हात नाही तर चेहरा पाहून भविष्य सांगतो, मी लाख मतांनी येणार : शिवाजी कर्डिले

लोक हात पाहून भविष्य सांगतात, मात्र मी लोकांचे चेहरे पाहून सांगतो, एक लाख मतांनी निवडून येईल असा विश्वास शिवाजी कर्डिले (Shivaji kardile) यांनी व्यक्त केला.

हात नाही तर चेहरा पाहून भविष्य सांगतो, मी लाख मतांनी येणार : शिवाजी कर्डिले

अहमदनगर : माझ्या जागी दुसरा माणूस असता तर आत्महत्या केली असती अशी भावनिक प्रतिक्रिया अहमदनगरच्या राजकारणातील किंगमेकर आणि भाजप आमदार शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांनी व्यक्त केली. कर्डिले (Shivaji Kardile) यांची पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर झाली. त्यांना राहुरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली. मात्र त्यांचा पत्ता कट होणार असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावर कर्डिले यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं.

“मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. काही दिवसांपासून सोशल मीडियावर माझी उमेदवारी कट होणार असे मेसेज फिरत होते. मात्र त्यावर माझा विश्वास नव्हता, कारण मला माझ्या कामावर विश्वास होता. तसेच सर्वमंत्र्यांना माझ्या कामाची पद्धत माहिती होती त्यामुळेच मला खात्री होती माझं तिकीट कट होणार नाही” अशी प्रतिक्रिया कर्डीले यांनी दिली.

तसेच लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंविरोधात कर्डिलेंचे जावई राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप उभे होते. त्यामुळे कर्डिलेंनी जावयाचं काम केल्याची चर्चा होती. त्यावर कार्डिले यांनी माझ्या मतदारसंघात सुजय विखेंना सर्वात जास्त लीड आहे. त्यामुळे त्याचं उत्तर त्यांना मिळालं आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

लोक हात पाहून भविष्य सांगतात, मात्र मी लोकांचे चेहरे पाहून सांगतो, एक लाख मतांनी निवडून येईल असा विश्वास कर्डिले यांनी व्यक्त केला. आतापर्यंतच्या सहा निवडणुकीपैकी ही निवडणूक सर्वात सोपी असल्याचं कर्डिले म्हणाले.

आतापर्यंत अनेक अडचणी आल्या, मात्र माझा परमेश्वरावर विश्वास आहे. मी कधी देवाकडे आमदार खासदार होण्यासाठी काही मागत नाही, तर चांगले झालं नाही तर कोणाचं वाईट होऊ देऊ नको, असा आशीर्वाद मी मागत असतो, असं कर्डिलेंनी नमूद केलं.

माझ्या जागी दुसरा माणूस असता, तर आत्महत्या केली असती, अशी भावनिक प्रतिक्रिया कर्डिले यांनी दिली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *