AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचा अध्यक्ष ते खासदार, कोण आहेत राहुल शेवाळे?

राहुल शेवाळे हे एकेकाळी मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणातील मोठं प्रस्थ होतं. | Shiv Sena MP Rahul Shewale

मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचा अध्यक्ष ते खासदार, कोण आहेत राहुल शेवाळे?
राहुल शेवाळे, शिवसेना खासदार
| Updated on: May 13, 2021 | 4:20 PM
Share

मुंबई: शिवसेनेच्या मुंबईतील खासदारांपैकी एक प्रमुख नाव म्हणजे राहुल शेवाळे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेत असलेल्या राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी पालिका स्तरावर अनेक वर्षे काम केल्यानंतर संसदेत प्रवेश केला. 2014 सालच्या मोदी लाटेत राहुल शेवाळे पहिल्यांदा दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला. त्यानंतर 2019 मध्ये राहुल शेवाळे पुन्हा एकदा लोकसभेची निवडणूक जिंकण्यात यशस्वी ठरले. (Shiv Sena MP Rahul Shewale political journey)

कोण आहेत राहुल शेवाळे?

राहुल शेवाळे यांचा जन्म 14 एप्रिल 1973 रोजी मुंबईत झाला. सुशिक्षित कुटुंबात जन्माला आलेल्या राहुल शेवाळे यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. 2005 मध्ये त्यांनी शिवसेनेच्याच नगरसेविका कामिनी मयेकर यांच्याशी विवाह केला होता. या दाम्पत्याला दोन मुले आहेत.

राहुल शेवाळे यांची राजकीय कारकीर्द

बऱ्याच वर्षांपासून शिवसेनेत असलेल्या राहुल शेवाळे यांनी पालिकेच्या राजकारणात चांगलाच जम बसवला होता. सुरुवातीच्या काळात ते अणुशक्तीनगर येथून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 2004 मध्ये त्यांनी तुर्भे विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. परंतु, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

राहुल शेवाळे हे एकेकाळी मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणातील मोठं प्रस्थ होतं. त्यांनी 2010 ते 2014 अशी सलग चार वर्षे मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समितीच्या अध्यक्षपदी राहण्याचा मान मिळवला आहे. पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या स्थायी समितीच्या हातात असल्याने हे पद अतिश्य महत्त्वाचे समजले जाते.

मात्र, 2014 मध्ये शिवसेनेने दक्षिण मध्य मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिल्यामुळे राहुल शेवाळे यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद सोडले. त्यानंतर राहुल शेवाळे यांनी 2014 आणि 2019 अशा दोन वेळेला लोकसभेची निवडणूक जिंकली.

ग्लोबल टेंडर काढूनही मुंबईला लस मिळाली नाही तर ते अपयश केंद्राचे असेल: खासदार राहुल शेवाळे

महानगरपालिकेने मुंबई शहरासाठी एक कोटी कोरोना लसींची जागतिक निविदा काढली आहे. आता त्यावरुनही राजकारण सुरु होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेच्या जागतिक निविदासाठी जगभरातील अनेक कंपन्या उत्सुक असून त्या योग्य असा प्रतिसाद देतील. पण केंद्र सरकारच्या परवानगी अभावी त्यांची अडवणूक लसींसाठी जागतिक निविदा काढल्यानंतरही मुंबईला लस पुरवठा होणार का असा सवाल उपस्थित केला जातोय. जागतिक निविदा काढूनही मुंबईला लस मिळाली नाही तर ते अपयश केंद्राचे असेल असं शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे.

‘IFSC गुजरातमध्ये गेले तर मुंबईतून केंद्राला जाणारा कर रोखू’

मध्यंतरी आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रावरुन (आयएफएससी) रंगलेल्या वादातही राहुल शेवाळे यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली होती. मुंबईतील नियोजित आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातमध्ये हलवण्यात आले होते. केंद्र सरकारने मुंबईच्या आकसापोटी आणि गुजरातवरील प्रेमापोटी मूळ निर्णयात फेरफार करून ‘आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र’ गांधींनगर, गुजरात येथे हलविण्याचा घेतलेला निर्णय आक्षेपार्ह आहे. आयएफएससी मुंबईबाहेर गेल्यास, मुंबईतून केंद्राला जाणारा कर रोखला जाईल, अशा इशारा राहुल शेवाळे यांनी दिला होता.

(Shiv Sena MP Rahul Shewale political journey)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.