‘दावोसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलत?’ शितल म्हात्रे यांच्या प्रश्नाला प्रियंका चतुर्वेदी यांचं प्रत्युत्तर

शितल म्हात्रे यांनी 'एक्स'वर (ट्विटर) व्हिडीओ ट्विट करत निशाणा साधलाय. "तुमचा काहीच संबंध नसताना दावोसला गुलाबी थंडीत तुम्ही काय केलं? हे जरा तुम्ही लोकांना सांगा", अशी टीका शितल म्हात्रे यांनी केली. त्यांच्या या टीकेला आता प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रत्युत्तर दिलंय.

'दावोसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलत?' शितल म्हात्रे यांच्या प्रश्नाला प्रियंका चतुर्वेदी यांचं प्रत्युत्तर
प्रियंका चतुर्वेदी आणि शितल म्हात्रे यांच्यात वाकयुद्ध रंगलं आहे
Follow us
| Updated on: May 09, 2024 | 5:57 PM

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे मुंबईतलं राजकीय वातावरण तापलं आहे. विशेष म्हणजे चतुर्वेदी यांच्या टीकेनंतर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांच्याकडून प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर चांगलाच शाब्दिक प्रहार केला जातोय. प्रियंका चतुर्वेदी यांनी महाविकास आघाडीचे उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघाचे उमेदवार संजय दीना पाटील यांच्यासाठी आयोजित प्रचारसभेत एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली. प्रियंका चतुर्वेदी “एकनाथ शिंदे कोण आहेस तू? कोण आहेस तू?” म्हणून मोठ्याने ओरडत होत्या. समोरची गर्दी “गद्दार, गद्दार” अशी ओरडत होती. “ठाण्यापर्यंत हा आवाज पोहोचला पाहिजे. गद्दार गद्दारच राहणार”, असं प्रियंका चतुर्वेदी यावेळी म्हणाल्या.

यावेळी प्रियंका चतुर्वेदी यांनी ‘दीवार’ चित्रपटाचा उल्लेख केला. “दीवार सिनेमात अमिताभ बच्चन त्याचा हात दाखवतो, ‘मेरा बाप चोर हैं’ असं त्यावर लिहिलेलं असतं, तसंच श्रीकांत शिंदेंच्या कपाळावर लिहिलय, ‘मेरा बाप गद्दार हैं’”, अशी टीका प्रियंका चतुर्वेदी यांनी केली. या टीकेनंतर शितल म्हात्रे यांनी अतिशय खोचक शब्दांत प्रियंका चुतर्वेदी यांच्यावर टीका केली.

शितल म्हात्रे काय म्हणाल्या?

शितल म्हात्रे यांनी ‘एक्स’वर (ट्विटर) व्हिडीओ ट्विट करत निशाणा साधलाय. “तुमचा काहीच संबंध नसताना दावोसला गुलाबी थंडीत तुम्ही काय केलं? हे जरा तुम्ही लोकांना सांगा”, अशी टीका शितल म्हात्रे यांनी केली. “प्रिय चतुर ताई, आपण खासदारकी कशी मिळवली आहे हे खरंतर तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे. कारण मराठीचा गंध नसताना, कुठलंही कर्तृत्व नसताना, शिवसेनेशी संबंध नसताना देखील आपण खासदारकी मिळवलीत. आता खासदारकीची टर्म संपत आल्यानंतर आपली जी तडफड चालली आहे हे आपल्या वक्तव्यातून दिसत आहे. खरंतर बुलंदी मधला एक डायलॉग तुम्हाला कदाचित माहिती नसेल. बिल्ली के दात गिरे नहीं, चली शेर के मुँह में हात डालने, अशीच काहीतरी तुमची परिस्थिती झालेली आहे”, अशीदेखील टीका शितल म्हात्रे यांनी केली.

“आपल्याला परत खासदारकी मिळावी यासाठी तुम्ही गेल्या आठवड्यात कुणाकुणाला भेटलात आणि माझ्याकडे आदित्यचे कसे फोटोग्राफ आहेत हे दाखवून तरी मला खासदारकी द्या, असं सांगणाऱ्या तुम्ही, तेव्हा तुम्ही कुणाला बोलताय याचा जरा विचार करा आणि भान ठेवा”, अशा शब्दांत शितल म्हात्रे यांनी चतुर्वेदी यांना ठणकावलं. तर शितल म्हात्रे यांच्या टीकेला प्रियंका चतुर्वेदी यांनीदेखील सडेतोड प्रत्युत्तर दिलं.

प्रियंका चतुर्वेदी यांचं प्रत्युत्तर काय?

“मी कधीच दावोसला गेली नाही! पण मी एक दिवस नक्कीच जाईन. गद्दार सेनेच्या या मंदबुद्धी महिलेने हे सिद्ध केले आहे की त्या फक्त गद्दार नाहीत तर खोट्या आहेत. आता पुन्हा रडायला जा, तुझे अश्रू पुसण्यासाठी टिश्यू नाहीत. तथापि, दावोसबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या वर्षी तुमचे ठाण्याची राजपुत्र कसे होते? ते कोणत्या अधिकाऱ्याने अधिकाऱ्यांच्या बैठका घेत होते? कदाचित परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते तपशील शेअर करु शकतील”, असं प्रत्युत्तर प्रियंका चतुर्वेदी यांनी दिलं.

आता या प्रकरणावर आणखी काय-काय आरोप-प्रत्यारोप केले जातात, ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.
तर खूप जड जाणार,जरांगेंचा मुंडे बंधू भगिनींवर गंभीर आरोप अन दिला इशारा
तर खूप जड जाणार,जरांगेंचा मुंडे बंधू भगिनींवर गंभीर आरोप अन दिला इशारा.
युपीत प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी
युपीत प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी.
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.