AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Assembly Session : बंडखोरांवर विधानसभेच्या गॅलरीतून वॉच, नार्वेकर, देसाई, परब गॅलरीत; शिवसेना मोठ्या खेळीच्या तयारीत?

Maharashtra Assembly Session : विधानसभेच्या प्रेक्षक गॅलरीत शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, अनिल देसाई, अनिल परब, अरविंद सावंत, विनायक राऊत आणि सचिन अहिर उपस्थित होते.

Maharashtra Assembly Session : बंडखोरांवर विधानसभेच्या गॅलरीतून वॉच, नार्वेकर, देसाई, परब गॅलरीत; शिवसेना मोठ्या खेळीच्या तयारीत?
बंडखोरांवर विधानसभेच्या गॅलरीतून वॉच, नार्वेकर, देसाई, परब गॅलरीतImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 03, 2022 | 6:13 PM
Share

मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर त्यांनी भाजपसोबत युती केली. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. त्यानंतर तब्बल 12 दिवसानंतर ते बंडखोर आमदारांना घेऊन मुंबईत आले. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ते आमदारांना घेऊन मुंबईत आले. आज सकाळी सर्व आमदारांना बसमध्ये बसवलं. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांच्या पुतळ्याजवळ येऊन त्यांनी अभिवादन केलं. त्यानंतर हे सर्व आमदार विधानसभेत आले. सर्वच आमदारांनी भगवे फेटे बांधले होते. सर्व आमदारांना घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत आले. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये. आमदारांना काहीही होऊ नये म्हणून सर्व खबरदारी घेतली जात होती. सभागृहात हे आमदार बसले. पण ते सत्ताधारी बाकावर होते. तर समोर शिवसेनेचे (shivsena) आमदार होते. अन् विधानसभेच्या प्रेक्षक गॅलरीत शिवसेनेचे काही नेते बसले होते. या बंडखोरांवर वॉच ठेवण्यासाठी हे आमदार प्रेक्षक गॅलरीत बसले असल्याची यावेळी जोरदार चर्चा सुरू होती.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून राजन साळवी तर भाजपकडून राहुल नार्वेकर उभे होते. या निवडणुकीत नार्वेकर यांना 164 मते मिळाली तर राजन साळवी यांना फक्त 107 मते मिळाली. साळवी यांचा पराभव करत नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष म्हणून निवडून आले. या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. बंडखोर तब्बल 12 दिवसानंतर मुंबईत आले होते. आजही 12 ते 15 बंडखोर आमच्या संपर्कात आहेत. त्यांना गुवाहाटीत डांबून ठेवलं आहे, असं शिवसेनेकडून वारंवार सांगितलं जात होतं. त्यामुळे बंडखोर खरोखरच शिवसेनेला मतदान करतात की शिंदे यांच्या पाठी ठाम उभे राहतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

गॅलरीतून बंडखोरांचं निरीक्षण

बंडखोरांच्या या हालचालींवर शिवसेनेचंही बारकाईने लक्ष होतं. विधानसभेच्या प्रेक्षक गॅलरीत शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, अनिल देसाई, अनिल परब, अरविंद सावंत, विनायक राऊत आणि सचिन अहिर उपस्थित होते. सभागृहात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर त्यांचे लक्ष होते. बंडखोर काय करतात? त्यांना कोण काही सूचना देतात का? बंडखोरांपैकी कुणी आपल्याकडे पाहतंय का? त्यांची बॉडी लँग्वेज काय आहे? याकडे शिवसेना नेत्यांचे लक्ष होते.

अपेक्षित काहीच घडलं नाही

शिवसेनेच्या या नेत्यांनी प्रेक्षक गॅलरीत बसून मतदानाची प्रक्रिया संपूर्ण पाहिली. तसेच शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभू यांची भाषणे ऐकली. त्याशिवाय राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची भाषणेही ऐकली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषणही ऐकलं आणि आता अपेक्षित काहीच घडत नसल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी गॅलरीतून निघून जाणं पसंत केलं. शिवसेना नेते बंडखोरांवर वॉच ठेवून होते. पण अपेक्षित काही घडलं नाही. त्यामुळे आता शिवसेना वेगळी खेळी खेळणार का? की पक्ष उभारणीसाठी अधिकाधिका वेळ घालवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.