‘केंद्रीय तपास यंत्रणेचा दलाल व शिवसेनेमुळे ‘माजी खासदार’ झालेल्या नेत्याकडून आमची बदनामी’

Pratap Sarnaik kirit Somaiaya | एका केसमधून जामीन मिळाला तर जाणीवपूर्वक दुसऱ्या केसमध्ये गुंतवले जात आहे. त्यातून बाहेर आलो की तिसऱ्या केसमध्ये अडकवले जात आहे. हे जाणीवपूर्वक केलं जात आहे.

'केंद्रीय तपास यंत्रणेचा दलाल व शिवसेनेमुळे 'माजी खासदार' झालेल्या नेत्याकडून आमची बदनामी'
किरीट सोमय्या आणि प्रताप सरनाईक
Follow us
| Updated on: Jun 20, 2021 | 2:12 PM

मुंबई: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्बमुळे सध्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पत्रात प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiaya) यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. शिवसेनेच्या काही नेत्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना नाहक त्रास दिला जात असल्याचे म्हटले आहे. कोणताही गुन्हा किंवा चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास सुरू आहे. केंद्रीय यंत्रणेचा दलाल आणि शिवसेनेमुळे ‘माजी खासदार’ झालेल्या नेत्याकडून जी बदनामी सुरू असल्याचे सरनाईक यांनी पत्रात म्हटले आहे. (Shivsena leader pratap sarnaik take a dig at BJP former MP Kirit Somaiya)

आम्हाला टार्गेट करताना आमच्या कुटुंबीयांवरही आघात होत आहे. एका केसमधून जामीन मिळाला तर जाणीवपूर्वक दुसऱ्या केसमध्ये गुंतवले जात आहे. त्यातून बाहेर आलो की तिसऱ्या केसमध्ये अडकवले जात आहे. हे जाणीवपूर्वक केलं जात आहे. भाजपशी जुळवून घेतलं तर हे कुठेतरी थांबेल, अशी व्यथाही त्यांनी मांडली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना कमकुवत करतेय, भाजपशी जुळवून घ्या; प्रताप सरनाईक यांचा लेटरबॉम्ब

त्यामुळे प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा भाजपशी जुळवून घेण्याची विनंती केली आहे. जेणेकरून केंद्रीय यंत्रणांकडून शिवसेना नेत्यांना दिला जाणारा त्रास थांबेल, असे सरनाईक यांचे म्हणणे आहे. युद्धात लढत असताना अभिमन्यूसारखे लढण्यापेक्षा किंवा कर्णासारखे बलिदान देण्यापेक्षा, धनुर्धारी अर्जुनासारखे लढावे असे मला वाटते. त्यामुळे राज्यात आपली सत्ता असताना सुद्धा व राज्य शासनाचे किंवा इतर अन्य कुठल्याही नेत्याचे सहकार्य मिळत नसताना, कुणालाही त्रास न देता मी माझी कायदेशीर लढाई माझ्या कुटुंबासह गेल्या सात महिन्यांपासून लढत आहे, याकडेही प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं आहे.

नाहक त्रास थांबेल

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना शिवसेनेचा मुख्यमंत्री बसविण्याचा तुम्ही शब्द दिला होता. तो पूर्ण करून दाखवला. तुम्ही पदाला न्यायही देत आहात. पण या परिस्थितीही राजकारण सुरू आहे. सत्तेत राहूनही काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेचे कार्यकर्ते, नेते फोडत आहे. आपला पक्ष कमकुवत करत असेल तर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जुळवून घेतलेले बरे. हे माझे वैयक्तिक मत आहे. त्यामुळे निदान प्रताप सरनाईक. अनिल परब आणि रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना होणारा नाहक त्रास थांबेल अशी कार्यकर्त्यांची भावना आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या:

Kirit Somaiya | प्रताप सरनाईक यांना लवकरच अटक होणार, किरीट सोमय्यांचा दावा

Kirit Somaiya | प्रताप सरनाईक यांचा आणखी एक घोटाळा उघड करणार, किरीट सोमय्यांचा दावा

प्रताप सरनाईकांच्या नावे 112 सातबारे; पुरावे घेऊन किरीट सोमय्या थेट ED कार्यालयात

(Shivsena leader pratap sarnaik take a dig at BJP former MP Kirit Somaiya)

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.