शरद पवारांकडून भावना गवळींचं समर्थन, किरीट सोमय्यांचा आता पवारांना सवाल

पवारांनी भावना गवळींची समर्थन केल्यानंतर आता भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आता पवारांनाच सवाल केलाय. शरद पवार यांनी भावना गवळींना विचारावं की, कपाटातून जे 7 कोटी चोरीला गेले ते कुठून आले होते? असं सोमय्या यांनी म्हटलंय.

शरद पवारांकडून भावना गवळींचं समर्थन, किरीट सोमय्यांचा आता पवारांना सवाल
किरीट सोमय्या, भावना गवळी, शरद पवार


मुंबई : केंद्रातील भाजप सरकारनं ईडीचा राजकीय साधन म्हणून वापर सुरु केला आहे. शिवसेनेच्या खासदार भावना गवळींना ईडीकडून विनाकारण त्रास देण्यात येत असून ही गोष्ट चुकीची असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलंय. पवारांनी भावना गवळींची समर्थन केल्यानंतर आता भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आता पवारांनाच सवाल केलाय. शरद पवार यांनी भावना गवळींना विचारावं की, कपाटातून जे 7 कोटी चोरीला गेले ते कुठून आले होते? असं सोमय्या यांनी म्हटलंय. (Kirit Somaiya’s question to Sharad Pawar on support to Bhavna Gawli)

शरद पवार भावना गवळी यांचा बचाव करत आहेत. पवार यांनी गवळींना विचारावं की, कपाटातून 7 कोटी चोरी गेले ते कुठून आले होते? 44 कोटी रुपये केंद्र सरकारचे आणि 11 कोटी रुपये स्टेट बँक ऑफ इंडियाचे, असा 55 कोटीचा कारखाना त्यांनी बुडवला. तो कारखाना 25 लाखात भावना गवळी कंपनीने विकत घेतला. शरद पवार यांनी याची चौकशी केली का? असा सवाल सोमय्यांनी केलाय. तसंच भावना गवळी यांची 100 कोटीची चौकशी होणार, असा दावाही सोमय्या यांनी यावेळी केलाय.

वाशिम दौऱ्यात सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी भावना गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर 100 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्या पार्श्वभूमीवर सोमय्या 20 ऑगस्ट रोजी वाशिम दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी भावना गवळी यांच्या समर्थकांनी किरीट सोमय्या यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवत त्यांच्या ताफ्यावर दगड फेक केली होती. याबाबत खासदार भावना गवळी यांना विचारले असता, पार्टीकल बोर्ड कारखाना हा शेतकऱ्यांचा आहे. शिवाय पोलिसांनी कारखान्यावर जाऊ नका, असे सांगूनही ते गेले, त्यामुळं शेतकरी आणि शिवसैनिक आक्रमक झाले. त्याचमुळे दगड फेक झाली असावी, असं भावना गवळी म्हणाल्या होत्या.

सोमय्या गुरुवारी बारामतीत, खरमाटेंच्या मालमत्तेची पाहणी

दुसरीकडे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधातही सोमय्या यांनी आरोपांची मालिका सुरु केलीय. त्या पार्श्वभूमीवर परब यांचे निकटवर्तीय आणि आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या मालमत्तेची पाहणी करण्यासाठी सोमय्या गुरुवारी बारामतीला जाणार आहे. यापूर्वी सोमय्या यांनी सांगलीमध्ये जात खरमाटे यांच्या सांगलीतील मालमत्तेची पाहणी केली होती. 70 हजार रुपये पगार असलेल्या अधिकाऱ्याची साडे सातशे कोटीची संपत्ती कशी? असा सवालही सोमय्या यांनी विचारला होता. दरम्यान, गुरुवारी सोमय्या बारामतीत येत असल्यानं त्यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे आणि आमदार गोपीचंद पडळकरही बारामतीला येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यावेळी सोमय्या एक पत्रकार परिषदही घेणार आहेत.

इतर बातम्या :

पुणे सामुहिक बलात्कार प्रकरण; भाजपने आपल्या दिव्याखालील अंधार पाहावा, राष्ट्रवादीचा पलटवार

अधिकारी आणि फडणवीसांच्या भेटीबाबत राष्ट्रवादीचा गंभीर आरोप, तर ‘आधी चोऱ्या, आता बहाणे’, दरेकरांचा पलटवार

Kirit Somaiya’s question to Sharad Pawar on support to Bhavna Gawli

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI