AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ram Mandir | काय योगदान विचारणाऱ्या नारायण राणेंना शंकराचार्यांचं सडेतोड उत्तर

Ram Mandir | "रामलला कुठे विराजमान होणार, मंदिरात ना? मंदिर पूर्ण झालय कि, नाही हे सांगा. निर्माण कार्य सुरु राहणार असं म्हणताय. तुम्ही सांगा जितक मंदिर झालय, तितकच ठेऊ आम्ही मान्य करु मंदिराच हेच स्वरुप आहे. तुम्ही पुढेही मंदिराच काम सुरु ठेवणार, याचा अर्थ काम अर्पूण आहे" असं जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज म्हणाले.

Ram Mandir | काय योगदान विचारणाऱ्या नारायण राणेंना शंकराचार्यांचं सडेतोड उत्तर
shankaracharya-Narayan rane
| Updated on: Jan 15, 2024 | 12:19 PM
Share

Ram Mandir | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शंकराचार्यांच्या योगदानावर सवाल उपस्थित करताना, त्यांच्यावर टीका केली होती. आता ज्योतिष पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी नारायण राणेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे. “हजारो वर्षापासून देश गुलामित होता. विधर्मियोंच्या नियंत्रणाखाली होता. पण तरीही आज सनातन धर्म टिकून आहे. नारायण राणे आपले माता-पिता, आजी-आजोबांसोबत सनातन धर्माच पालन करतायत, त्यामागे कुठली 100 वर्षांची संघटना किंवा 45 वर्षांचा पक्ष नाहीय. हे अडीच हजार वर्षांपासूनच्या शंकराचार्यांच्या परंपरेमुळे शक्य झालय” असं जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराजांनी म्हटलय.

शंकराचार्य राजकीय दृष्टीने पंतप्रधानांकडे पाहतायत, या नारायण राणे यांच्या वक्तव्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी नाराजी व्यक्त केली. अन्य शंकराचार्य प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच स्वागत करतायत. मग तुम्ही नाराज का? तुम्हाला सुद्धा तिथे जाऊन आशिर्वाद द्यावा लागेल. त्यावर आम्ही सुद्धा आशिर्वादच देतोय, असं शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले.

‘आम्ही कुठे शाप दिलाय’

“आम्ही कुठे शाप दिलाय. आम्ही आतापर्यंत शाप शब्द उच्चारलेला नाही. आम्ही सुद्धा आशिर्वाद देतोय. नारायण राणेंना सुद्धा आशिर्वादच देतोय. त्यांच्या पक्षालाही सगळे आशिर्वाद देतायत. सर्वे भवंतु सुखिनः सर्वे संतु निरामया’ हा आमचा रोजचा पाठ आहे. आम्ही सगळ्यांना आशिर्वाद देतो. त्यात नारायण राणे आणि त्यांच्यासोबतचे लोक सुद्धा आहेत. आम्ही कधी शाप दिलाय?. जी धर्मशास्त्राची बाजू आहे, ती मांडण आमची जबाबदारी आहे. आम्ही फक्त आमच्या जबाबदारीच पालन करतोय” असं शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले.

‘आम्ही त्यांचे प्रवक्ते नाहीत’

अन्य शंकराचार्यांनी प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच स्वागत आणि समर्थन केलं. त्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, “कोण काय करतय हे तुम्ही त्यांना विचारा. आम्ही त्यांचे प्रवक्ते नाहीत, त्यांच्या बाजूच विश्लेषण करु शकत नाही. आम्ही सगळ्यांबद्दल बोलू शकत नाही” “एक शंकराचार्य म्हणून सनातन धर्माच्या कुठल्याही आयोजनात शास्त्रीय पक्ष पाहण, त्याची समीक्षा करण आणि मार्गदर्शन ही जबाबदारी आहे. आम्ही त्याच जबाबदारीच पालन करतोय” असं शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले.

Follow Us
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष...
ब्रिक्स परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत भारत आणि चीनमध्ये सात महत्त्वाचे करार झाले. हे करार दोन्ही देशांमधील संबंधांना रणनीतिक आणि दीर्घकालीन स्वरूप देतील, सीमावादावर तोडगा काढतील, आर्थिक संबंध वाढवतील आणि जागतिक आव्हानांवर सहकार्य करतील.
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार