत्सवानिमित्त’ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत

राज्यभरात शिक्षणोत्सव साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी जिल्हा परिषद शाळा टोकवाडी येथे जाऊन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व शिक्षणोत्सव पुढे अखंडित सुरू राहावा अशा शुभेच्छा दिल्या.

"वेलकम बॅक टू स्कुल..." धनंजय मुंडेंकडून 'शिक्षणोत्सवानिमित्त' जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत
धनंजय मुंडेंकडून शाळेत विद्यार्थ्यांचं स्वागत


परळी : कोविड कालावधीच्या मोठ्या ब्रेकनंतर आज पहिल्यांदाच परळी तालुक्यातील टोकवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत उपस्थित झालेल्या विद्यार्थ्यांना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गुलाब पुष्प देत त्यांचे शाळेत स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या वर्गात जाऊन त्यांच्याशी संवाद साधत पालकमंत्री ‘वेलकम बॅक टू स्कुल…’ म्हणताच विद्यार्थ्यांनी एका सुरात ‘थ्यांक यु सर…’ म्हणत दिलेल्या प्रतिसादाने शाळेत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. (Welcome of students from Guardian Minister Dhananjay Munde)

कोविडच्या काळात जवळपास दीड वर्ष शाळा बंद राहिल्यानंतर, आता दुसरी लाट ओसरली आहे. राज्य सरकारने शाळांची घंटा वाजण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात आज शाळा सुरू झाल्या आहे. राज्यभरात शिक्षणोत्सव साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी जिल्हा परिषद शाळा टोकवाडी येथे जाऊन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व शिक्षणोत्सव पुढे अखंडित सुरू राहावा अशा शुभेच्छा दिल्या.

शाळेच्या आवारात वृक्षारोपण

पुन्हा नव्याने शाळा सुरू झाल्या आहेत, त्या आता कायम सुरू राहाव्यात यासाठी विद्यार्थ्यांची मास्क, सॅनिटायझर, अन्य स्वछता यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण केले जावे. तसेच शाळेचा परिसर स्वच्छ ठेवावा याबाबत संबंधितांना सक्तीच्या सूचना धनंजय मुंडे यांनी दिल्या आहेत. यावेळी मुंडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेच्या आवारात वृक्षारोपण देखील करण्यात आले.

शैक्षणिक नुकसानही भरून निघेल- मुंडे

मधल्या काळात शाळा बंद राहिल्यामुळे विशेषकरून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले, पण आज शाळा पुन्हा सुरू होताना विद्यार्थी व शिक्षकांच्या मनातील उत्साह एक वेगळाच आनंद देतो आहे. तसेच मधल्या काळात झालेले शैक्षणिक नुकसानही भरून निघेल असा विश्वास वाटत असल्याची प्रतिक्रिया मुंडे यांनी व्यक्त केली आहे. यावेळी पंचायत समितीचे सभापती बालाजी (पिंटू) मुंडे, मार्केट कमिटीचे संचालक सूर्यभान नाना मुंडे, डॉ. राजाराम मुंडे, टोकवाडीच्या सरपंच सौ. गोदावरीताई मुंडे, ग्रा.प. सदस्यांसह शाळेचे मुख्याध्यापक श्याम आघाव तसेच शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांचं शिक्षक आणि पालकांना आवाहन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला. अत्यंत मोजक्या शब्दात मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. संबोधनाच्या सुरुवातीलाच त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना शाळा सुरू झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी त्यांच्या शालेय जीवनातील आठवणींनाही उजाळा दिला. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांन पालकांना, शिक्षकांना शुभेच्छा देतो. आपण सगळे जण एकत्र आहोत. एकदा उघडलेल्या शाळा पुन्हा बंद होऊ द्यायची नाही या निर्धारानं आपण नव्या आयुष्याला सुरुवात करुया, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

इतर बातम्या :

प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा; उत्तर महाराष्ट्रात 5210 शाळा सुरू, प्रवेशोत्सव सोहळा रंगला!

एकदा उघडलेल्या शाळा बंद होऊ द्यायच्या नाहीत असा निर्धार करा, मुख्यमंत्र्यांचं शिक्षक आणि पालकांना आवाहन

Welcome of students from Guardian Minister Dhananjay Munde

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI