Shiv Sena : एक पोस्ट, हकालपट्टी, फोनाफोनी, पुन्हा हकालपट्टी, पुन्हा फोन आणि भेट; आढळरावांनी सांगितली इन्साईड स्टोरी

शिवसेना पक्षातील समिकरणे ही काही एका रात्रीतून घडलेली नाहीत. आता आमदारांनी घेतलेल्या भूमिकेला महिना होत आहे. पक्षातील काही आमदारांनी मोठा उठाव केला. एवढेच नाही तर शाखा प्रमुखांपासून सर्व यंत्रणा हालली. या दरम्यानच्या काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या धोरणामध्ये बदल करणे अपेक्षित होते. मात्र, हा बदल त्यांना मान्य नसल्याने इतरांनाही गप्प रहावे लागत आहे

Shiv Sena : एक पोस्ट, हकालपट्टी, फोनाफोनी, पुन्हा हकालपट्टी, पुन्हा फोन आणि भेट; आढळरावांनी सांगितली इन्साईड स्टोरी
शिवाजीराव आढळराव पाटील
Follow us
| Updated on: Jul 19, 2022 | 1:16 PM

मुंबई : आमदार, खासदारांपाठोपाठ आता (Shiv Sena) शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांनीही पक्षाला जय महाराष्ट्र करण्यास सुरवात केली आहे. ज्येष्ठ नेते (Shivaji Bajirao Patil) शिवाजी आढळराव पाटील यांच्यावर पक्षाने कारवाई केल्यानंतर प्रथमच कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्याबाबत पक्षाने काय-काय भूमिका घेतली आणि नेमके एका पोस्टमुळे काय झाले याची इन्साईड स्टोरी सांगितली आहे. दरम्यानच्या तीन दिवसांतील घडामोडी त्यांनी मांडल्या आहेत. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हे विराजमान झाल्यानंतर कर्तव्य म्हणून अभिनंदनाची पोस्ट टाकली आणि त्यावरुन सुरु झालेले मतभेद हे थेट कारवाईपर्यंत येऊन पोहचले आहेत. मात्र, आमदार, पदाधिकारी, खासदार हे पक्ष का सोडून जात आहेत याच्या बाबतीत विचार न एकनिष्ठ असणाऱ्यांचीच हकालपट्टी शिवसेनेमध्ये सुरु झाल्याची खंत यावेळी पाटलांनी व्यक्त केली आहे.

‘त्या’ तीन दिवसांमध्ये नेमके काय झाले?

राज्यातील राजकीय उलथापालथी नंतर मुख्यमंत्री पदाची सूत्रे ही एकनाथ शिंदे यांच्या हाती आली आणि तेव्हापासून आढळराव पाटलांवर कारवाईला सुरवात झाली. त्याला कारणही तसेच आहे. पाटील यांनी सांगितले की, राज्यात नवीन मुख्यमंत्र्याची नेमणूक झाली. कर्तव्य म्हणून अभिनंदन केलं. पक्षाला आवडलं नाही. तीन दिवसात माझी हकालपट्टी केली. गेल्या 15 वर्षापासून काही नसताना मी या जिल्ह्यात काम केलं. तुम्ही एका पोस्टमुळे माझी हकालपट्टी करताय… मला बोलायचं तरी. विचारायचं तरी. मी साहेबांना फोन केला. तालुक्यातील लोक माझ्याकडे येणार होते. मी येणार होतो. पण वेळ नाही. ते म्हणाले, तुम्ही पोस्ट टाकली मला वाईट वाटलं. मी म्हणालो, मला त्यात चुकीचं काही वाटलं नाही. मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करणं मला चुकीचं वाटत नाही. यानंतर दुसऱ्या दिवशी, विनायक राऊत आणि अनिल परब यांचा फोन आला. चुकीने झालं सांगितलं. मी काय एवढा छोटा माणूस आहे का चुकीने व्हायला. असे असतानाही झालेल्या चर्चेत आपण राष्ट्रवादी सोबत नको. आपण स्वबळावर उभं राहू. असे असतानाही राष्ट्रवादीला सोडून चालणार नसल्याची त्यांची भावना होती. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे आढळराव पाटलांनी सांगितले आहे.

धोरणात बदल गरजेचा होता

शिवसेना पक्षातील समिकरणे ही काही एका रात्रीतून घडलेली नाहीत. आता आमदारांनी घेतलेल्या भूमिकेला महिना होत आहे. पक्षातील काही आमदारांनी मोठा उठाव केला. एवढेच नाही तर शाखा प्रमुखांपासून सर्व यंत्रणा हालली. या दरम्यानच्या काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या धोरणामध्ये बदल करणे अपेक्षित होते. मात्र, हा बदल त्यांना मान्य नसल्याने इतरांनाही गप्प रहावे लागत आहे. 40 आमदार हा पक्ष सोडत असल्यावर यामागे नेमकी खदखद काय याचा अभ्यास होणेही गरजेचे असल्याचे मत शिवाजी अढळराव पाटील यांनी व्यक्त केले आहे.

हे सुद्धा वाचा

नेमकी कारवाई कशामुळे?

शिवसेनेमध्ये पक्षप्रमुखांच्या आदेशाला किंमत असते. पक्षातील 40 आमदारांनी उठावाची भूमिका घेतल्यानंतर का होईना अपेक्षित बदल गरजेचा होता. मात्र, तो बदल नेतृत्वाला मान्य नसल्याने आम्ही गप्प राहण्याचा निर्णय घेतल्याचे पाटलांनी सांगितले आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर केलेल्या अभिनंदन पोस्टवरुन हा टोकाचा निर्णय घेतला गेल्याचेही त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.