Swiggy order | पिझ्झा-बर्गर फेल, लागोपाट आठ वर्षे स्विगीवर बिर्याणीच नंबर वन, दर सेंकदाला इतक्या ऑर्डर

सरत्या वर्षाला निरोप देण्याची वेळ आली आहे. असे असताना स्विगी फूड डिलिव्हरी एपने आपल्या वर्षभरातील कामगिरीची उजळणी केली आहे. यंदाही लागोपाठ आठव्या वर्षी देशातील सर्वाधिक पसंदीची डीश बिर्याणीच ठरली आहे. तर गुलाम जामला रसगुल्ला पेक्षाही जादा मागणी आली आहे.

Swiggy order | पिझ्झा-बर्गर फेल, लागोपाट आठ वर्षे स्विगीवर बिर्याणीच नंबर वन, दर सेंकदाला इतक्या ऑर्डर
swiggy boy with biryani Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Dec 14, 2023 | 7:22 PM

मुंबई | 14 डिसेंबर 2023 : साल 2023 वर्षे सरत चालले आहे. लवकरच नवं वर्षे सुरु होणार आहे. देशात ऑनलाईन फूड ऑर्डर करण्याचा प्रघात वाढत चालला आहे. साल 2023 मध्ये ऑनलाईन फूड ऑर्डर करण्याचा ट्रेंड खूपच वाढला. यावर्षी एका ग्राहकाने एका दिवसात 207 पिझ्झाची ऑर्डर देऊन विक्रम केला आहे, तर ‘वेलेंटाईन डे’ला दर मिनिटाला 271 केक ऑर्डर करण्याचा देखील आगळा विक्रम स्विगी फूड डिलीव्हरी एपद्वारे झाला. स्विगीने आपला वार्षिक रिपोर्ट How India Swiggy’d 2023 मध्ये आपल्या ऑर्डर व्हॉल्यूम संदर्भात आश्चर्यकारक निरीक्षण जाहीर केली आहेत. यंदाही बिर्याणी हे सर्वाधिक ऑर्डर केले गेलेला अन्नपदार्थ ठरला आहे. देशात 19 नोव्हेंबरच्या भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड कप फायनलच्या दिवशी दर मिनिटाला 188 पिझ्झाची ऑर्डर दिली गेली.

मुंबईच्या ग्राहकाची मोठी ऑर्डर

स्विगीने जाहीर केलेल्या अहवालात मुंबईतील एका ग्राहकाने 42.3 लाख रुपयांचे जेवण ऑर्डर करण्याचा विक्रम केल्याचे म्हटले आहे. सर्वाधिक फूड ऑर्डर करणाऱ्यांमध्ये चेन्नई, दिल्ली आणि हैदराबादचे युजर्स अकाऊंट होते. यापैकी प्रत्येकाने 10,000 हून अधिक ऑर्डर केल्या आहेत. देशातील छोट्या शहरातूनही मोठ्या ऑर्डर होत आहेत. यंदा झाशीतून एकाचवेळी एकूण 269 पदार्थांची ऑर्डर दिली गेली. तर भुवनेश्वरमधून एकाच दिवसात 207 पिझ्झा ऑर्डर केले गेले, विशेष म्हणजे त्या घरात विशेष पिझ्झा पार्टी देखील नव्हती. देशात क्रिकेट वर्ल्ड कप फायनलच्या दिवशी दर मिनिटांना 188 पिझ्झा ऑर्डर झाले आहेत.

सर्वात जादा बिर्याणीची मागणी

स्विगी सलग 8 व्या वर्षी बिर्याणी सर्वाधिक ऑर्डर झालेली डीश ठरली आहे. साल 2023 च्या एक जानेवारीला स्विगीवर 4.3 लाख बिर्याणीची ऑर्डर दिली गेली. तर 83.5 नूडल्स ऑर्डर केले गेले. साल 2023 मध्ये दर एका सेंकदाला 2.5 बिर्याणीची ऑर्डर दिली गेली. ज्याचे प्रमाण 5.5 चिकन बिर्याणी मागे एक व्हेज बिर्याणी असे होते. 24.9 लाख युजरनी बिर्याणीच्या ऑर्डरसह पहिल्यांदा स्विगी एपवर लॉगीन केले आहे. दर सहावी बिर्याणीची ऑर्डर हैदराबाद येथून दिली गेली. हैदराबाद येथील एका युजरने साल 2023 मध्ये एकूण 1633 बिर्याणीची ऑर्डर दिली. चंदीगड येथील एका कुटुंबाने भारत-पाक क्रिकेट मॅच दरम्यान 70 प्लेट बिर्याणीची ऑर्डर दिली. या मॅच दरम्यान स्विगीला दर मिनिटांना 250 बिर्याणी डिलिव्हरीच्या ऑर्डर मिळाल्या.

गुलाब जामला पसंती

रसगुल्ला पेक्षा भारतीयांना आता गुलाब जाम आवडू लागला आहे. दुर्गा पूजेत गुलाम जामच्या 77 लाख ऑर्डर दिल्या गेल्या. नवरात्रीत गुलाम जाम नंतर मसाला डोसाला सर्वाधिक पसंती मिळाली. 2023 मध्ये हैदराबादच्या एका युजरने इडल्यांवर सहा लाख रुपये खर्च केले. बंगळुरुत 8.5 दशलक्ष चॉकलेट केकची ऑर्डर दिल्याने त्याला केक कॅपिटलचा दर्जा मिळा आहे. साल 2023 मध्ये 14 फेब्रुवारीच्या वेलेंटाईन डेला दर मिनिटांना 271 केकची ऑर्डर मिळाली, नागपूरच्या एका युजरने एका दिवसांत 72 केकची ऑर्डर दिली.

डिलिव्हरी पार्टनर्सची कमाल

स्विगीच्या डिलिव्हरी पार्टनर्सनी इलेक्ट्रीक व्हेईकल आणि सायकलीद्वारे ऑर्डर देण्यासाठी 166.42 दशलक्ष किलोमीटरचे अंतर कापले आहे. चेन्नईच्या व्यंकटेश याने 10,360 तर कोच्चीच्या सनथिनीने 6,253 ऑर्डर डिलिव्हरी केल्या. तर गुरुग्रामच्या रामजित सिंह याने 9,925 आणि परदीप कौर याने लुधियानात 4,664 ऑर्डर डिलिव्हर केल्या आहेत.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.