AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझं वय 88 झालंय, अशा अवस्थेत एका तरुणाबद्दल…अण्णा हजारे यांनी जितेंद्र आव्हाड यांचे टोचले कान

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीसाठी उपोषण आंदोलनाचे हत्यार उपसून संपूर्ण राज्य ढवळून काढले आहे. दोन वेळा उपोषणा बसून सरकारला मनोज जरांगे यांनी चांगलेच कामाला लावले.त्यांच्या उपोषणामुळे अण्णा हजारेंचे उपोषण चर्चेत आले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी उपोषणावरून हजारे यांच्यावर टिका केली होती.

माझं वय 88 झालंय, अशा अवस्थेत एका तरुणाबद्दल...अण्णा हजारे यांनी जितेंद्र आव्हाड यांचे टोचले कान
jitendra awhad and anna hazare
| Updated on: Dec 14, 2023 | 9:35 PM
Share

राळेगणसिद्धी | 14 डिसेंबर 2023 : मतांची गरज असते तेव्हा राजकीय मंडळी शेतकऱ्यांच्या बांधावर जातात. मात्र आता शेतकरी अडचणीत आहेत. राजकीय नेत्यांनी शेतकऱ्यांची बाजू घेतली पाहीजे. मग ते कोणत्याही पक्षाचे असोत. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळाला तरच कृषी प्रधान भारत देश शोभून दिसेल अस मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे. केवळ कृषी प्रधान देश म्हणून गौरव करायचा आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्यायचा नाही हे योग्य नसल्याचेही हजारे यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अधिवेशनात योग्य प्रकारे चर्चा होत नसल्याची खंतही अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे.

एकीकडे मराठा आंदोलनात उपोषणाचे हत्यार उपसून मनोज जरांगे पाटील चर्चेत आले असतानाच काही वर्षांपूर्वी कॉंग्रेसच्या युपीए सरकारला हटविण्यासाठी कारणीभूत ठरलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे दिल्ली येथील रामलीला मैदानावरील उपोषण चर्चेत आले आहे. भाजपाला आणि आपच्या अरविंद केजरीवाल यांना सत्तेचे सोपान अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनामुळे मिळाले. त्यानंतर अण्णा राजकीय क्षेत्रातून अचानक बाजूला पडले आहेत. यावरुन अलिकडे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर अलिकडेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी समाजमाध्यमावर पोस्ट करून अण्णांमुळे देशाचे वाटोळे झाले, गांधी टोपी घातल्याने कोणी गांधी होत नाही अशा आशयाची टीका केली होती.

माझं वय 88 वर्षे झालं आहे

जितेंद्र आव्हाड यांच्या अण्णांच्या विरोधातील टीकेमुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची बदनामी केली म्हणून वकील मिलिंद पवार यांनी आमदार आव्हाड यांना नोटीस बजावली आहे. या नोटीसीला आव्हाड यांनी वकीलांमार्फत उत्तर दिल्याचे वकील पवार यांनी सांगितले. ज्यात काही आंदोलनामुळे देशात काही कायदे झाले. जसे माहीतीचा अधिकार कायदा झाला. त्यात अण्णांचा कोणतीही संबंध नसल्याचे आव्हाड यांनी नोटीसीला उत्तर देताना म्हटल्याचे पवार यांनी सांगितले. या संदर्भात अण्णा हजारे यांच्या बातचीत करण्यात आली. त्यावेळी अण्णा हजारे यांनी जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टिकेवर उत्तर देताना म्हणाले की,  माझं वय 88 वर्षे झालं आहे. अशा अवस्थेत एका तरुणाबद्दल मी काय बोलणार ? असं उत्तर देत अण्णांनी आव्हाडाचं नाव घेता बोलणं टाळलं आहे. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी नोटीसीला उत्तर दिल्याने अण्णांची बदनामीच झाली असल्याचा दावा वकील पवार यांनी केला आहे. यासंदर्भात अण्णांचा विचार घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही वकील मिलिंद पवार यांनी दिला आहे.

मला एक लाख रुपये देण्यात यावे – आव्हाड

अण्णा हजारेंबद्दल जे बोललो ते माझं वैयक्तिक मत असून अण्णा हजारेंमुळे माहिती अधिकार कायदा आणि लोकपाल कायदे आले नसल्याचे उत्तर जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे. शिवाय अण्णांना महात्मा गांधी म्हणणं हे हास्यास्पद असल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. शिवाय मला नोटीस देण्यास भाग पाडल्यामुळे मला एक लाख रुपये देण्यात यावे अशी मागणी आव्हाड यांनी नोटीसीच्या माध्यमातून केली आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?