AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता खूप उशीर… बाळासाहेबांच्या… ठाकरे बंधूंच्या युतीवर दीपाली सय्यद यांचं मोठं विधान; नेमकं काय म्हणाल्या?

सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा आहे. आता शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर भाष्य केले आहे.

आता खूप उशीर... बाळासाहेबांच्या... ठाकरे बंधूंच्या युतीवर दीपाली सय्यद यांचं मोठं विधान; नेमकं काय म्हणाल्या?
Deepali Sayyad
| Updated on: Jun 08, 2025 | 4:14 PM
Share

राज्यात सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा आहे. मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांकडून याबाबत संकेत देण्यात आले आहेत. काही राजकीय नेत्यांकडून ही युती महाराष्ट्राच्या फायद्याची ठरणार असल्याचे म्हटले जात आहे, तर काही नेत्यांनी यावर टीकाही केली आहे. अशातच आता शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांनीही ठाकरे बंधूंच्या युतीवर भाष्य केले आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

ठाकरे बंधू स्वार्थासाठी एकत्र येतायेत – सय्यद

दीपाली सय्यद यांनी राज्यातील अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. उद्धव आणि राज ठाकरेंच्या एकत्र येण्यावर दीपाली सय्यद यांनी म्हटले की, ‘कुटुंबाच्या वादासाठी दोघे एकत्र येत असतील तर ही चांगली गोष्ट आहे. पण जर ते राजकारणासाठी एकत्र येत असतील तर ही जर आणि तर ची गोष्टी आहे.’

दीपाली सय्यद यांनी पुढे बोलताना सांगितले की, ‘भावा-भावांमध्ये जर भांडण असेल तर त्यांनी नक्कीच एकत्र यावं. पण जर राजकारणासाठी तुम्ही आता एकत्र येत आहेत तर तुम्ही स्वतःचा स्वार्थ पाहताय. तुम्ही स्वार्थासाठी एकत्र येतायेत. आता खूप उशीर झालेला आहे. युती खूप आधी व्हायला हवी होती. बाळासाहेबांच्या मनात पण ते होतं. पण तेव्हा तुम्ही युती केली नाही.”

एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांची पोकळी भरुन काढली

दीपाली सय्यद यांनी एकनाथ शिंदेंचे कौतुक करताना म्हटले की, ‘बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर त्यांची पोकळी जर कोणी भरून काढली असेल तर ते आहेत एकनाथ शिंदे.नेता कसा असावा, जो रस्त्यावर उतरून गोरगरिबांचा विचार करणारा, त्यांच्या मनातले ऐकणारा आणि त्यांच्यासाठी काम करणारा नेता असला पाहिजे. हेच आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं.’

शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश होणार

दीपाली सय्यद यांनी उद्या शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती दिली आहे. हा पक्षप्रवेश महाराष्ट्राच्या हितासाठी असणार आहे. संजय राऊतांच्या जवळचे काही लोक पक्षप्रवेश करणार आहेत.याचा राज्याला फायदा होणार आहे अशी माहितीही सय्यद यांनी दिली आहे.

Follow Us
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र... ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र... ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो,
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो, नाशिकमधून मोठी माहिती समोर!
आता काही खरं नाही! कोर्टाच्या 'त्या' निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा
आता काही खरं नाही! कोर्टाच्या 'त्या' निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा राऊत प्रकरणी सर्वात मोठी अपडेट
बैठक ठाकरे गटाची कौतुक मात्र भाजप नेत्याचं; दोन बड्या नेत्यांचा Video
बैठक ठाकरे गटाची कौतुक मात्र भाजप नेत्याचं; दोन बड्या नेत्यांचा व्हिडीओ व्हायरल होताच चर्चांना उधाण
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून अजूनही लांब, म्हणून आता देवाभाऊ...
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून अजूनही लांब, म्हणून आता देवाभाऊ... भर मंचावरून दत्ता भरणेंचं मोठं विधान
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... CM फडणवीस
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा
कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेन
Video | कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेने... पहा व्हिडीओ
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत सांगितली पक्षाची भूमिका?
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट निर्णय, आतापासून...
तुकाराम मुंडे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई, थेट….

तुकाराम मुंडे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई, थेट…

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी फोडला मोठा बॉम्ब, एका घोषणेनं जगभरात मोठी खळबळ, यादीत भारताचाही समावेश, आता थेट….

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी फोडला मोठा बॉम्ब, एका घोषणेनं जगभरात मोठी खळबळ, यादीत भारताचाही समावेश, आता थेट…

वेस्ट इंडिजच्या मदतीसाठी पुढे सरसावले जय शाह, संघ बांधणीसाठी असं उचललं पाऊल.

वेस्ट इंडिजच्या मदतीसाठी पुढे सरसावले जय शाह, संघ बांधणीसाठी असं उचललं पाऊल

पंढरपुरात व्हिआपी दर्शनावरून दुजाभाव? शिवसेना नेत्यासोबत आलेल्या लोकांना थेट दर्शन तर भाजप नेत्याच्या कुटुंबाला ताटकळत ठेवलं.

पंढरपुरात व्हिआपी दर्शनावरून दुजाभाव? शिवसेना नेत्यासोबत आलेल्या लोकांना थेट दर्शन तर भाजप नेत्याच्या कुटुंबाला ताटकळत ठेवलं

मुस्लीम देश पाकिस्तानात फक्त हिंदूंचाच बोलबाला, या शहरात जिकडे तिकडे फक्त हिंदूच!.

मुस्लीम देश पाकिस्तानात फक्त हिंदूंचाच बोलबाला, या शहरात जिकडे तिकडे फक्त हिंदूच!

अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणमध्ये खळबळ! मृतांचा आकडा आला समोर, शेकडो जखमी.

अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणमध्ये खळबळ! मृतांचा आकडा आला समोर, शेकडो जखमी