AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात मोठी खळबळ

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 4 खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे खासदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात मोठी खळबळ
Sharad Pawar Image Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 27, 2026 | 5:46 PM
Share

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 4 खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे खासदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. असे झाल्यास हा शरद पवार यांना मोठा धक्का असणार आहे. या बातमीने राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

शरद पवार यांचे 4 खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 4 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. हे खासदार मराठवाडा आणि विदर्भातील आहेत, असंही समोर आलं आहे. त्याचबरोबर हे खासदार लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. शरद पवार यांच्या पक्षांने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 8 जागांवर विजय मिळवला होता, यातील 4 खासदार हे आता एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी काळात शरद पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

राज्यात मोठे भूकंप

राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपासून मोठे भूकंप झालेले आहेत. सुरूवातील एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला होता, ज्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यंमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तेव्हापासून एकनाथ शिंदे यांच्या पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे, आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षात आणखी 4 खासदार सामील होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रावादीतही फूट

शिवसेनेत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीतही फूट पडली होती. अजित पवार हे अनेक आमदारांना घेऊन सत्तेत सहभागी झाले होते. त्यावेळी शरद पवार यांना मोठा धक्का बसला होता. मात्र शरद पवार यांच्या पक्षांने लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करत 8 जागांवर विजय मिळवला होता. आता यातील 4 खासदार हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत, त्यामुळे पक्षाला पुन्हा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?