AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार आणि पार्थ पवार दोघेही त्यांच्या जागेवर योग्य, दोन दिवसात प्रकरण निवळेल, पवार कुटुंबातील सदस्यांची माहिती

अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवारांच्या निवासस्थानी पवार कुटुंबियांची बैठक सुरु आहे. (Sharad Pawar Parth Pawar issue will solve in 2 days)

शरद पवार आणि पार्थ पवार दोघेही त्यांच्या जागेवर योग्य, दोन दिवसात प्रकरण निवळेल, पवार कुटुंबातील सदस्यांची माहिती
| Updated on: Aug 15, 2020 | 7:41 PM
Share

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवारांच्या भूमिकेमुळे कुटुंबात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पवार कुटुंबातील तणावाचे वातावरण येत्या दोन दिवसात निवळेल, अशी माहिती पार्थ पवार यांच्या कुटुंबियातील सदस्यांनी दिली. गेल्या तीन तासांपासून अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवारांच्या निवासस्थानी पवार कुटुंबियांची बैठक सुरु आहे. त्यामुळे या बैठकीत नेमकं काय घडतं यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (Sharad Pawar Parth Pawar issue will solve in 2 days)

“पार्थ पवार हे नाराज असणं साहजिकच आहे. मात्र शरद पवार हे त्यांच्या जागेवर योग्य असून पार्थ पवारही त्यांच्या जागेवर योग्य आहेत. पार्थ पवार यांचे प्रकरण येत्या दोन दिवसात निवळेल,” असे पवार कुटुंबातील सदस्यांकडून सांगितले जात आहे.

कण्हेरीतील सहयोग सोसायटीत श्रीनिवास पवार यांच्या घरी पार्थ दुपारी साडेतीनला दाखल झाले. तब्बल तीन तासांपासून ही बैठक सुरु आहे. या बैठकीला अजितदादांच्या आई आशाताई पवार, पत्नी सुनेत्रा पवार, बंधू श्रीनिवास पवार आणि भावजय शर्मिला पवार उपस्थित आहेत. तसेच या बैठकीला आज रात्री किंवा उद्या अजित पवार येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्नेहभोजनाच्या वेळी काका श्रीनिवास पवार आणि काकी शर्मिला पवार पार्थ यांना समजुतीच्या चार गोष्टी सांगण्याची शक्यता आहे. आमची कौटुंबिक भेट असल्याचे सांगत पार्थ पवारांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला.

पवार कुटुंबातील आजोबा आणि नातवामधील वाद मिटवण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार आणि आत्या सुप्रिया सुळेंच्या प्रयत्नानंतर आता संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन याबाबत चर्चा करणार असल्याचे बोलले जाते. पवार कुटुंबातील इतर सदस्यांशी पार्थ चर्चा करण्याची शक्यता आहे.

शरद पवार आणि पार्थ पवार वाद

शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांना प्रसारमाध्यमांसमोर इमॅच्युअर म्हटलं होतं. तसेच, आम्ही पार्थच्या वक्तव्याला कवडीचीही किंमत देत नाही, असंही शरद पवार म्हणाले होते. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीत अनेक राजकीय घडामोडींना वेग आला.

अजित पवार आणि पार्थ पवार शरद पवारांवर नाराज?

शरद पवार यांनी पार्थ पवारांचे कान जाहीररित्या टोचल्यानंतर अजित पवार आणि पार्थ पवार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे नेते वारंवार हे सांगत आहेत की, पवार कुटुंबात कुठलाही वाद नाही. (Sharad Pawar Parth Pawar issue will solve in 2 days)

सुप्रिया सुळे यांची मध्यस्थी

पवार कुटुंबात वाद सुरु असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार यांना 13 ऑगस्टच्या सायंकाळी ‘सिल्व्हर ओक’मधील पवारांच्या निवासस्थानी बोलावलं होतं. पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात चर्चा झाली होती. पार्थ यांच्या भूमिकेमुळे पवार कुटुंबात जो कलह निर्माण झाला होता, त्यावर सुप्रिया सुळेंच्या मध्यस्थीमुळे तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

त्यापूर्वी बुधवारी (12 ऑगस्ट) ‘सिल्व्हर ओक’ मधील बैठकीत अजित पवार, शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यासोबत सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. त्याचबरोबर गुरुवारीही सुप्रिया सुळे यांनी वायसीएमआर प्रतिष्ठान येथे अगोदर शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर, मंत्रालयात अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर संध्याकाळी पार्थ पवार सुप्रिया यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले. त्यामुळे हे प्रकरण निवळण्यात सुप्रिया यांची भूमिका महत्त्वाची आहे, असं मत राजकीय विश्लेषकांकडून मांडण्यात येत आहे.

शरद पवार काय म्हणाले होते?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली होती. त्यावर भाष्य करताना पवार म्हणाले, “माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे. सीबीआय चौकशीबाबत बोलायचं, तर मी म्हणेन, महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. पण जर कोणी म्हणत असेल, अन्य चौकशीबाबत, तर त्याला विरोध असण्याचं कारण नाही”, असं शरद पवार म्हणाले होते.

पार्थ पवार यांची प्रतिक्रिया

“शरद पवार यांच्या बोलण्यावर सध्या मला काहीही बोलायचं नाही”, अशी प्रतिक्रिया पार्थ पवार यांनी दिली होती. (Sharad Pawar Parth Pawar issue will solve in 2 days)

संबंधित बातम्या : 

पार्थच्या जिव्हारी लागलं असेल, पण तो संयमी, सर्वांचा सन्मान करतो, आत्याकडून कौतुक

पार्थचा विषय कौटुंबिक, शरद पवार-पार्थ पवार वादावर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया

वेगळा झेंडा ते फडणवीसांसोबत शपथ, पवार कुटुंबातील मतांतरे दर्शवणाऱ्या चार घटना

Follow Us
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर
आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Sanjay Shirsat : आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; संजय शिरसाटांच्या त्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?