shivasena vs MNS : मनसेची ‘सामना’समोर पोस्टरबाजी, यावेळेस शिवसेना नव्हे खासदार संजय राऊत मनसेच्या टार्गेटवर

राज्यात मागच्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील सत्ताधारी शिवसेना आणि मनसे या दोन्ही प्रादेशिक पक्षांमध्ये वार-पलटवार सुरु आहे. मात्र, आता पोस्टरबाजीचा नवा अध्याय या दोन्ही पक्षांमध्ये सुरु झालाय. यावेळेस शिवसेना नव्हे तर खासदार संजय राऊत मनसेच्या टार्गेटवर दिसतायेत.

shivasena vs MNS : मनसेची 'सामना'समोर पोस्टरबाजी, यावेळेस शिवसेना नव्हे खासदार संजय राऊत मनसेच्या टार्गेटवर
सामना कार्यालयासमोर मनसेचं पोस्टरImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 12:19 PM

मुंबई :  राज्यात मागच्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील सत्ताधारी शिवसेना (Shivsena) आणि मनसे (MNS) या दोन्ही प्रादेशिक पक्षांमध्ये वार-पलटवार सुरु आहे. यापूर्वी आपण या दोन्ही पक्षांमध्ये हिंदुत्वावरुन टीका टिप्पणी, आरोप-प्रत्यारोप पाहिले असतील. आता मात्र, मनसेच्या मशिदीसमोर हनुमान चालीसा पठणाच्या नव्या मुद्द्यावरुन हा संघर्ष शिगेला पोहचलाय. यावरुन मनसे शिवसेनेला टार्गेट करण्यासाठी मागच्या काही दिवसांपासून बॅनरबाजी देखील करत आहे. तर प्रत्युत्तरादाखल शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) पत्रकार परिषद घेऊन मनसेवर पलटवार करतायेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केल्यानंतर मनसे विरुद्ध शिवसेना हा वाद अधिक चिघळल्याचं दिसतंय. शिवसेना भवनसमोर नव्हे तर शिवसेना नेते संजय राऊतांना टार्गेट करण्याचा प्रयत्न मनसेचा असल्याचं दितंय. दैनिक सामनाच्या कार्यालयाबाहेर यावेळेस पोस्टरबाजी करण्यात आली आहे. तर आज हनुमान जयंतीमुळे दादरमध्ये शिवसेना आणि मनसेची हनुमान मंदिरात महाआरती असल्याने शिवसेना भवनसमोरली बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

मनसेची पुन्हा पोस्टरबाजी

शिवसेना आणि मनसे या दोन्ही प्रादेशिक पक्षातील संघर्ष काही नवा नाही. या न त्या कारणावरुन दोन्ही पक्षातील नेतेमंडळी सतत आरोप प्रत्यारोप करत असतात. मनसेनं मागच्या काही दिवसांपासून शिवसेनेविरोधात बॅनरबाजी करायला सुरुवात केली आहे. आज सामना कार्यालयाबाहेर मनसेकडून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या विरोधात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे हे महाराष्ट्राचे ओवेसी आहेत, अशा पद्धतीचा विधान केल्यानंतर आता मनसे कडून पोस्टरबाजी करत ओवेसी कोणाला बोलता संजय राऊत? तुमचा कर्कश भोंगा बंद करा? तुम्ही मजिदी मधील मौलाना आहात का अशा पद्धतीचा इशारा देत मनसेनं ही पोस्टरबाजी केली आहे. संजय राऊत मनसेच्या स्थापनेवेळी राज ठाकरे यांची समजूत घालण्यासाठी कृष्णकुंजवर आले होते. त्यावेळी आक्रमक मनसैनिकांकडून संजय राऊत यांची गाडी पलटी करण्यात आली होती. याचा फोटो ही या बॅनरवर लावण्यात आला आहे. या घटनेची पुनरावृत्ती व्हावी का? असा इशारा देखील मनसैनिकांनी या पोस्टरबाजीमध्ये दिला आहे. माहीम विधानसभा मतदार संघातील लक्ष्मण पाटील, उमेश गावडे, नितीन लाड या मनसेच्या कार्यकर्त्यांनी ही पोस्टरबाजी केली.

मनसेच्या टार्गेटवर खासदार राऊत

मनसेच्या टार्गेटवर संजय राऊत?

मनसेकडून आता थेट शिवसेना नेत संजय राऊतांना टार्गेट केलं जातंय. त्यामुळे हा वाद आता शिवसेना विरुद्ध मनसे नसून मनसे विरुद्ध शिवसेना नेते संजय राऊत, असा झाल्याचं दिसून येतंय. सामना कार्यालयाबाहेर मनसेकडून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या विरोधात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. संजय राऊत मनसेच्या स्थापनेवेळी राज ठाकरे यांची समजूत घालण्यासाठी कृष्णकुंजवर आले होते. त्यावेळी आक्रमक मनसैनिकांकडून संजय राऊत यांची गाडी पलटी करण्यात आली होती. याचा फोटो ही या बॅनरवर लावण्यात आला आहे. या घटनेची पुनरावृत्ती व्हावी का? असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.

इतर बातम्या

AAP Free Power Punjab : केजरीवालांनी बोललेलं केलं, पंजाबमध्ये 300 यूनिट वीज फ्री, महाराष्ट्रात पैसे देऊनही लोड शेडींग

Skin Care : त्वचेवर नैसर्गिक चमक हवी आहे? मग आजच आपल्या आहारामध्ये या पदार्थांचा समावेश करा!

KKR vs SRH IPL 2022: नितीश राणाचा षटकार, डगआउटमधल्या फ्रीजची काच फुटली

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.