Uddhav Thackeray : भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूंना जाहीर पाठिंबा, उद्धव ठाकरे म्हणतात, कुठल्याही दबावात निर्णय नाही

Uddhav Thackeray : आताचं राजकारण पाहिलं तर मी भाजपच्या उमदेवाराला विरोधच करायला हवा होता. पण नाही. आम्ही यापूर्वी आम्ही प्रणव मुखर्जी आणि प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला होता. कार्यकर्त्यांनी, आदिवासी नेत्यांनी आग्रह केला. प्रेमाने मागणी केली.

Uddhav Thackeray : भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूंना जाहीर पाठिंबा, उद्धव ठाकरे म्हणतात, कुठल्याही दबावात निर्णय नाही
Image Credit source: ani
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 5:51 PM

मुंबई : राष्ट्रपतीपदाची निवडणूक (presidential candidates) अवघ्या काही दिवसांवर आलेली असतानाच शिवसेनेने आपली भूमिका बदलली आहे. शिवसेनेने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे यूपीएला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं आहे. आमच्या संघटनेतील अनेक आदिवासी नेते मला भेटले. कार्यकर्ते भेटले. त्यांनी आदिवासी महिला देशाची पहिली राष्ट्रपती होणार आहे. त्यामुळे आमच्या समाजाला स्वतंत्र ओळख मिळणार आहे. त्यामुळे द्रोपदी मुर्मू (draupadi murmu) यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी माझ्याकडे केली. शिवसेनेच्या खासदारांनीही हिच विनंती केली. त्यामुळे आम्ही या निवडणुकीत द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देत आहोत, असं सांगतानाच याचा अर्थ असा नाही की माझ्यावर कुणाचा दबाव आहे, असंही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितलं.

काही बातम्या विचित्रं पद्धतीने पसरल्या आहेत. काल खासदारांची बैठक झाली. त्यात कोणीही माझ्यावर दबाव आणला नाही. राष्ट्रपतीपदी कुणाला पाठिंबा द्यायचा हे तुम्ही ठरवा. कुणाला पाठिंबा द्यायचा, कुणाला नाही हे तुम्ही सांगाल तसं करू. कारण हा विषय तुमचा आहे, असं या खासदारांनी सांगितलं. आज मी भूमिका स्पष्ट करत आहे. मी पराभूत झालेल्या काही उमेदवारांशी बोललो. जिल्हाप्रमुखांशी चर्चा सुरू आहे. खासदारांशी चर्चा सुरू आहे. शिवसेनेतील आदिवासी समाजात काम करणाऱ्याांनी विनंती केली. एकलव्य संघटनेचे ढवळे त्यांनी मला विनंती केली. निर्मला गावित आणि आमशा पाडवी यांनीही विनंती केली. आदिवासी समाजातील महिलेला राष्ट्रपती होण्याची संधी मिळत आहे. आम्हालाही ओळख मिळेल. त्यांना पाठिंबा दिला तर बरं होईल, असा प्रेमाचा आग्रह त्यांनी केला. त्यामुळे द्रोपदी मुर्मू यांना आम्ही पाठिंबा जाहीर करत आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं. पण कोणत्याही दबावामुळे पाठिंबा देत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

तर विरोधच करायला हवा होता

आताचं राजकारण पाहिलं तर मी भाजपच्या उमदेवाराला विरोधच करायला हवा होता. पण नाही. आम्ही यापूर्वी आम्ही प्रणव मुखर्जी आणि प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला होता. कार्यकर्त्यांनी, आदिवासी नेत्यांनी आग्रह केला. प्रेमाने मागणी केली. त्यामुळे आम्ही द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Non Stop LIVE Update
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.
कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी, कशेडी बोगद्यातून तुम्ही प्रवास करताय?
कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी, कशेडी बोगद्यातून तुम्ही प्रवास करताय?.
शिंदेंच्या उमेदवारांची ठाकरे गटाशी थेट लढत, शिंदेंनी कुणाला दिली संधी?
शिंदेंच्या उमेदवारांची ठाकरे गटाशी थेट लढत, शिंदेंनी कुणाला दिली संधी?.
चिन्ह वेगळं, नावात साम्य, तुतारीवरून संभ्रम? कोल्हेंचा हल्लाबोल काय?
चिन्ह वेगळं, नावात साम्य, तुतारीवरून संभ्रम? कोल्हेंचा हल्लाबोल काय?.
2 दिवसात 6 सभा... मुस्लीम आरक्षण ते मंगळसूत्र, मोदींची काँग्रेसवर टीका
2 दिवसात 6 सभा... मुस्लीम आरक्षण ते मंगळसूत्र, मोदींची काँग्रेसवर टीका.