तीन महिन्यांच्या आमदारकीसाठी शिवसेना आक्रमक

नागपूर : भाजपचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर नागपुरातील काटोल विधानसभा सदस्यत्वाची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी 11 एप्रिलरोजी लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदाना दिवशीच मतदान होणार आहे. मात्र, काटोलमधून जो कुणी आमदार म्हणून निवडून येईल, त्याला केवळ तीन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. कारण त्यानंतर विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण होईल. त्यामुळे इथून कुणीच लढण्यासाठी […]

तीन महिन्यांच्या आमदारकीसाठी शिवसेना आक्रमक
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

नागपूर : भाजपचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर नागपुरातील काटोल विधानसभा सदस्यत्वाची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी 11 एप्रिलरोजी लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदाना दिवशीच मतदान होणार आहे. मात्र, काटोलमधून जो कुणी आमदार म्हणून निवडून येईल, त्याला केवळ तीन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. कारण त्यानंतर विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण होईल. त्यामुळे इथून कुणीच लढण्यासाठी इच्छुक नसल्याचे दिसत असताना, शिवसेना मात्र या जागेसाठी आक्रमक झाली आहे.

2014 ची विधानसभा निवडणूक शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढली होती. त्यावेळी काटोल विधानसभा मतदारमधून भाजपच्या तिकिटावर डॉ. आशिष देशमुख विजयी झाले होते. मात्र, वेगळ्या विदर्भाचा मुद्दा, शेतकऱ्यांचे प्रश्न इत्यादी मुद्द्यांवरुन डॉ. आशिष देशमुख स्वपक्षाच्या सत्तेवर नाराज झाले आणि आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे काटोलची जागा गेल्या काही महिन्यांपासून रिक्त आहे.

कोण होणार तीन महिन्यांचा आमदार?

अखेर लोकसभेच्या निवडणुकांसोबत काटोलच्या जागेवरही मतदान होणार आहे. येत्या 11 एप्रिलला इथे मतदान पार पडेल. मात्र, या जागेवरुन जिंकून येणाऱ्या आमदाराला केवळ तीन महिन्यांचा कालावधी मिळेल. त्यामुळे कुणीही लढण्यासाठी इच्छुक असल्याचे दिसत नव्हते. मात्र, आता काटोलमधील शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत, थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे साकडं घातलं आहे की, काटोलमधून सेनेचा उमेदवार उभा करावा.

शिवसेना-भाजप युती झाल्याने काटोलची जागा कुणाला मिळणार, याबाबत शंका असल्याने काटोलमधील शिवसैनिकांनी थेट उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि काटोलमधून सेनेचा उमेदवार द्यावा, अशी मागणी केली. आता येत्या 11 एप्रिलपर्यंत हे स्पष्ट होईल की, काटोलची जागा शिवसेना लढवणार की भाजप?

काटोल विधानसभा

नागपुरातील काटोल विधानसभा मतदारसंघावर महाराष्ट्राच्या स्थापनेपासून कायम काँग्रेसचं वर्चस्व राहिलं आहे. मात्र1995 साली अनिल देशमुख अपक्ष म्हणून आणि पुढे तेच अनिल देशमुख राष्ट्रवादीकडून जिंकत गेले. त्यामुळे पुढे काटोल राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ठरला. मात्र 2014 साली डॉ. आशिष देशमुखांनी राष्ट्रवादीच्या ताब्यातून काटोल खेचून आणलं आणि जिंकले. मात्र, विदर्भाचा मुद्दा, शेतकऱ्यांचा मुद्दा इत्यादी मुद्द्यांवरुन डॉ. आशिष देशमुख यांनी राजीनामा दिला.

डॉ. आशिष देशमुखांचा राजीनामा

डॉ. आशिष देशमुख हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री रणजित देशमुख यांचे सुपुत्र आहेत. अत्यंत उच्चशिक्षित असलेले डॉ. आशिष देशमुख यांनी भाजपकडून विधानसभा लढवली आणि जिंकलेही. मात्र, विदर्भातील विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी सत्ताधारी स्वपक्षावरच नाराजी व्यक्त केली आणि आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे काटोल विधानसभा मतदारसंघात आता पोटनिवडणूक घेण्यात येत आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.