‘ज्यांना सिंधुदुर्गाचं नेतृत्व करता आलं नाही ते आता उद्धव ठाकरेंसारख्या संयमी नेतृत्वावर टीका करतायत’

'ज्यांना सिंधुदुर्गाचं नेतृत्व करता आलं नाही ते आता उद्धव ठाकरेंसारख्या संयमी नेतृत्वावर टीका करतायत'

आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या कम्पॅरिझनमधेसुद्धा तुम्ही टिकू शकत नाही. | Deepak Kesarkar

Rohit Dhamnaskar

|

Dec 01, 2020 | 5:47 PM

सिंधुदुर्ग: नारायण राणे (Narayan Rane) यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कधीही भरीव निधी आणता आला नाही. त्यांना साधं सिंधुदुर्गाचं नेतृत्व करता आलं नाही आणि ते आज उद्धव ठाकरे यांच्यासारख्या संयमी नेतृत्वावर टीका करत आहेत, अशी टीका शिवसेना नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केली. (Shivsena leader Deepak Kesarkar slams Narayan Rane)

दीपक केसरकर यांनी मंगळवारी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी नारायण राणे यांच्यावर आगपाखड केली. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या कम्पॅरिझनमधेसुद्धा तुम्ही टिकू शकत नाही. तुम्ही स्वतः मुख्यमंत्री होता तेव्हा फक्त 80 कोटी रूपये आणत होता. माञ, मी साधा राज्यमंत्री असताना अडीचशे अडीचशे कोटी रूपये जिल्हा नियोजन साठी आणले. मग कुठे आहे तुमची शक्ती? त्याकाळी जे कोकणात रस्ते झाले ते सुद्धा सुरेश प्रभू यांनी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून आणले मग तुम्ही पुर्ण केलेलं एक तरी काम दाखवा. केवळ माध्यमांना वेगवेगळ्या मुलाखती द्यायच्या आणि आपण कोणीतरी मोठे आहोत आपण काहीतरी मोठा विकास केला असे भासवायचे, अशी टीका केसरकर यांनी केली.

यावेळी दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांची पाठराखणही केली. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबानंतर शिवसेना टिकवली आणि बाळासाहेब असताना जेवढे आमदार निवडून येऊ शकले नाहीत, तेवढे त्यांनी भाजप सोबत नसताना निवडून आणले. केवळ पवार साहेबांच्या आग्रहाखातर त्यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारले. अन्यथा एखादा शिवसैनिकच मुख्यमंत्री झाला असता, असे केसरकर यांनी सांगितले.

‘WHO ने उद्धव ठाकरेंच्या कामाचं कौतुक केलं’

कोरोनासारख्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाची दखल WHO ने घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा नेहमी ड्रायव्हरचं असतो. राज्याचा गाडा तो हाकत असतो आणि त्यामुळे कुशल ड्रायव्हर जर तो नसेल तर राज्याचा गाडा हा चुकीच्या दिशेने जाऊ शकतो आणि म्हणून उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या गाडीचं ड्रायव्हिंग स्वतः केलं म्हणून त्यांच्यावर टीका करणं यासारखी दुर्दैवी बाब कोणतीच नाही, अशी खरमरीत टीका केसरकर यांनी राणे यांच्यावर केली.

संबंधित बातम्या:

विकासाकडे नेणारा ड्रायव्हर मुख्यमंत्री चालेल, नारायण राणे सारखा डराव डराव करणारा बेडूक नको : विनायक राऊत

महाराष्ट्राला कर्तबगार मुख्यमंत्री हवा, ड्रायव्हर नकोय; नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

Devendra Fadnavis | महाविकासआघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण, मात्र अचिव्हमेंट काय?, देवेंद्र फडणवीसांची सडकून टीका

(Shivsena leader Deepak Kesarkar slams Narayan Rane)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें