शशिकांत शिंदे पडला त्याला 100 टक्के शिवेंद्रराजे जबाबदार; आमदार शिंदेंचे सहकार पॅनेल प्रमुखांनाही सवाल

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यानी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी जिल्हा बँक निवडणुकीत झालेल्या पराभवावर भाष्य केलं.

शशिकांत शिंदे पडला त्याला 100 टक्के शिवेंद्रराजे जबाबदार; आमदार शिंदेंचे सहकार पॅनेल प्रमुखांनाही सवाल
शिवेंद्रराजे भोसले शशिकांत शिंदे


सातारा: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यानी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी जिल्हा बँक निवडणुकीत झालेल्या पराभवावर भाष्य केलं. जिल्हा बँकेच्या संदर्भात जे आरोप प्रत्यारोप झालेले आहेत. ते माझ्यावर झालेले नाहीत. निवडणुकीत गाफीलपणा नडल्याच्या बातम्या दिल्या गेल्या. परंतु, चर्चा सुरु झाल्या होत्या त्यावेळी काही जणांनी हस्तक्षेप वाढल्याचं म्हटलं त्यावर सविस्तर बोलणार आहे. सहकार पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवली गेली. सहकार पॅनेलचे इतर उमेदवारही पडले, त्यासंदर्भात पॅनेल प्रमुखांनी खुलासा करायला हवा होता. मात्र, त्यांनी न केल्यानं मला भूमिका घ्यावी लागत आहे. मी पराभूत झाल्यावर काहीजण नृत्यात सहभागी झाली यामुळे या कटाचा सुत्रधार कोण हे ओळखावं, असं शशिकांत म्हणाले. माझ्या पराभवाला शिवेंद्रराजे भोसले जबाबदार असल्याचा आरोप आमदार शिंदे यांनी केला आहे.

पराभवाला शिवेंद्रराजेचं जबाबदार

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 100%राजकारण झालंय. माझ्या पराभवाला शिवेंद्रराजे भोसले जबाबदार असल्याचा आरोप आमदार शिंदे यांनी केला आहे. ऐकलं नाहीतर तर माझ्या कारखान्याला ऊस नेऊ देणार नाही, असं सागंण्यात आल्याचा आरोपही शिंदे यांनी केलाय. शिवेंद्रराजे भोसले यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्याचं आश्वासन देत राजकारण केलं गेलं. पहिल्यांदाच सांगितलं असतं की माझ्या कार्यकर्त्यांचं ऐकणार आहे तर मला निर्णय घेता आला असता.

पॅनेल प्रमुख बोलले नाहीत त्यामुळं बोलावं लागलं

माझ्या मनात कोनाविषयी पाप नाही मला पक्षाने सर्व काही दिलंय. सहकार पॅनेलच्या माध्यमातून उमेदवार निवडले होते पण सहकार मधील उमेदवार का पडले हे पॅनेल प्रमुखांनी बोलणे गरजेचे होते. शिवाजीराव महाडिक आणि नंदकुमार मोरे का पडले याची चर्चा झाली पाहिजे. मी सरळ मनाचा नेता आहे मनात एक तोंडात एक अशी माझी वृत्ती नाही, असं आमदार शशिकांत शिंदे म्हणाले. मी शेवट पर्यन्त पक्षाचा पॅनेलच्या निर्णयाच्या बाहेर आलो नाही हिच माझी चूक झाली असल्याचं शशिकांत शिंदे म्हणाले. मी पराभूत झाल्यावर काहीजण नृत्यात सहभागी झाली त्यामुळे या कटाचा सुत्रधार कोण हे ओळखावे, असं शशिकांत शिंदे म्हणाले.

उदयनराजे भोसले यांना बिनविरोध कसं केलं?

सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांच्या जागेसंदर्भात रोज वर्तमानपत्रात छापून येत होतं. मात्र, अचानक काय घडलं की त्यांना बिनविरोध करण्यात आलं. जे पाच वर्ष प्रामाणिक राहिले त्यांना पराभतू करण्यात आलं. हे न समजण्या इतका दूधखुळा मी नाही, असं शशिकांत शिंदे म्हणाले.

मी राजा नाही ना…

राष्ट्रवादीचे काही नेते माझ्या पराभवला जबाबदार आहेत याबाबत पक्षश्रेष्ठींसोबत बोलणार असल्याचं शशिकांत शिंदे म्हणाले. पक्षाशी प्रामाणिक राहणाऱ्यांना तुम्ही सहकार्य करत नाही ही चौकट मला कळत नाही. पत्रकारांनी
उदयनराजे भोसले,शिवेंद्रराजे भोसले,शिवरुपराजे खर्डेकर,रामराजे नाईक निंबाळकर हे राजे बिनविरो्ध होत असतील तर तुम्ही का नाही असं विचारलं असता मी राजा नाही, असं शशिकांत शिंदे यांनी उत्तर दिलं. पक्ष वाढीसाठी पक्षाने आदेश दिला तर सातारा जिल्हयातील निवडणुकीसाठी काम करणार असल्याचं शशिकांत शिंदे म्हणाले. सातारा नगरपालिकेमध्ये या पुढील काळात लक्ष घालणार असल्याचंही शशिकांत शिंदे म्हणाले.

इतर बातम्या:

Vidhan parishad election : विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठ्या ”घोडेबाजारा”ची शक्यता, एका मतासाठी 50 लाख देणार?

संपात दुही : पडळकर-खोतांना आझाद केले, विलीनीकरणासाठी डंके की चोट पे आंदोलन, नवे नेतृत्व सदावर्तेंचा इशारा!

Shashikant shinde said shivendraraje bhonsle responsible for defeat in Satara District Bank Election

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI