AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या कुर्त्याचा रंग आणि भाजपचा भगवा एकच का? शर्मिला ठाकरेंचं दिलखुलास उत्तर

मनसेची भूमिका बदलली आहे का, असा प्रश्न विचारल्यावर भूमिका बदललेली नाही, असं शर्मिला ठाकरेंनी स्पष्ट केलं.

तुमच्या कुर्त्याचा रंग आणि भाजपचा भगवा एकच का? शर्मिला ठाकरेंचं दिलखुलास उत्तर
| Updated on: Feb 09, 2020 | 1:00 PM
Share

मुंबई : तुमच्या कुर्त्याचा रंग आणि भाजपचा भगवा एकच आहे का? असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना विचारण्यात आला. तेव्हा वारकरी आणि छत्रपतींचाही भगवाच होता, असं दिलखुलास उत्तर शर्मिला ठाकरेंनी (Sharmila Thackeray MNS Morcha) दिलं. बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मनसेने आयोजित केलेल्या मोर्चात राज ठाकरे सहकुटुंब सहभागी होणार आहेत.

मनसेची भूमिका बदलली आहे का, असा प्रश्न विचारल्यावर भूमिका बदललेली नाही, असं शर्मिला ठाकरेंनी स्पष्ट केलं. मोर्चासाठी तुम्ही भगव्या रंगाचा कुर्ता घातला का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच शर्मिला ठाकरे मनमुराद हसल्या. मी भगवा नेहमी घालते, राजसाहेबही घालतात. आणि हा टॉमेटो कलर आहे, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या. गिरगाव चौपाटीवरील हिंदू जिमखान्यावरुन निघणाऱ्या मनसेच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी शर्मिला ठाकरे आणि मनसेच्या महिला कार्यकर्त्या-पदाधिकारी ‘कृष्णकुंज’वरुन रवाना झाल्या.

भाजपचा आणि तुमचा भगवा सेम आहे का? असा प्रश्न विचारला असता, वारकऱ्यांचाही भगवा होता आणि छत्रपतींचाही भगवा होता. आम्ही कधीच हिंदूत्व सोडलं नव्हतं. रझा अकादमीच्या वेळी फक्त राज साहेबांनी मोर्चा काढला होता. आता ते आपली भूमिका आणि त्यांचे विचार तुम्हाला सांगतील. त्यांनी सांगितलेलं चांगलं, असं म्हणत शर्मिला ठाकरे मोर्चासाठी रवाना झाल्या.

राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी मनसेच्या महाअधिवेशनातून राजकारणात एन्ट्री घेतली आहे. मनसेच्या नेतेपदाची जबाबदारी मिळालेले अमित ठाकरे मोर्चाच्या आयोजनातही हिरीरीने पुढे दिसत होते. मनसेचा मोर्चा ही अमित ठाकरेंसाठी चांगली संधी असल्याने त्यांचा सहभाग साहजिकच होता.

मोर्चात राज ठाकरे यांच्याबरोबरच पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित ठाकरे, कन्या उर्वशी ठाकरे आणि सूनबाई मिताली ठाकरे सामील होणार आहेत. मात्र मनसेच्या महाअधिवेशनावेळी दिसलेल्या राज यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे मोर्चात सहभागी होण्याची शक्यता नाही.

मनसेच्या मोर्चात राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार!

गिरगाव चौपाटीजवळील हिंदू जिमखान्यापासून मनसेच्या मोर्चाला सुरुवात होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे दुपारी दोन वाजता सहकुटुंब मोर्चात सहभागी होतील. आझाद मैदानावर पोहचल्यानंतर राज ठाकरे जाहीर सभेला संबोधित करतील. पुणे, नाशिकसह राज्यभरातील मनसैनिक मोर्चाला उपस्थित राहण्यासाठी मुंबईत आले आहेत.

मनसेच्या मोर्चाचा मार्ग

गिरगाव चौपाटीवरील हिंदू जिमखाना येथून मोर्चाला सुरुवात होईल. स्वतः राज ठाकरे मोर्चात सहभागी होतील. सर्व कार्यकर्ते, मोर्चात सहभागी संघटना आणि सर्वसामान्य नागरिक मागे असतील.

शामलदास गांधी मार्गावरुन हा मोर्चा पुढे जाईल. मोर्चा मेट्रो सिनेमा भागात पोहचल्यानंतर राज ठाकरे आणि काही नेते महापालिका मार्गावरुन आझाद मैदानात आत जातील. मनसे कार्यकर्ते आणि मोर्चात सहभागी झालेल्या व्यक्ती फॅशन स्ट्रीटच्या समोरील रस्त्यावरुन तीन गेटनी आझाद मैदानात आत जातील.

मुंबईतील आझाद मैदानात सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. भव्य स्टेज उभारण्यात आला असून दोन लाख जणांसाठी आसनव्यवस्थाही करण्यात आली आहे.

आझाद मैदानात उभारलेल्या भव्य स्टेजवर आधी मनसे नेत्यांची भाषणं होतील. अखेरीस राज ठाकरे यांचं भाषण होईल. हा मोर्चा का काढण्यात आला आहे, याचा उद्देश काय, हे राज ठाकरे आपल्या भाषणातून सांगतील. त्यानंतर मोर्चाची सांगता होईल.

Sharmila Thackeray MNS Morcha

माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....