मनमोहन सिंग, राहुल गांधी आणि शिवसेनेचे आभार : शरद पवार

कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी म्हणून मी ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय तहकूब करतोय, असं पवार म्हणाले. तसेच, पवारांनी यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि शिवसेनेचे या प्रकरणात त्यांना पाठिंबा दिल्याबद्दल आभारही मानले.

मनमोहन सिंग, राहुल गांधी आणि शिवसेनेचे आभार : शरद पवार
Follow us
| Updated on: Sep 27, 2019 | 2:51 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ED office) यांनी पोलीस आयुक्तांच्या विनंतीनंतर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय तूर्तास तहकूब केला (Sharad Pawar cancels appearance at ED office). खुद्द पवारांनी माध्यमांना याबाबतची माहिती दिली. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी म्हणून मी ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय तहकूब करतोय, असं पवार म्हणाले. तसेच, पवारांनी यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि शिवसेनेचे या प्रकरणात त्यांना पाठिंबा दिल्याबद्दल आभारही मानले (Sharad Pawar thanked Shivsena).

“महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, तरुण कार्यकर्ते आणि या प्रकरणी आम्हाला साथ देणारे सर्व लोक यांना मी धन्यवाद देतो. तुम्ही अत्याचार अन्यायाविरुद्ध भूमिका घेतली. महाराष्ट्रातील सामुहिक शक्ती कशी एकत्रित होते याचं प्रदर्शन तुम्ही घडवून आणलं. यामध्ये राहुल गांधी, मनमोहन सिंग आणि वरिष्ठ राष्ट्रीय नेत्यांनी सुद्धा आम्हाला संपर्क साधून या प्रकरणी आम्ही तुमच्यासोबत असल्याची भूमिका मांडली. त्यांचेही मी आभार मानतो, तसेच शिवसेनेनेही यात सहभाग घेतला त्यांचेही मी आभार मानतो”, असं शरद पवार म्हणाले (Sharad Pawar thanked Shivsena).

राहुल गांधींचं पवारांसाठी ट्वीट

शरद पवारांच्या समर्थनार्थ राहुल गांधींनीही ट्वीट केलं. यामध्ये त्यांनी भापज सरकारवर घणाघात केला. “भाजपकडून सूडभावनेने लक्ष्य केलेले शरद पवार हे आणखी एक विरोधी पक्षनेते आहेत, महाराष्ट्र निवडणुकीच्या महिनाभरआधी कारवाई, सरकारच्या सूडभावनेचा निषेध”, असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं.

पवारांवर गुन्हा चुकीचा : संजय राऊत

दरम्यान, कुठल्याही तक्रारीत नाव नसताना शरद पवारांवर (money laundering sharad pawar) गुन्हा दाखल का केला गेला, असा सवाल आता सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाचे नेते संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांनी उपस्थित केला आहे. इतकंच नाही, तर आजपर्यंत महाराष्ट्रात काँग्रेसच्या राजवटीतही एव्हढं टोकाचं राजकारण कधी झालं नाही, असं म्हणत त्यांनी राज्यातील भाजप सरकारवर निशाणा साधला.

हेही वाचा : ईडीचा शरद पवारांना ई-मेल, तूर्तास चौकशीची गरज नाही!

शरद पवार महाराष्ट्रतीलच नाही तर देशातील महत्त्वाचं व्यक्तीमत्व आहे. ज्या प्रकरणात शरद पवारांचं नाव नाही, त्या प्रकरणात त्यांच्यावर गु्न्हा दाखल केला, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली.

तसेच, “महाराष्ट्रात कधीही बदल्याचं राजकारण झालं नाही, काँग्रेसच्या काळातही देशात आणि राज्यात इतक्या टोकाचं राजकारण झालं नाही. अशाप्रकारे तपास यंत्रणांचाही कधी कुणी गैरफायदा घेतला नव्हता, हे देशासाठी तसेच राजकारणासाठी घातक आहे”, असं म्हणत संजय राऊत यांनी राज्यातील देवेंद्र सरकारवरही निशाणा साधला.

शरद पवार काय म्हणाले?

“याबाबत माझी हवं ते सहकार्य करण्याची माझी तयारी आहे. पण निवडणूक आयुक्ताने महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर केल्याने, हा महिना महाराष्ट्रभर फिरण्यात जाईल. त्यामुळे मी मुंबईत नसेन. पण त्याचा अर्थ असा कुणी काढू नये की मी याला सामोरं जाण्यासाठी तयार नाही.”

हेही वाचा : पवारांवर गुन्हा चुकीचा, संजय राऊतांची प्रतिक्रिया, आव्हाड म्हणाले थँक्यू!

“मी माझी भूमिका मांडण्यासाठी ईडी कार्यालयात जाणार होतो. याबाबत लेखी सूचनाही ईडीला केली होती. त्यांचं काल मला उत्तर आलं. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की, आम्ही तुम्हाला बोलवलेलं नाही. ‘इथे येण्याची आवश्यकता नाही. पुढे जर कधी गरज पडली तर आम्ही पूर्वसूचना तुम्हाला देऊ’, असं पत्र ईडीने पाठवलं”.

“याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुंबई पोलीस आयुक्त आणि सहपोलीस आयुक्तांनी, विनंती केली. महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. शहराशहरात-जिल्ह्यात संताप आहे. मुंबईत येणाऱ्यांना बाहेरच अडवलं जातंय, अशा तक्रारी आहेत. आयुक्तांनी विनंती केली की या सर्व पार्श्वभूमीवर मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. माझ्या एखाद्या कृतीमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून तूर्तास ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय तहकूब करतोय”, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी व्यक्त केली.

शरद पवार, अजित पवारांसह 70 जणांविरोधात गुन्हा दाखल

राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी शरद पवार (money laundering sharad pawar) , अजित पवार (money laundering ajit pawar) यांच्यासह 70 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राज्य सहकारी बँकेच्या गैरव्यवहारातील 25 हजार कोटींच्या या व्यवहारात पैशांचा लाभ कुणाला हा तपासाचा मुख्य भाग आहे.

पाहा व्हिडीओ :

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.